निखिल स्वामी,बीकानेर: कोणतंही काम मोठं किंवा लहान नसतं, काम फक्त काम असतं. असं आपण नेहमीच ऐकतो. पण राजस्थानच्या बिकानेर येथील स्वीमिंग कोच विजय शर्मा यांनी हे खरं करुन दाखवलंय. कोराना काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक लोक बेरोजगार झाले होते. त्यात विजय सिंह यांचीही नोकरी गेली. मात्र, विजय यांनी हार मानली नाही आणि या कठीण परिस्थितीतही त्याने धैर्याने स्वतःला उभे केले आणि कुटुंबाचा सांभाळ केला.
विजय यांनी लॉकडाऊनच्या काळात 10 एकर जमीन भाडेतत्त्वावर घेतली. या जमिनीवर त्यांनी पारंपरिक शेती सुरू केली. आज 50 एकर जमिनीवर शेती करून ते भरघोस कमाई करताय. विजय शर्मा म्हणाले की, ते शेतात मोहरी, गहू, मुळा, गवार, बटाट्याची पारंपारिक लागवड करतात. सध्या ते मोहरी, काळ्या गव्हाची लागवड करताय. बटाटा, मुळा, मोहरी यासह अनेक प्रकारच्या भाज्या पिकवल्यानंतर ते बाजारात विकतात असं देखील ते म्हणाले. तर गवार आणि गहू धान बाजारात विकला जातो. यामुळे त्यांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचा नफा मिळतो.
जॉब सोडून पती-पत्नीने लावला चहाचा स्टॉल, आता दुकानासमोर लागतात रांगा!
विजय म्हणाले की, बिचवाल तलावाच्या मागे नाग्गासर येथे ते अनेक बिघा जमिनीत शेती करताय. कोरोना आल्यानंतर स्वीमिंगपूल बंद झाले, त्यानंतर त्यांनी शेती करण्यास सुरुवात केली. सरदार पटेल मेडिकल कॉलेजच्या स्विमिंग पूलमध्ये ते पोहणे शिकवायचे. कोरोनाच्या वेळी स्वीमिंग पूल बंद झाल्यामुळे त्यांनी शेतीचा पर्याय निवडला. हे खूप आरामदायी आहे आणि या कामाची वेगळीच मजा आहे असंही ते म्हणाले.
विजयने म्हणाले की, अनेकांचा समज आहे की शेती करून फायदा होत नाही. मात्र तो चुकीचा आहे. शेती नीट केली तर त्यात नफा जास्त असतो. ही एक प्रकारची कायमस्वरूपी नोकरी आहे. यामुळे कुटुंबातील मुले आणि पत्नी आनंदी असल्याचे ते सांगतात. आजकाल बहुतेक मुलांनी शेत पाहिलेले नाही, म्हणून ते आपल्या मुलांना शेती आणि जनावरांची ओळख करून देतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business, Business News, Start business