मराठी बातम्या /बातम्या /मनी /

TATAच्या 'या' शेअरची दमदार कामगिरी, गुंतवणूकदारांची 1 लाखांची गुंतवणूक बनली 82 लाख

TATAच्या 'या' शेअरची दमदार कामगिरी, गुंतवणूकदारांची 1 लाखांची गुंतवणूक बनली 82 लाख

मल्टीबॅगर स्टॉक TATA Elxsi गेल्या 9 वर्षात 102 रुपयांवरून 8370 रुपयांपर्यंत वाढला आहे, ज्यामुळे त्याच्या शेअरहोल्डर्सना अंदाजे 8,100 टक्के परतावा मिळाला.

मल्टीबॅगर स्टॉक TATA Elxsi गेल्या 9 वर्षात 102 रुपयांवरून 8370 रुपयांपर्यंत वाढला आहे, ज्यामुळे त्याच्या शेअरहोल्डर्सना अंदाजे 8,100 टक्के परतावा मिळाला.

मल्टीबॅगर स्टॉक TATA Elxsi गेल्या 9 वर्षात 102 रुपयांवरून 8370 रुपयांपर्यंत वाढला आहे, ज्यामुळे त्याच्या शेअरहोल्डर्सना अंदाजे 8,100 टक्के परतावा मिळाला.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 23 जुलै : शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून मोठी अस्थिरता आहे. अनेक शेअरमुळे गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं. मात्र काही क्वालिटी शेअर्सनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. टाटा समूहाचा Tata Elxsi शेअर हा असाच एक स्टॉक आहे. बहुतेक आयटी शेअर विक्रीच्या दबावाखाली असताना टाटा समूहाच्या या शेअरने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. या IT शेअरने यावर्षी 42 टक्के परतावा दिला आहे.टाटा अलेक्सीच्या शेअरने गुंतवणूकदारांना मोठा परतावा देण्याची ही पहिलीच वेळ नाही. हा भारतातील मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे जो आपल्या भागधारकांना बऱ्याच काळापासून चांगला परतावा देत आहे. मल्टीबॅगर स्टॉक गेल्या 9 वर्षात 102 रुपयांवरून 8370 रुपयांपर्यंत वाढला आहे, ज्यामुळे त्याच्या शेअरहोल्डर्सना अंदाजे 8,100 टक्के परतावा मिळाला. Nirav Modi: EDची मोठी कारवाई, नीरव मोदीची 253 कोटींची मालमत्ता जप्त Tata Elxsi शेअर गेल्या एका महिन्यात हा लार्ज-कॅप स्टॉक 7788 रुपयांवरून 8370 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 7.50 टक्के परतावा दिला आहे. टाटा समूहाचा हा मल्टीबॅगर स्टॉक गेल्या 6 महिन्यांत सुमारे 7040 रुपयांवरून 8370 रुपयांच्या पातळीवर वाढला आहे. या कालावधीत जवळपास 19 टक्के परतावा दिला आहे. Tata Elxsi च्या शेअरची किंमत वर्षभरात 5890 रुपयांवरून 8370 रुपयांपर्यंत वाढली आहे. म्हणजेच या कालावधीत या स्टॉकमध्ये 42 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात हा आयटी स्टॉक सुमारे 4250 वरून 8370 रुपयांवर गेला आहे. या कालावधीत सुमारे 95 टक्के वाढ नोंदवली आहे. त्याचप्रमाणे, गेल्या 5 वर्षांत हा मल्टीबॅगर स्टॉक सुमारे 875 वरून 8370 रुपये प्रति शेअर पातळीपर्यंत वाढला आहे. म्हणजेच या कालावधीत सुमारे 860 टक्क्यांनी झेप घेतली आहे. गेल्या 9 वर्षांत NSE वर स्टॉक 102 वरून 8370 रुपयांच्या पातळीवर गेला आहे, या कालावधीत सुमारे 8100 टक्के वाढ नोंदवली आहे. फायद्याची बातमी! वस्तू बिघडल्यास कंपनीलाच रिपेअर करावी लागणार; केंद्राकडून नव्या कायद्याची तयारी Tata Alexi च्या शेअरच्या किमतीनुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने एका महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे 1 लाख आज 1.075 लाख झाले असते. तर 6 महिन्यांत ते 1.19 लाख झाले असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने एका वर्षापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याचे 1 लाख आज 1.95 लाख झाले असते. एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी Tata च्या या शेअर्समध्ये 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे 1 लाख आज 9.60 लाख झाले असते. त्याचप्रमाणे, एखाद्या गुंतवणूकदाराने 9 वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे 1 लाख आज 82 लाख झाले असते.
First published:

Tags: Money, Share market, Tata group

पुढील बातम्या