मराठी बातम्या /बातम्या /मनी /TATA IPL 2023 : Jio Cinema ची TV ला टक्कर! स्पॉन्सरर्स व जाहिरातदारांची रेकॉर्ड ब्रेक नोंदणी

TATA IPL 2023 : Jio Cinema ची TV ला टक्कर! स्पॉन्सरर्स व जाहिरातदारांची रेकॉर्ड ब्रेक नोंदणी

JioCinema वर साइन अप केलेल्या जाहिरातदारांची संख्यादेखील एक नवा विक्रम आहे, कारण रेव्हेन्यू बूक झाला आहे. दोन्ही डिजिटलवर गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या वाढ नोंदवण्यात आली आहे.

JioCinema वर साइन अप केलेल्या जाहिरातदारांची संख्यादेखील एक नवा विक्रम आहे, कारण रेव्हेन्यू बूक झाला आहे. दोन्ही डिजिटलवर गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या वाढ नोंदवण्यात आली आहे.

JioCinema वर साइन अप केलेल्या जाहिरातदारांची संख्यादेखील एक नवा विक्रम आहे, कारण रेव्हेन्यू बूक झाला आहे. दोन्ही डिजिटलवर गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या वाढ नोंदवण्यात आली आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई : JioCinema, TATA IPL 2023 चे अधिकृत डिजिटल स्ट्रीमिंग भागीदार आहे. या आठवड्यात अ‍ॅपवर 23 स्पॉन्सरर्ससह प्लॅटफॉर्मवर जाहिरातींसाठी मोठ्या प्रमाणात साइन अप केलं गेलं. TATA IPL 2023 साठी JioCinema द्वारे साइन अप केलेल्या जाहिरातदार व स्पॉन्सरर्सची संख्या भारतातील डिजिटल स्ट्रीमिंगवरील कोणत्याही इतर कार्यक्रमापेक्षा लक्षणीय आहे.

  TATA IPL 2023 च्या डिजिटल स्ट्रीमिंगसाठी JioCinema वरील स्पॉन्सरर्समध्ये (को-प्रेझेंटिंग स्पॉन्सरर्स) Dream11, (को-पॉवर्ड) जिओ मार्ट, फोन पे, टियागो ईव्ही, (असोसिएट स्पॉन्सरर्स) अ‍ॅप्पी फिज, ईटी मनी, कॅस्ट्रॉल, टीव्हीएस, ओरियो यांचा समावेश आहे. तर, बिंगो, स्टिंग, अजिओ, Haier, RuPay, Louis Philippe Jeans, अ‍ॅमेझॉन, रॅपिडो, अल्ट्रा टेक सिमेंट, प्युमा, कमला पसंद, किंगफिशर पॉवर सोडा, जिंदल पँथर टीएमटी रेबर आणि इंडीड हे होते.

  JioCinema वर साइन अप केलेल्या जाहिरातदारांची संख्यादेखील एक नवा विक्रम आहे, कारण रेव्हेन्यू बूक झाला आहे. दोन्ही डिजिटलवर गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या वाढ नोंदवण्यात आली आहे. प्रेक्षक भोजपुरी, पंजाबी, मराठी आणि गुजराती या नवीन भाषेतील कॉमेंट्रीसह मल्टी-कॅम, 4K, हायप मोड यासारख्या फीचर्सचा आनंद घेत आहेत. या नवीन भाषा व फीचर्समुळे डिजिटल बँडवॅगनमध्ये सामील होणाऱ्या ब्रँडची यादी आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. प्रेक्षकांना JioCinema च्या फॅन-सेंट्रिक प्रेझेंटेशनने स्क्रीनसमोर बसून राहण्यास भाग पाडलं. कारण वीकेंडमध्ये प्रति प्रेक्षक सरासरी वेळ 57 मिनिटांपर्यंत पोहोचला होता, जो गेल्या सीझनच्या पहिल्या वीकेंडच्या तुलनेत 60% पेक्षा जास्त होता आणि पहिल्या आठवड्यात टिकून राहिला आहे.

  “आम्ही ज्या सातत्यपूर्णतेने हे आकडे देत आहोत, ते भारतातील स्पोर्ट्स पाहण्याच्या पद्धतीत झालेल्या बदलांचा पुरावा आहेत. आमचे स्पॉन्सरर्स आणि जाहिरातदारांना JioCinema वरील गुंतवणुकीवर डिलिव्हरी आणि रिटर्नची खात्री आहे. कारण डिजिटलद्वारे, ते केवळ लेगसी सेवांच्या वितरीत केलेल्या वास्तविक इम्प्रेशन्ससाठी पैसे देत आहेत, याची त्यांना कल्पना आहे,” असं Viacom18 स्पोर्ट्सचे सीईओ अनिल जयराज म्हणाले. "JioCinema वरील जाहिराती सोबतच ब्रँड्सना टीव्ही जाहिरातींपेक्षा अधिक अचूकता, किफायतशीरपणा आणि फ्लेक्झिबिलीटी देते, ज्यामुळे अधिकाधिक जाहिरातदार त्यांचे लक्ष आणि बजेट डिजिटलकडे वळवतील, याची आम्हाला खात्री आहे," असंही ते म्हणाले.

