जाहिरात
मराठी बातम्या / मनी / खूशखबर! 8 दिवसांनी ग्राहकांना पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मिळाला दिलासा,'हे' आहेत दर

खूशखबर! 8 दिवसांनी ग्राहकांना पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मिळाला दिलासा,'हे' आहेत दर

खूशखबर! 8 दिवसांनी ग्राहकांना पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मिळाला दिलासा,'हे' आहेत दर

Petrol, Diesel - जाणून घ्या पेट्रोल-डिझेलच्या आजच्या किमती

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 सप्टेंबर : आज बुधवारी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत काही बदल झाले नाहीत. सौदी अमरकोवर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर डिझेल आणि पेट्रोलच्या किमती वाढतच होत्या. दिल्लीत 8 दिवसांत पेट्रोलची किंमत 2.10 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 1.54 रुपये प्रति लीटर महाग झाली होती. पेट्रोल-डिझेलच्या नव्या किमती इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईत पेट्रोलचे दर 74.13 रुपये, 79.79 रुपये, 76.82 रुपये आणि 77.06 रुपये प्रति लीटर झालीय. चार महानगरांमध्ये डिझेलचे दर 67.07 रुपये, 70.37 रुपये, 69.49 रुपये आणि 70.91 रुपये प्रति लीटर झालेत. रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर (excise duty), डीलर कमीशन या सर्व बाबी मिळून इंधनाच्या दरामध्ये वाढ होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर अवलंबून असतात. अशी मिळवा माहिती विशेष नोंदणीकृत क्रमांकावर SMS पाठवून तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाच्या दरांबाबत माहिती मिळवता येईल. पण ही सुविधा आपल्या फोनवरून उपलब्ध व्हावी, यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी तुम्हाला कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. SMS सुविधा मिळवण्यासाठी कोड असणं आवश्यक आहे. एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड> 9222201122 या क्रमांकावर सुविधा पाठवून तुम्हाला इंधनाचे दर स्मार्टफोनवरच मिळवता येतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: petrol
  • First Published :
जाहिरात
जाहिरात