Home /News /money /

फिनटेक कंपन्यांकडून कर्ज घेताय? घोटाळ्यांपासून सावध राहण्यासाठी 'ही' काळजी घ्या...

फिनटेक कंपन्यांकडून कर्ज घेताय? घोटाळ्यांपासून सावध राहण्यासाठी 'ही' काळजी घ्या...

फिनटेक कंपन्यांकडून कर्ज घेताय? मग 'ही' काळजी घ्या अन्यथा होईल पश्चाताप

फिनटेक कंपन्यांकडून कर्ज घेताय? मग 'ही' काळजी घ्या अन्यथा होईल पश्चाताप

कर्जाऊ रक्कम देणाऱ्यांकडून पैसे स्वीकारण्यासाठी कर्जदारांना बारकोड किंवा क्यूआर कोड स्कॅन करायला सांगितला जात असेल, तर कर्जदारांनी तसं करू नये.

    नवी दिल्ली, 8 डिसेंबर : गेल्या काही वर्षांत भारतात कर्ज सुविधांमध्ये (Loan Facilities) मोठी क्रांती झाली आहे. अलीकडेपर्यंत केवळ बँका किंवा पतसंस्थांची मक्तेदारी असलेल्या या विषयात फिनटेक कंपन्यांची (Fintech Companies) स्पर्धाही सुरू झाली. फिनटेक म्हणजेच फायनान्स (Finance) आणि टेक्नॉलॉजी (Technology) यांचा संगम. फिनटेक कंपन्यांच्या कारभारात गेल्या काही काळात मोठी वाढ झाली आहे. या कंपन्यांमुळे कर्जदारांना कर्ज सहज मिळणं शक्य झालं आहे. या कंपन्यांचा कारभार आकर्षित करून घेणारा आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि घोटाळेबाज या दोन्ही घटकांना तो आकर्षित करून घेतो. पारंपरिक बँकांच्या तुलनेत फिनटेक कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक सुविधा खूपच पारदर्शक, कार्यक्षम आणि अधिक सर्वसमावेशक आहेत. ही बाब खरी असली, तरी त्यात अनेक धोकेही आहेत. त्यामुळे डिजिटल लोन्स कशी दिली जातात, त्यांची प्रक्रिया नेमकी कशी असते, या गोष्टी समजून घेतल्या, तर घोटाळ्यांपासून दूर राहणं ग्राहकांना शक्य होऊ शकतं. अशा काही गोष्टींची माहिती 'सीएनबीसी टीव्ही18'ने दिली आहे. - कर्जदार (Borrower) म्हणजेच कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा आर्थिक इतिहास जाणून घेतल्याशिवाय कर्ज देणारी संस्था (Lender) कर्ज देत नाही. फिनटेक कंपन्या कर्जदाराचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) तपासण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतात. त्यामुळे ही प्रक्रिया वेगवान होते. कर्जदार कर्ज फेडण्याबाबत किती गांभीर्याने विचार करतो, हे यातून जाणून घेतलं जातं; पण कर्जपुरवठादार घोटाळेबाज असतील, तर कर्जदारांची माहिती त्यांच्याकडून तपासली जाईलच असं नाही. वाचा : गृहकर्ज घेताना व्याजदर तपास, सोबत इतर शुल्क तपासणंही महत्त्वाचं - सर्वसाधारणपणे ज्यांना तातडीने आणि कसंही करून कर्ज हवं असतं, अशा धोकादायक कॅटेगरीतल्या कर्जदारांवर घोटाळेबाज (Scamster) कंपन्या लक्ष केंद्रित करतात. - घोटाळेबाज कंपन्या कर्जदारांना कर्जासाठी अर्ज करण्याच्या डेडलाइन भीती घालून दबाव आणण्याचा प्रयत्न करत असतात. - कायदेशीर मार्गाने कर्ज देणाऱ्या कोणत्याही संस्था किंवा फिनटेक कंपन्या कर्जदारांची केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्णपणे पाळतात. त्यामुळे केवायसी प्रक्रिया न पाळता कर्ज देणाऱ्या फिनटेक कंपन्यांपासून कर्जदारांनी सावध राहावं. वाचा : LIC पॉलिसीवरही घेऊ शकता पर्सनल लोन, व्याजदर किती? अर्ज कसा करायचा? - कर्जाऊ रक्कम देणाऱ्यांकडून पैसे स्वीकारण्यासाठी कर्जदारांना बारकोड किंवा क्यूआर कोड स्कॅन करायला सांगितला जात असेल, तर कर्जदारांनी तसं करू नये. - कर्ज देणारी कंपनी किंवा संस्था घोटाळेबाज असेल, तर कर्जाच्या सर्व अटी आणि नियम उघडपणे सांगितले जात नाहीत. परतफेड करताना किती रुपयांचे किती हप्ते द्यावे लागणार, व्याजदर किती असणार, लेट फी आणि एकूण कालावधी किती असणार यांसह सगळ्या गोष्टी कर्ज देताना उघडपणे सांगणं आवश्यक असतं. - कर्ज देणारी कोणतीही कंपनी किंवा संस्था कर्जदाराशी करार (Loan Agreement) करते आणि त्यात अटी-शर्तींसह सर्व बारीकसारीक माहिती दिलेली असते. असा करार संबंधित कंपनी किंवा संस्थेने केला नाही, तर कर्जदाराने त्यांच्याकडून कर्ज घेऊ नये. वाचा : दरमहा या योजनेत करा 1000 रुपयांची गुंतवणूक, मिळतील 12 लाख; वाचा काय आहे स्कीम - एखाद्या कंपनीकडून कर्ज घ्यायचं असेल, तर त्याबद्दलची सर्व माहिती कर्जदाराने आधी घेणं गरजेचं आहे. खऱ्या फिनटेक कंपन्यांच्या वेबसाइट्स असतात. कर्जविषयक कोणतंही अॅप डाउनलोड करण्यापूर्वी वेबसाइट्स तपासणं गरजेचं आहे. - कोणत्याही अॅपद्वारे (Loan App) कर्ज घेत असाल, तर ते अॅप काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. त्या अॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीजदेखील समजून घ्यायला हव्यात. - कर्ज देणारी कंपनी घोटाळेबाज असेल, तर अशा कंपन्या काही वेळा आपला प्रत्यक्ष पत्ता देण्याचं टाळतात, जेणेकरून कोणी प्रत्यक्ष ऑफिसला यायचा प्रयत्न केलाच, तर तो सफल होऊ नये.
    First published:

    Tags: Loan, Money, Money debt

    पुढील बातम्या