जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Syrma SGS IPOची दमदार लिस्टिंग, गुंतवणूकदारांना काही तासांत 35 टक्के नफा

Syrma SGS IPOची दमदार लिस्टिंग, गुंतवणूकदारांना काही तासांत 35 टक्के नफा

Syrma SGS IPOची दमदार लिस्टिंग, गुंतवणूकदारांना काही तासांत 35 टक्के नफा

Syrma SGS Techचा IPO 12 ते 18 ऑगस्ट 2022 पर्यंत खुला होता. कंपनीने IPO द्वारे 840 कोटी रुपये उभे केले आहेत आणि प्राईज बँड प्रति शेअर 209-220 रुपये निश्चित करण्यात आला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 26 ऑगस्ट : शेअर बाजारात आज इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी Syrma SGS टेक्नॉलॉजीची चर्चा आहे. या कंपनीच्या IPO ची आज स्टॉक एक्स्चेंजवर दमदार लिस्टिंग झाली आहे. 220 रुपयांचा शेअर BSE वर 273 रुपये आणि NSE वर 275 रुपयांवर लिस्ट झाला आहे. तीन महिन्यांतर शेअर बाजारात आज नवीन स्टॉक लिस्ट झाला आहे. गुंतवणूकदाराला या कंपनीने 19 टक्क्यांचा लिस्टिंग गेन दिला. Syrma SGS Technology च्या IPO ला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शेअर दुपारी 1 वाजता 39 टक्क्यांच्या वाढीसह 306 रुपयांवर ट्रेड करत होता. PPF Investment: कोट्याधीश होण्याची सरकारी स्कीम माहितीय का? आत्तापासून गुंतवणूक करा सुरू सबस्क्रिप्शन किती झालं ? Syrma SGS Techचा IPO 12 ते 18 ऑगस्ट 2022 पर्यंत खुला होता. कंपनीने IPO द्वारे 840 कोटी रुपये उभे केले आहेत आणि प्राईज बँड प्रति शेअर 209-220 रुपये निश्चित करण्यात आला. IPO 32.61 पट ओव्हरसबस्क्राइब झाला आहे. ज्यामध्ये संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कोटा 87.56 पट, गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कोटा 17.5 पट आणि किरकोळ कोटा 5.53 पटीने सबस्क्राईब झाला आहे. या आयपीओमध्ये 766 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू जारी करण्यात आला आहे. Railway Rules : तिकीट नसेल तरी करु शकता रेल्वेने प्रवास; समजून घ्या रेल्वेचा ‘हा’ खास नियम तज्ज्ञांचं मत Ehta Equities चे सीनियर VP रिसर्च प्रशांत तापसी यांनी म्हटलं की, गुंतवणूकदारांचा अपेक्षित प्रतिसाद आणि शेअर बाजारातील मजबूत सेंटिमेंट्स लक्षात घेता, इश्यू 25-30 टक्क्यांच्या प्रीमियमवर लिस्ट होण्याची अपेक्षा केली जात होती. Syrma चे हाय मार्जिन प्रोडक्ट्स पोर्टफोलिओ भविष्यात कंपनीसाठी मोठ्या संधी निर्माण करतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात