• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • SIP: 5 वर्षांत 3 लाखांचं मूल्य चौपटीनं वाढलं, अशाप्रकारे फायदेशीर गुंतवणूक कुठे कराल?

SIP: 5 वर्षांत 3 लाखांचं मूल्य चौपटीनं वाढलं, अशाप्रकारे फायदेशीर गुंतवणूक कुठे कराल?

ज्या व्यक्ती शेअर बाजारात (Share Market) एकरकमी किंवा थेट गुंतवणूक करू शकत नाहीत किंवा त्यांना अशा पद्धतीने गुंतवणूक करायची नसते, त्यांच्यासाठी एसआयपी (SIP) हा चांगला मार्ग असतो. एसआयपीमध्ये गुंतवणुकीचा कालावधी दीर्घ असल्यास जास्त परतावा (Return) मिळण्याची शक्यता जास्त असते.

  • Share this:
नवी दिल्ली, 28 मे: सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक (Investment) करण्याचा लोकांना आवडत असलेला मार्ग आहे. तुमच्या पसंतीच्या म्युच्युअल फंडात तुमच्या सोयीनुसार वेगवेगळ्या हप्त्यांत एक निश्चित रक्कम जमा करू शकता, हे त्या SIP च्या नावावरून कळतं. ज्या व्यक्ती शेअर बाजारात (Share Market) एकरकमी किंवा थेट गुंतवणूक करू शकत नाहीत किंवा त्यांना अशा पद्धतीने गुंतवणूक करायची नसते, त्यांच्यासाठी एसआयपी (SIP) हा चांगला मार्ग असतो. एसआयपीमध्ये गुंतवणुकीचा कालावधी दीर्घ असल्यास जास्त परतावा (Return) मिळण्याची शक्यता जास्त असते. शेअर बाजारात अशा अनेक एसआयपी योजना (SIP Schemes) आहेत, की ज्यात गुंतवणूकदार 100 ते 500 रुपयांपासूनही आपली गुंतवणूक सुरू करू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशा तीन एसआयपी योजनांबद्दल माहिती देत आहोत, की ज्यातून गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळाला. शेअर बाजारात अशा अनेक म्युच्युअल फंड (Mutual Fund) योजना आहेत, की ज्यात गेल्या पाच वर्षांत वार्षिक 15 टक्के 25 टक्क्यांपर्यंतच्या दराने परतावा मिळाला आहे. व्हॅल्यू रिसर्च रिपोर्टनुसार, सर्वांत उत्तम परतावा देण्याच्या बाबतीत PGIM इंडिया मिडकॅप अपॉर्च्युनिटी फंड, कोटक स्मॉलकॅप फंड आणि मिरे असेट्स इमर्जिंग ब्लूचिप हे तीन फंड्स आघाडीवर आहेत. या तीन फंडांच्या मागच्या पाच वर्षांतल्या कामगिरीविषयी जाणून घेऊ या. हे वाचा-LPG गॅस बुकिंगबाबतचे नियम बदलणार, सिलेंडर रिफिल करणं होईल अधिक सोपं 1. PGIM इंडिया मिडकॅप अपॉर्च्युनिटी फंडाने (PGIM India Midcap Opportunity fund) गुंतवणूकदारांना गेल्या पाच वर्षांत 25 टक्क्यांहून जास्त दराने परतावा दिला आहे. पाच वर्षांत दर महिन्याला पाच हजार रुपये गुंतवल्यावर एकूण गुंतवणूक रक्कम झाली तीन लाख रुपये. पाच वर्षांत त्या रकमेचं मूल्य झालं 11 लाख रुपये. म्हणजे या फंडात गुंतवणूक केल्यावर पाच वर्षांत तीन लाखांचे 11 लाख रुपये झाले. या फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूक करायची असेल, तर कमीत कमी एक हजार रुपयांची करता येऊ शकते. 2. कोटक स्मॉलकॅप फंडाने (Kotak Small-cap fund) गेल्या पाच वर्षांत 23 टक्क्यांहून जास्त दराने परतावा दिला आहे. दर महिन्याला पाच हजार रुपये पाच वर्षं या फंडात गुंतवल्यावर गुंतवणुकीची रक्कम तीन लाख रुपये झाली. पाच वर्षांनी त्यातून 10.54 लाख रुपये मिळाले. या फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूक करायची असेल, तर कमीत कमी एक हजार रुपयांपासून सुरुवात करता येते. हे वाचा-LPG गॅस बुकिंगबाबतचे नियम बदलणार, सिलेंडर रिफिल करणं होईल अधिक सोपं 3. मिरे असेट्स इमर्जिंग ब्लूचिप फंडाने (Mirae asset emerging bluechip fund) गेल्या पाच वर्षांत 23 टक्के दराने परतावा दिला आहे. पाच वर्षं दर महिन्याला पाच हजार रुपये म्हणजे एकूण तीन लाख रुपये गुंतवल्यावर यातून 10.47 लाख रुपये मिळाले .
First published: