मराठी बातम्या /बातम्या /मनी /कोण होणार Air India चा नवा मालक! टाटा आणि स्पाईसजेटमध्ये शर्यत, किती लावली बोली?

कोण होणार Air India चा नवा मालक! टाटा आणि स्पाईसजेटमध्ये शर्यत, किती लावली बोली?

तब्बल 88 वर्षांपूर्वी जे. आर. डी टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहानं एअर इंडियाची स्थापना केली होती. एअर इंडिया पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी टाटा समूह (Tata Group) उत्सुक असून त्याकरता बोली (Bid) लावण्यातही त्यांनी आघाडी घेतली आहे.

तब्बल 88 वर्षांपूर्वी जे. आर. डी टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहानं एअर इंडियाची स्थापना केली होती. एअर इंडिया पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी टाटा समूह (Tata Group) उत्सुक असून त्याकरता बोली (Bid) लावण्यातही त्यांनी आघाडी घेतली आहे.

तब्बल 88 वर्षांपूर्वी जे. आर. डी टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहानं एअर इंडियाची स्थापना केली होती. एअर इंडिया पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी टाटा समूह (Tata Group) उत्सुक असून त्याकरता बोली (Bid) लावण्यातही त्यांनी आघाडी घेतली आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली 01 मे : एअर इंडियाची (Air India) निर्गुंतवणूक प्रक्रिया (Disinvestment Process) वेगानं पूर्ण करून या वर्षाखेर तिची सूत्रे खासगी कंपनीकडे सोपवण्याची सरकारची इच्छा आहे. तब्बल 88 वर्षांपूर्वी जे. आर. डी टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहानं एअर इंडियाची स्थापना केली होती. त्यामुळं एअर इंडिया पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी टाटा समूह (Tata Group) उत्सुक असून त्याकरता बोली (Bid) लावण्यातही त्यांनी आघाडी घेतली आहे. टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेडनं स्पाईसजेटचे (Spicejet) प्रवर्तक अजय सिंह यांनी लावलेल्या बोलीपेक्षा अधिक किमतीची बोली लावली आहे. त्यामुळं लवकरच एअर इंडियाची सूत्रे टाटा समूहाकडे जाण्याची शक्यता आहे.

सध्या देशात फैलावलेल्या कोविड-19 च्या दुसर्‍या लाटेमुळे (Covid-19 Second Wave) विमान प्रवासावर निर्बंध घालण्यात आले असल्यानं एअर इंडियाचं उत्पन्न घटलं आहे. त्यामुळं तिचं मूल्यांकनही कमी झालं आहे.

होऊ शकतो विलंब :

गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहिन कांता पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या कोविड-19 साथीमुळे बोली लावणाऱ्या कंपन्यांकडून प्रत्यक्ष मूल्यांकन लवकर होण्याची शक्यता कमी आहे. यामुळं एअर इंडियाची निर्गुंतवणुक प्रक्रिया पूर्ण होण्यास काही महिन्यांचा विलंब होऊ शकतो. मिंट इंडिया इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये त्यांनी ही माहिती दिली . ते म्हणाले की, आर्थिक वर्ष 2021 च्या पहिल्या सहामाहीत एअर इंडियाचे विभाजन पूर्ण करण्याचे सरकारचं उद्दिष्ट आहे, मात्र सद्यस्थितीत याला थोडा उशीर होऊ शकतो. टाटा समूह आणि स्पाइसजेटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह यांच्या निविदा निवडण्यात आल्या आहेत.

कंपनीवर आहे 60 हजार कोटी रुपयांचे कर्ज:

एअर इंडियामधील आपला शंभर टक्के हिस्सा सरकार विकणार असल्याचं केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे. सध्या एअर इंडियाला उत्पन्न मिळत असलं तरीही दिवसाला 20 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावं लागत आहे. आतापर्यंत कंपनीवर 60 हजार कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे. 2007 मध्ये इंडियन एअरलाईन्समध्ये विलीन झाल्यापासून एअर इंडिया तोट्यात आहे.

जूनपर्यंत पूर्ण होईल निर्गुंतवणूक प्रक्रिया:

गेल्या बैठकीत एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीसाठी आलेल्या निविदांमधून एक अंतिम यादी तयार करण्यात आली होती आणि निवडलेल्या कंपन्यांकडून 64 दिवसांत बोली मागविण्यात आल्या होत्या. एअर इंडियाची निर्गुंतवणूक प्रक्रिया मे किंवा जूनपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: Air india, Domestic flight, Tata group