Tata AIA Life Insurance: व्हॉट्सअपच्या माध्यमातून आजकल आपण रोजच्या जीवनातील अनेक कामं करत आहोत. हे आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनला आहे. एवढंच नाही तर मॅसेजिंग अॅपच्या माध्यमातून आपण ऑनलाइन पेमेंटही करु शकतो. आता देशातील एका विमा कंपनी आपल्या प्रीमियम पेमेंटचा ऑप्शनही व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून देत आहे. कंपनीने दावा केलाय की, ही अशी सुविधा देणारी पहिली सर्व्हिस आहे.
टाटा एआयए लाइफ इन्शुरन्सने डिजिटल पेमेंटसाठी एक नवीन सुविधा जाहीर केली आहे. ज्याद्वारे ग्राहकांना व्हॉट्सअॅपवरच युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे पेमेंट करण्याचा ऑप्शन मिळेल. PPF अकाउंट मॅच्योर झाल्यावर मिळतात हे 3 ऑप्शन! यात गुंतवणूक केली असेल तर अवश्य घ्या जाणून जाणून घ्या काय आहेत याचे फायदे - टाटा एआयए डिजिटल पेमेंट सिस्टीम सर्व वयोगटांना सहज पेमेंट करण्याची सुविधा देत आहे. - कस्टमर्स कोणत्याही त्रासाशिवाय WhatsApp द्वारे डिजिटल पेमेंट करू शकतात आणि फक्त Tata AIA च्या अधिकृत WhatsApp नंबरवर रिसीट किंवा एकनॉलिजमेंट किन्फर्मेशनही मिळवू शकतात. Home Loan Tips: होम लोन घेताना फक्त व्याजदर नाही तर ‘या’ 5 गोष्टीही अवश्य घ्या समजून, होईल फायदाच फायदा पेमेंट कसे करावे -या सुविधेचा लाभ घेण्यासाठी, ग्राहकांना त्यांचे व्हॉट्सअॅप उघडावे लागेल आणि त्यावर Tata AIA Life Insurance चॅट नंबरच्या माध्यमातून लॉन्च करावं लागेल. -पुढची स्टेप करण्यासाठी तुम्हाला Tata AIA Life Insurance चॅट नंबरवर ‘Hi’ पाठवावा लागेल. -ज्या नंबरवर तुम्ही टाटा एआयआयकडे पॉलिसी नोंदणी केली आहे, तोच नंबर व्हॉट्सअॅपवर लिंक्ड असणे गरजेचे आहे. अनेक भाषांमध्ये मिळते सुविधा टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स आपल्या पॉलिसींच्या रीन्यूअलसाठी विविध डिजिटल पेमेंट मोड ऑफर करते. त्याच्या सेवांचे इंटीग्रेशन इंग्रजी, हिंदी, तमिळ, गुजराती आणि बंगाली अशा 5 भाषांमध्ये प्रदान केले जाते. टाटा एआयए देतेय डिव्हिडेंड कंपनी आपल्या पॉलिसीधारकांना 1100 कोटी रुपयांपेक्षा जास्त डिव्हिडेंड देत आहे. जे 2022 च्या 861 कोटी रुपयांच्या तुलनेत चांगले अप्रिसिएशन आहे. टाटा एआयएच्या पॉलिसीचे क्लेम सेटलमेंट रेशो देखील इंडस्ट्री स्टँडर्ड्सच्या हिशोबाने चांगले आहेत.