नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : कोरोनाच्या संकटात देशातील सर्वात मोठी बॅंक SBI तुम्हाला स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी देत आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या वतीनं एका मेगा लिलाव प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले आहेत. या लिलावात फक्त घरच नव्हेत तर प्लॉट, दुकानंही असणार आहेत. 30 सप्टेंबर रोजी हा लिलाव होणार असून, यावेळी 1000हून अधिक मालमत्ता विकल्या जाणार आहेत. SBI कर्जाच्या विरोधात तारण ठेवलेल्या मालमत्तांचा 30 सप्टेंबर रोजी लिलाव होणार आहे. कर्ज घेतलेल्या ज्या लोकांना कर्जाची रक्कम भरता आली नाही, त्यांची जप्त केलेली ही मालममत्ता असून आता थकबाकी वसूल करण्यासाठी SBI यांचा लिलाव करणार आहे. मुख्य म्हणजे हा लिलाव ऑनलाइन असेल. बॅकेने दिलेल्या माहितीनुसार, हा लिलाव अत्यंत पारदर्शक पद्धतीने असेल, यामध्ये फ्लॅट्स, प्लॉट्स आणि दुकानांचा समावेश आहे. वाचा- बँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना स्टेट बॅंकेनं आपल्या ट्विटर हॅंडलवरून या लिलावाटी माहिती दिली आहे. यासाठी तुम्ही बॅंकेच्या जवळच्या शाखेशीही संपर्क साधू शकता. वाचा- चेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो? RBI घेऊन येतंय नवीन सुविधा असा घ्या मेगा लिलावात भाग -ई-लिलावात भाग घेण्यासाठी नमूद केलेल्या विशिष्ट मालमत्तेसाठी ईएमडी, KYC कागदपत्रे संबंधिक बॅंकेत जमा करणं गरजेचे आहे. -यासाठी डिजिटल स्वाक्षरीची गरज असेल. ई-लिलाव किंवा इतर कोणत्याही अधिकृत एजन्सीसाठी यासाठी संपर्क साधू शकता. -ई-लिलावासाठी आयडी-पासवर्ड KYC कागदपत्रे जमा केल्यानंतर मिळेल. -नियमांनुसार ई-लिलावाच्या तारखेला ठरलेल्या वेळएत लॉग इन करून बोली लावावी लागेल. यासंबंध लिंक बॅंकेच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. यासंबंधी माहिती https://www.bankeauifications.com/Sbi वर मिळू शकेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.