मुंबई, 28 मे : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसी बँकेवर (HDFC Bank) 10 कोटी रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायद्याच्या कलम 6 (2) आणि कलम 8 मधील तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळं हा दंड लावण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. नियामक अनुपालनातील अनियमिततेमुळं ही कारवाई करण्यात आल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सांगण्यात आले आहे. बँकेच्या वाहन कर्जाच्या पोर्टफोलिओसंदर्भात अनेक व्हिस्लॉब्लॉर तक्रारी आढळून आल्या होत्या. आरबीआय(RBI) कडून करण्यात आलेल्या तपासणीत अनेक अनियमित कामे आढळून आली, त्यामुळं कारवाईचं पाऊल उचलावं लागल्याचं रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. ICICI बँकेलाही नुकताच 3 कोटींचा दंड ठोठावला होता एचडीएफसी बँकेवरील कारवाई अगोदर अलिकडंच आरबीआयनं आयसीआयसीआय बँकेला 3 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. याबाबत बँकेनं आपल्या निवेदनात सांगितलं आहे की, हा दंड 1 जुलै 2015 रोजी जारी करण्यात आलेल्या मास्टर सर्क्युलेशन-प्रूडेंशियल नॉर्म फॉर क्लासिफिकेशन वॅल्यूएशन अँण्ड ऑपरेशन ऑफ इन्वेस्टमेंट पोर्टफोलियो बाय बॅक्सच्या महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचनांच उल्लंघन केल्यामुळं लावण्यात आला आहे. नियामक अनुपालनातील अनियमिततेमुळं ही कारवाई करण्यात आल्याचे रिझर्व बँकेने म्हटले होते. हे वाचा - जालना : भाजप कार्यकर्त्याला मारहाण करणारे ते पोलिस कर्मचारी अखेर निलंबित, पोलिस अधीक्षकांची कारवाई रिझर्व्ह बँकेनं महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेलाही दंड ठोठावला नुकतेच रिझर्व्ह बँकेनं नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेवर दंडात्मक कारवाई केली होती. याबाबत आरबीआयकडून सांगण्यात आले होते की, सुपरवाइजरी अॅक्शन फ्रेमवर्क (SAF) नुसार जारी करण्यात आलेल्या काही मार्गदर्शक सूचनांचे पालन केलं गेलं नसल्यानं प्रियदर्शिनी महिला नागरी सहकारी बँकेला (Priyadarshini Mahila Nagari Sahakari Bank) 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. याबाबत आरबीआयनं सांगितलं की, बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट, 1949 नुसार कलम -47 ए(1)(सी) चे उपकलम-46 (4)(आय)चे उल्लंघन होत असल्यानं आरबीआयकडे असलेल्या अधिकारांतर्गत या बँकेवर हा दंड ठोठावण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.