जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Success Story: वयाच्या 11 व्या वर्षी कमावले 400 कोटी, बॉलिवूड स्टार्सपेक्षाही जास्त इन्कम!

Success Story: वयाच्या 11 व्या वर्षी कमावले 400 कोटी, बॉलिवूड स्टार्सपेक्षाही जास्त इन्कम!

चिमुकली यूट्यूबर

चिमुकली यूट्यूबर

Success Story: शफाचे यूट्यूब चॅनल, तिची आई मॅनेज करते आणि आता ती एक यशस्वी बिझनेसमन बनली आहे. या चॅनलच्या व्हिडिओला 22 बिलियनपेक्षा जास्त वेळा पाहिले गेलेय. ज्यामधून तगडी कमाई केली जाते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

Success Story: एंटरटेनमेंटसोबतच सोशल मीडिया हेही उत्पन्नाचे प्रमुख साधन बनत आहे. YouTube सारख्या व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर अ‍ॅक्टिव्ह असलेले अनेक इंफ्लुएंशर्स दरमहा लाखो आणि करोडो रुपये कमावत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या नोकरीसाठी कोणतीही पदवी, वय किंवा अनुभव आवश्यक नाही. तर यासाठी कौशल्य आवश्यक आहे. प्रसिद्ध यूट्यूबर्सच्या या यादीत एक 11 वर्षांची मुलगी देखील आहे. विशेष म्हणजे ही मुलगी दर महिन्याला इतके पैसे कमावते की कोणत्याही कंपनीच्या सीईओला इतका पगार मिळत नाही. यूट्यूबवरुन दरमहा कोट्यवधी कमावणारी ही मुलगी शफा आहे. जी जगभरातील लहान मुलांमध्ये प्रसिद्ध आहे. डिसेंबर 2011 ला जन्मलेली सऊदी अरबमधील राहणारी शफा यूट्यूबवर एक प्रसिद्ध पर्सनालिटी आहे. चला तर मग जाणून घेऊया सफाच्या सक्सेस स्टोरीविषयी तसंच तिने हे स्थान कसं मिळवलं याविषयीही सविस्तर जाणून घेऊया. Bank Account: तुम्ही आपल्या देशात किती बँक अकाउंट ओपन करु शकता? काय सांगतो RBI चा नियम? शफा जगभरातील मुलांच्या मनावर राज्य करते YouTube वरील शफाच्या लोकप्रिय व्हिडिओंमध्ये डिअर फ्रोझन कॅरेक्टर्स, एल्सा आणि अ‍ॅना यांचा समावेश आहे. युनायटेड अरब अमिराती (UAE) मध्ये राहणाऱ्या शाफाने च्या व्हिडिओंची शीर्षके अरबीमध्ये आहेत. शफाचे यूट्यूब चॅनल, तिची आई मॅनेज करते. आता ते चॅनल एक यसशस्वी बिझनेस वेंचर बनले आहे. शफाचे यूट्यूब चॅनल 29 मार्च 2015 रोजी सुरू झाले. त्यावेळी तिचं वय अवघे 4 वर्षे होते. शफाने अल्पावधीतच जगभरातील मुलांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे. शफाच्या यूट्यूब चॅनेलचे सुमारे 40 मिलियन यूझर्स आहेत. या चॅनेलचे व्हिडिओ 22 बिलियनपेक्षा अधिक वेळा पाहिले गेले आहेत, जे मोठ्या कमाईचे साधन बनले आहे. Property Rule : रेंट अ‍ॅग्रीमेंटचं रजिस्ट्रेशन कसं करायचं? ही आहे ऑनलाइन प्रोसेस YouTube डेटा आणि एबीपीच्या रिपोर्टनुसार, शफाला प्रति 1000 व्ह्यूजवर 1.21 डॉलर मिळतात. जे जवळपास 100 रुपयांच्या बरोबरीने आहेत. मे 2023 मध्ये शफाने YouTube वरुन 200,000 डॉलर कमावले आहे. तसंच अनेकदा यतिची कमाई 300,000 डॉलर म्हणजेच 2 कोटी 46 लाख रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. गेल्या 8 वर्षात शफाने तिच्या यूट्यूब चॅनलवर 984 व्हिडिओ अपलोड केले आहेत. या 11 वर्षाच्या मुलीने आपल्या अभिनय कौशल्याने कोट्यवधी रुपये कमावले. सध्या शफाची अंदाजे एकूण संपत्ती 50 मिलियन डॉलर आहे, जी 410 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात