सावधान! कॅशमध्ये मोठे व्यवहार केलेत तर येणार इनकम टॅक्स विभागाची नोटीस

सावधान! कॅशमध्ये मोठे व्यवहार केलेत तर येणार इनकम टॅक्स विभागाची नोटीस

इनकम टॅक्स विभाग आता कॅशमधल्या मोठ्या व्यवहारांवर लक्ष ठेवून असेल. या विभागाच्या अधिकाऱ्यांना कॅशमध्ये व्यवहार झाल्याची माहिती मिळाली तर ते थेट तुमच्याशी संपर्क करू शकतात.

  • Share this:

नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी : इनकम टॅक्स विभाग (Income Tax)आता कॅशमधल्या मोठ्या व्यवहारांवर लक्ष ठेवून असेल. या विभागाच्या अधिकाऱ्यांना कॅशमध्ये व्यवहार झाल्याची माहिती मिळाली तर ते थेट तुमच्याशी संपर्क करू शकतात. त्याचबरोबर या विभागातर्फे SMS किंवा ई मेलच्या माध्यमातून तुमच्या व्यवहाराचा तपशील मागवण्यात येईल.

इनकम टॅक्स विभाग आता बँकेच्या सगळ्या व्यवहारांवर रिअल टाइम देखरेख ठेवणार आहे. IT विभाग या व्यवहारांबद्दल करदात्यांना माहिती विचारू शकतं.बँका मोठ्या व्यवहारांबद्दलची माहिती थेट इनकम टॅक्स विभागाला देत नाहीत. याबद्दलचा मासिक किंवा तिमाहीचा तपशील दिला जातो. आता करदात्यांशी संपर्क साधण्यासाठी मोबाइल अॅप लाँच करण्यात येईल.

प्रि फिल्ड रिटर्नमध्ये बदल

आता प्रि फिल्ड रिटर्नमध्ये MF, शेअरमधी कमाईचाही तपशील द्यावा लागेल. डिव्हिडंट, व्याजावरचं इनकम हे फॉर्ममध्ये आधीच दिसेल. 5 हजार रुपयांपेक्षा जादा डिव्हिडंट इनकमवर TDS कापण्याचा नियम आहे. स्वीडनसारख्या देशांनी अशी प्रि फिल्ड टॅक्स रिटर्न्स फॉर्मची संकल्पना आधीच अमलात आणली आहे. भारताने मागच्या वर्षी मर्यादित स्वरूपात याची सुरुवाती केली होती. IT विभाग यासाठी अनेक यंत्रणांकडून माहिती घेईल. ही माहिती SEBI, RBI आणि इतर बँकांकडून मिळेल.

(हेही वाचा : चेक क्लिअर होण्यासाठी फार पाहावी लागणार नाही वाट, लवकरच मिळणार ही सुविधा)

अ‍ॅपच्या माध्यमातून मिळणार माहिती

फायनान्स बिलमध्ये बदल करून इनकम टॅक्स विभागाला हा अधिकार दिला जाईल. याच अधिकारानुसार IT विभाग मोठ्या व्यवहारांवर नजर ठेवेल. करदात्यांना लगेच ही सूचना दिली जाईल. आयटी विभागाच्या अॅपच्या माध्यमातून कराबद्दलची माहिती दिली जाणार आहे. यामुळे बँकेच्या व्यवहारांमध्ये आणि कर भरण्याच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येईल.

=========================================================================

First published: February 7, 2020, 2:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading