Home /News /money /

Russia-Ukraine युद्धाने शेअर बाजाराला हादरे, बाजार 12 सेशनमध्ये 4000 अंकांनी खाली

Russia-Ukraine युद्धाने शेअर बाजाराला हादरे, बाजार 12 सेशनमध्ये 4000 अंकांनी खाली

Share Market : 15 फेब्रुवारीपासून सेन्सेक्स जवळपास 4000 अंकांनी घसरला आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे 197 बिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे.

    मुंबई, 5 मार्च : युद्धामुळे जगभरातील शेअर बाजारांची अवस्था बिकट झाली आहे. भारतीय शेअर बाजारही सातत्याने खाली येत आहेत. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी सेन्सेक्स निफ्टीही मोठ्या घसरणीसह बंद झाला. काल शुक्रवारी सेन्सेक्स 768.87 अंकांच्या किंवा 1.40 टक्क्यांच्या घसरणीसह 54,333.81 वर बंद झाला. दुसरीकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी 252.60 अंकांनी म्हणजेच 1.53 टक्क्यांनी घसरून 16,245.40 वर बंद झाला. अवघ्या एका दिवसात भारतीय गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटींहून अधिक रुपये बुडाले. शुक्रवारी सेन्सेक्स 54,333 अंकांवर बंद झाला. 23 फेब्रुवारी रोजी तो 57232 अंकांवर बंद झाला. हल्ल्याच्या वृत्तामुळे 24 फेब्रुवारी रोजी भारतीय शेअर बाजार 2700 अंकांनी घसरला होता. पण, त्यानंतरच्या बऱ्यापैकी सावरण्यात यशस्वी झाला. 15 फेब्रुवारीपासून भारतीय गुंतवणूकदारांचे 15 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. 15 फेब्रुवारीपासून रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला करण्याची तयारी सुरू केली. नंतर त्यांनी मोठ्या हल्ल्यासाठी सीमेवरून आपले काही सैन्य मागे घेण्याची घोषणा केली. Home Loan ट्रान्सफर करुन EMI 5000 रुपयांनी कमी करा, संपूर्ण कॅलक्युलेशन समजून घ्या हल्ल्यानंतर 10 दिवस रशियाने 24 फेब्रुवारीला सकाळी युक्रेनवर हल्ला केला. हल्ल्याचा आज 9वा दिवस आहे. 24 फेब्रुवारीपासून सेन्सेक्स सुमारे 3000 अंकांनी घसरला आहे. या दरम्यान निफ्टी 818 अंकांनी घसरला आहे. 15 फेब्रुवारीपासून सेन्सेक्स जवळपास 4000 अंकांनी घसरला आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे 197 बिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी प्रथम युक्रेनमधील लुहान्स्क आणि डोनेत्स्क या दोन प्रदेशांना स्वतंत्र प्रांत म्हणून घोषित केले. त्यानंतर 23 फेब्रुवारीला त्यांनी आणीबाणी जाहीर केली. 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर हल्ला झाला. यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे शुक्रवारी सकाळी युक्रेनच्या सर्वात मोठ्या अणुभट्टीला आग लागल्याचे वृत्त आहे. मात्र, ही आग विझवण्यात आली. Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे दर 15 रुपयांना वाढू शकतात, ऑईल कंपन्या सध्या मोठ्या तोट्यात संकट लवकर संपण्याची शक्यता कमी  बाजारावरील दबाव कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याचे कारण युक्रेनचे संकट अद्याप संपण्याची आशा नाही. चर्चेच्या तीन फेऱ्या होऊनही कोणताही निकाल लागलेला नाही. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या वृत्तीत कठोर निर्बंधानंतरही बदल झालेला नाही. अशा स्थितीत गुंतवणूकदारांनी सावध राहण्याची गरज आहे. त्यांनी एकाच वेळी जास्त गुंतवणूक करणे टाळावे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Russia Ukraine, Share market

    पुढील बातम्या