  भारतातील सर्व दर्शकांसाठी JioCinema च्या TATA IPL 2023 च्या मोफत स्ट्रीमिंगमुळे पहिल्या आठवड्यात 375 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यातून पहिल्या वीकेंडला 147 कोटीं व्ह्यूजची कमाई झाली. इतकंच नव्हे तर या व्ह्यूजच्या आकड्यांनी डिजिटलवर TATA IPL साठी सर्वांत जास्त ओपनिंग वीकेंड ठरण्याचा आणखी एक विक्रम रचला आहे. JioCinema ने MS धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज आणि हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्स यांच्यातील मॅचद्वारे सीझनची दमदार ओपनिंग सेट केली. याला 1.6 कोटी व्ह्यूज मिळाले होते. याव्यतिरिक्त, JioCinema ने 2.5 कोटी पेक्षा जास्त अ‍ॅप डाउनलोडची नोंदणी केली. हे एका दिवसात सर्वाधिक अ‍ॅप इन्स्टॉल केल्याचा विक्रम आहे.

  हे विक्रम मोडणारे नंबर्स 500 हून अधिक OEM आणि CTV प्लॅटफॉर्मसह Jio STB, Apple TV, Amazon Firestick, OnePlus TV, Sony, Samsung, LG आणि Xiaomi यासह अनेक कस्टमाइज्ड डिव्हाइस इंटिग्रेशन पार्टनरशिपद्वारे सपोर्टेड आहेत. याव्यतिरिक्त, CTV प्रेक्षक JioCinema द्वारे 4K मध्ये जगातील सर्वांत प्रसिद्ध क्रिकेट लीग पाहणं सुरू ठेवतात.

  चाहत्यांना गुंतवून ठेवण्याच्या आणि त्यांचा अनुभव आणखी चांगला करण्याच्या त्यांच्या प्रयत्नात JioCinema ने एका नवीन स्पर्धेची घोषणा केली. 'जीतो धन धना धन' ही नवीन स्पर्धा प्रत्येक सामन्यात युजर्सना एक कार जिंकण्याची संधी देते. 8 एप्रिल रोजी इंट्रोड्युस करण्यात आलेल्या JioCinema च्या या खेळात शनिवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या पहिल्या दोन मॅचमध्ये 1.5 कोटी पेक्षा जास्त लोकांनी भाग घेतला.

  IPL2023 चा थरार वाढवणार नवे 8 नियम, जाणून घ्या काय झालेत बदल

  JioCinema ने MS धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज आणि हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्स यांच्यातील मॅचने दमदार सीझन ओपनिंग केली. याने 1.6 कोटींचा सर्वोच्च आकडा गाठला. याव्यतिरिक्त, JioCinema ने 2.5 कोटी पेक्षा जास्त डाउनलोड्स नोंदवले. हा एका दिवसात सर्वाधिक इन्स्टॉल केलेल्या अ‍ॅपचा नवीन विक्रम आहे.

  गेल्या वर्षीचे आयपीएल विजेते गुजरात टायटन्स, पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्सने 2023 एडिशनमध्ये JioCinema सोबत विशेष पार्टनरशीप जाहीर केली. जागतिक क्रिकेट आयकॉन सचिन तेंडुलकर, भारताचा सर्वात प्रसिद्ध क्रिकेट कॅप्टन आणि चार वेळा आयपीएल विजेता एमएस धोनी, जागतिक क्रमवारीत T20मध्ये पहिल्या क्रमांकावर असणारा फलंदाज सूर्यकुमार यादव आणि भारतीय महिला क्रिकेट टीमची उप कॅप्टन स्मृती मानधना यांनी त्यांचे जागतिक दर्जाचे, TATA IPL प्रेझेंटेशनची बाजू सक्षम करण्यासाठी JioCinema सोबत हातमिळवणी केली.

  IPL 2023 : पहिल्याच आठवड्यात JioCinemaचा रेकॉर्ड, CSKvsLSG सामन्यावेळी विक्रमी प्रेक्षक

  JioCinema (iOS आणि Android) डाउनलोड करून प्रेक्षक त्यांच्या पसंतीच्या टीम्सच्या मॅचेस पाहणं सुरू ठेवू शकतात. ताजे अपडेट्स, बातम्या, स्कोअर आणि व्हिडिओसाठी चाहते स्पोर्ट्स 18 ला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, युट्यूब तसेच JioCinema च्या फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करू शकतात.

  First published:
  top videos

   Tags: IPL 2023, Relince jio, Tata group