जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Tax Saving Tips: नवीन वर्षात टॅक्स नियोजनाची चिंता सोडा, सोप्या टिप्स फॉलो करा आणि पैसे वाचवा

Tax Saving Tips: नवीन वर्षात टॅक्स नियोजनाची चिंता सोडा, सोप्या टिप्स फॉलो करा आणि पैसे वाचवा

Tax Saving Tips: नवीन वर्षात टॅक्स नियोजनाची चिंता सोडा, सोप्या टिप्स फॉलो करा आणि पैसे वाचवा

पगारदारांना नवीन आर्थिक वर्षात जास्त पगार मिळण्याची अपेक्षा आहे. तुमचे उत्पन्न वाढते म्हणून तुम्ही तुमची गुंतवणूक वाढवावी.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 1 एप्रिल : आयकरदाते किंवा गुंतवणूकदार यांना नवीन आर्थिक वर्ष (New Financial Year) सुरू होताच सर्वांना पैशाच्या योग्य वापराची काळजी वाटायला लागली असेल. योग्य नियोजन (Financial Planning) करून महत्त्वाची आर्थिक कामे वेळेवर न केल्यास आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. TDS टाळण्यासाठी फॉर्म 15G आणि 15H सबमिट करणे, आयकर वाचवण्याचे नियोजन आणि पीएफमध्ये 12 टक्क्यांपेक्षा जास्त योगदानासाठी एचआरकडे जाणे ही काही कामे आहेत जी तुम्ही आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच सुरू करु शकता. येथे आम्ही तुम्हाला अशा 5 टिप्स देत आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही 2022-23 या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून वर्षभर निश्चिंत राहू शकता. पहिली म्हणजे गुंतवणूक वाढवणे तसेच उत्पन्न वाढवणे. पगारदारांना नवीन आर्थिक वर्षात जास्त पगार मिळण्याची अपेक्षा आहे. तुमचे उत्पन्न वाढते म्हणून तुम्ही तुमची गुंतवणूक वाढवावी. उदाहरणार्थ, जर तुम्ही सध्या म्युच्युअल फंडामध्ये (Mutual Funds) मासिक मोडमध्ये 5000 ची SIP करत असाल, तर तुम्ही ही रक्कम वाढवावी. इंधन दरवाढीमुळे मुंबईतील प्रवास महागला, Uber कडून भाडेवाढीची घोषणा आयकर बचतीचे नियोजन करदात्यांनी आयकर नियोजनात थोडा वेळ घालवावा, असा सल्ला तज्ज्ञ देतात. कारण करपात्र उत्पन्न हे तुमचे स्वतःचे कष्टाचे पैसे आहे. उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती कर बचत योजनांमध्ये गुंतवणूक करत असेल, तर त्याने कलम 80C, 80CCD (1B) सारख्या सर्व कर बचत साधनांमध्ये गुंतवणूक पूर्ण केली असल्याची खात्री केली पाहिजे. मात्र केवळ आयकर वाचवण्यासाठी गुंतवणूकदाराने कर बचत साधनांमध्ये गुंतवणूक करू नये. त्यांनी गुंतवणुकीवरील परतावाही पाहिला पाहिजे. गुंतवणुकीवरील परतावा असा असावा की तो सरासरी 5.5 ते 6 टक्के महागाई दरावर मात करू शकेल. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF), नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) किंवा टॅक्स सेव्हर पोस्ट ऑफिस मुदत ठेव हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो. Multibagger Share: TATA च्या ‘या’ शेअरमुळे गुंतवणूदार बनले कोट्यधीश! एक लाख झाले दोन कोटी रुपये पोर्टफोलिओ मॅनेज करा केवळ गुंतवणूक करून सोडून देणे योग्य नाही. नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यावर, तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओवर एक नजर टाकली पाहिजे. आवश्यक असल्यास तुमच्या पोर्टफोलिओमध्ये बदल करा. त्यामध्ये तुम्ही जुन्या गुंतवणुकीतून नवीन गुंतवणूक निवडू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्हाला नवीन आर्थिक वर्षात इक्विटी म्युच्युअल फंडात SIP सुरू करायची असेल, तर ELSS (Equity Linked Saving Scheme) योजना तुमच्यासाठी अधिक चांगली ठरेल. याद्वारे तुम्ही करही वाचवू शकाल. ELSS फंड दीर्घकाळात डेट फंडांपेक्षा जास्त परतावा देतात. तुम्ही एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असाल, तर ELSS म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर आहे. VPF मध्ये गुंतवणूक वाढवा भविष्य निर्वाह निधी (PF) व्याजदर चार दशकांच्या नीचांकी 8.1 टक्क्यांवर आणला गेला असला तरी, तो PPF वरील 7.1 टक्के व्याजापेक्षा 1 टक्‍क्‍यांनी जास्त आहे. हेच कारण आहे की पगारदार व्यक्तीने Voluntary Provident Fund (VPF) मध्ये गुंतवणूक करणे सुरू ठेवावे आणि त्याच्या नियोक्त्याला त्याच्या मासिक उत्पन्नातून VPF वजा करणे सुरू ठेवण्याची विनंती करू शकते. यासह, त्यांना कलम 80C च्या सूटसह कोणताही धोका न घेता अधिक परतावा मिळेल. मात्र तुम्ही हे लक्षात घेतले पाहिजे की प्रति वर्ष 2.5 लाख रुपयांपर्यंतचे EPF योगदान EEE श्रेणी अंतर्गत येते. म्हणजेच त्यातून मिळणाऱ्या व्याजावर कर आकारला जात नाही. 2.5 लाखांपेक्षा जास्त गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर कर लागेल. TDS कपात टाळण्यासाठी फॉर्म 15G फाइल करा जर कमावणाऱ्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर त्या बाबतीत फॉर्म 15G जमा करावा. तुमचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असल्यास, हा फॉर्म सबमिट करून तुम्ही मिळवलेल्या व्याजावर होणारी कोणतीही TDS कपात टाळण्यास सक्षम असाल. त्याचप्रमाणे, 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या बाबतीत, त्याच TDS कपातीच्या लाभासाठी फॉर्म 415H भरावा लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: investment , money , Tax
  • First Published :
जाहिरात
जाहिरात