मुंबई, 22 फेब्रुवारी : फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Swiggy पुढील वर्षी त्याच्या IPO द्वारे 80 कोटी डॉलर म्हणजेच 6 हजार कोटी जमा करण्याचा विचार करत आहे. Nikkei Asia च्या अहवालानुसार, प्रतिस्पर्धी कंपनी Zomato च्या अडचणींदरम्यान बाजारातील हिस्सा वाढवण्यासाठी निधी उभारण्याच्या आशेने कंपनीने ही तयारी सुरू केली आहे. अहवालात असे म्हटले आहे की कंपनी केवळ फूड डिलिव्हरी फर्म म्हणून न राहता एक लॉजिस्टिक कंपनी म्हणून स्थान मिळवण्याची योजना आखत आहे. अलीकडेच डेकाकॉर्न स्विगी बनले स्विगी नुकतीच 10.7 बिलियन वॅल्युएशनसह 700 मिलियन डॉलर जमा करून डेकाकॉर्न बनली. Decacorns 10 अब्ज डॉलरपेक्षा जास्त मूल्य असलेल्या कंपन्या आहेत. अशा प्रकारे, अवघ्या सहा महिन्यांत कंपनीचे मूल्यांकन जवळपास दुप्पट झाले आहे आणि कंपनीचे हे मूल्यांकन Zomato पेक्षा जास्त आहे. यापूर्वी, स्विगीने जुलै 2021 मध्ये झालेल्या शेवटच्या फंड राऊंडमध्ये सॉफ्टबँक व्हिजन फंड 2, प्रोसस, एक्सेल आणि वेलिंग्टन मधून 5.5 अब्ज डॉलरच्या मुल्यांकनासह 1.25 अब्ज जमा केले होते. त्यांच्याकडून एप्रिल 2020 मध्ये 3.6 अब्ज डॉलर मुल्यांकनाने निधी उभारण्यात आला. Upcoming IPO : पुढील महिन्यात कमाईची मोठी संधी, 8 आयपीओ येणार; चेक करा डिटेल्स या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक फेरीत सहभाग घेतला 70 कोटी डॉलर गुंतवणुकीच्या फेरीत बॅरन कॅपिटल ग्रुप, सुमेरू व्हेंचर, IIFL AMC लेट स्टेट टेक फंड, कोटक, अॅक्सिस ग्रोथ अॅव्हेन्यूज AIF-1, सिक्स्टीन स्ट्रीट कॅपिटल, घिसेलो, स्माईल ग्रुप आणि सेगंटी कॅपिटल सारख्या नवीन गुंतवणूकदारांनी सहभाग घेतला. या फेरीत विद्यमान गुंतवणूकदार अल्फा वेव्ह ग्लोबल (पूर्वीचे फाल्कन एज कॅपिटल), कतार गुंतवणूक प्राधिकरण आणि ARK इम्पॅक्ट तसेच दीर्घकालीन गुंतवणूकदार प्रोसस उपस्थित होते. Crude Oil : कच्च्या तेलाच्या किमती सात वर्षातील सर्वोच्च पातळीवर, किंमत 100 डॉलर जवळ झोमॅटोसह अनेक नव्या युगातील टेक शेअर्सवर दबाव Swiggy च्या IPO साठी वाढत्या निधी उभारणीची आणि मूल्यांकनाची बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा गेल्या वर्षी जुलैमध्ये स्टॉक मार्केटमध्ये पदार्पण केल्यानंतर त्याच्या प्रतिस्पर्धी Zomato चे बाजार भांडवल लक्षणीयरीत्या खाली आले आहे. त्याचप्रमाणे Paytm, Nykaa सारख्या नवीन युगातील टेक शेअर, जे नुकतेच लिस्ट झाले होते, त्यांच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. देशात कोविडमुळे लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेल्या फूडटेक प्लॅटफॉर्म स्विगीचा ऑपरेटिंग महसूल 2019-20 या आर्थिक वर्षातील 3,468 कोटी रुपयांच्या तुलनेत 27 टक्क्यांनी घसरून 2020-21 या आर्थिक वर्षात 2,547 कोटी रुपयांवर आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.