मुंबई, 22 फेब्रुवारी : मागील वर्ष आयपीओच्या दृष्टीने उत्तम होते. त्यावेळी 65 कंपन्यांनी IPO मधून 1.35 लाख कोटी रुपये उभे केले होते. या वर्षीही अनेक कंपन्या त्यांचे IPO आणणार आहेत. गुंतवणूकदारांसाठी बंपर पैसे कमावण्याची ही चांगली संधी आहे. तुम्हालाही IPO मध्ये गुंतवणुकीत (Investment in ipo) रस असेल, तर तुम्ही कंपन्यांच्या पब्लिक ऑफरद्वारे चांगला नफा मिळवू शकता. आठ कंपन्यांचे आयपीओ पुढील महिन्यात येत आहेत. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC चा IPO 11 मार्चला येण्याची (LIC IPO date) शक्यता आहे. यामध्ये अँकर गुंतवणूकदारांना प्रथम संधी मिळेल. त्यानंतरच सामान्य गुंतवणूकदार ते खरेदी करू शकतील. मार्चमध्ये, LIC व्यतिरिक्त, SBI Mutual Fund, Byju’s, Ola यासह अनेक कंपन्या त्यांचे IPO आणत आहेत. LIC IPO भारतीय आयुर्विमा महामंडळाचा आतापर्यंतचा बहुप्रतिक्षित IPO 11 मार्च रोजी येत आहे. यात सरकार आपला 5 टक्के हिस्सा विकण्याचा विचार करत आहे. त्यातून 60,000 ते 90,000 कोटी रुपयांची उभारणी अपेक्षित आहे. या IPO नंतर, LIC रिलायन्स इंडस्ट्रीज आणि TCS नंतर तिसरी सर्वात मोठी कंपनी बनेल. Investment Tips : सीनियर सिटिजन्ससाठी या बँकांमध्ये खास सुविधा, सुरक्षेसह मिळेल अधिकचे व्याज OYO IPO OYO रूम्स आणि हॉटेल्स मार्चमध्ये त्यांचा IPO लॉन्च करेल अशी अपेक्षा आहे. हॉस्पिटॅलिटी उद्योगाशी संबंधित कंपनी 8,430 कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे. IPO 7,000 कोटी रुपयांपर्यंतचे नवीन इश्यू आणि 1,430 कोटी रुपयांपर्यंतची ऑफर फॉर सेल करेल. OLA IPO कंपनी 15,000 कोटी रुपये उभारण्यासाठी IPO आणत आहे. IPO कंपनीच्या इतर गुंतवणूकदारांना जसे की सॉफ्टबँक, टायगर ग्लोबल आणि स्टेडव्ह्यू कॅपिटल यांना त्यांचे शेअर्स विकण्यासाठी किंवा भागधारकांच्या निधीची भरपाई करण्यासाठी बाहेर पडण्यास मदत करेल. Delhivery IPO ई-कॉमर्स लॉजिस्टिक फर्म Delhivery 7,460 कोटी रुपये उभारण्यासाठी आपला IPO लॉन्च करणार आहे. कंपनी 2,460 कोटींच्या ऑफर फॉर सेलसह 5,000 कोटी रुपयांपर्यंतचे शेअर्सचे फ्रेश इश्यू सादर करणार आहे. अशी अपेक्षा आहे की विद्यमान भागधारक त्यांच्या स्टेकचा काही भाग कमी करतील. BYJU IPO Edtech आणि देशातील सर्वात वॅल्युएबल स्टार्टअप कंपनी Byju’s लवकरच त्यांचा IPO लॉन्च करणार आहे. ते 4 अब्ज डॉलर ते 6 अब्ज डॉलर दरम्यान निधी उभारण्यासाठी IPO आणत आहे. IDBI बँकेतली आपली संपूर्ण हिस्सेदारी LIC विकणार नाही; काय आहे प्लानिंग? NSE IPO भारतातील सर्वात मोठे नॅशनल स्टॉक एक्स्चेंज 10,000 कोटी रुपये उभारण्यासाठी आयपीओ लॉन्च करण्याची योजना आखत आहे. SBI, LIC, IFCI, IDBI बँक, गोल्डमन सॅक्स, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन, टायगर ग्लोबल आणि सिटीग्रुप हे कंपनीचे प्रमुख भागधारक आहेत. PHARMEASY IPO फार्मास्युटिकल कंपनी PHARMEASY 6,250 कोटी रुपये उभारण्यासाठी लवकरच आपला IPO आणणार आहे. यासाठी त्यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये सेबीकडे मसुदा सादर केला. SBI Mutual Fund IPO SBI आपल्या म्युच्युअल फंड युनिटमधील हिस्सा विकण्यासाठी IPO आणणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेला त्यांच्या म्युच्युअल फंड युनिटमधील 6 टक्के हिस्सा विकायचा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.