मराठी बातम्या /बातम्या /मनी /विद्यार्थ्यांनो, आता बिनधास्त घ्या परदेशात शिक्षण; SBI देणार तब्बल 1.5 कोटींपर्यंत लोन; असं करा लोनसाठी अप्लाय

विद्यार्थ्यांनो, आता बिनधास्त घ्या परदेशात शिक्षण; SBI देणार तब्बल 1.5 कोटींपर्यंत लोन; असं करा लोनसाठी अप्लाय

एसबीआय ग्लोबल एड-व्हँटेज (SBI Global Ed-Vantage) असं या कर्ज योजनेचं नाव आहे.

एसबीआय ग्लोबल एड-व्हँटेज (SBI Global Ed-Vantage) असं या कर्ज योजनेचं नाव आहे.

एसबीआय ग्लोबल एड-व्हँटेज (SBI Global Ed-Vantage) असं या कर्ज योजनेचं नाव आहे.

    नवी दिल्ली,  24 ऑगस्ट : परदेशात शिक्षण (Study Abroad) घेण्याचं बऱ्याच जणांचं स्वप्न असतं. पण, त्यासाठी येणारा खर्च पाहता, कित्येकांसाठी हे स्वप्नच राहतं. हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी एसबीआयने एक विशेष योजना (SBI Education loan) जाहीर केली आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 7.50 लाख ते 1.50 कोटी रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) एक नवी एज्युकेशन लोन योजना आणली आहे. एसबीआय ग्लोबल एड-व्हँटेज (SBI Global Ed-Vantage) असं या कर्ज योजनेचं नाव आहे.

    स्टेट बँक ऑफ इंडियाने सांगितलं, की देशातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात (Education loan for higher studies) जाता यावं, यासाठी ही योजना लाँच करण्यात आली आहे. या एज्युकेशन लोनच्या माध्यमातून बाहेरच्या देशात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे.

    या योजनेमध्ये (SBI student’s loan) रेग्युलर ग्रॅज्युएट डिग्री (Regular Degree), पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री (PG Degree), डिप्लोमा कोर्स आणि सर्टिफिकेट किंवा डॉक्टरेट कोर्स यांपैकी कोणत्याही कोर्ससाठी कर्ज मिळू शकतं. तसंच, अमेरिका (US), युनायटेड किंग्डम (UK), युरोप, जपान, सिंगापूर, हाँगकाँग, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि न्यूझीलंड या देशांमध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.

    हे वाचा - खूशखबर! ESIC अंतर्गत येणार 30000 रुपयांपर्यंत पगार मिळवणारे कर्मचारी?

    एसबीआयच्या या योजनेमधून तुम्हाला साडेसात लाख ते दीड कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. या कर्जासाठी द.सा.द.शे. 8.65 टक्के व्याजदर (SBI Education loan) आकारण्यात येईल. मुलींच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून या व्याजदरात विशेष सूटही (Discount for Female students) देण्यात येत आहे. मुलींसाठी 8.15 टक्के व्याजदर आकारण्यात येईल. या कर्जामध्ये जाण्या-येण्याचा खर्च, ट्यूशन फी, पुस्तकांचा खर्च, लायब्ररी आणि लॅब फी, परीक्षा फी, प्रोजेक्ट वर्कसाठी येणारा खर्च, थिसीस आणि स्टडी टूरसाठी येणारा खर्च अशा प्रकारच्या खर्चांसाठी तरतूद करण्यात आली आहे.

    या लोनसाठी तुम्हाला दहावी, बारावी आणि ग्रॅज्युएशनची मार्कशीट, तसेच एंट्रन्स एक्झॅमच्या निकालाची (SBI Education loan documents) आवश्यकता आहे. यासोबतच, ॲडमिशन प्रूफसाठी ॲडमिशन लेटर किंवा कॉलेजकडून देण्यात आलेलं ऑफर लेटर दाखवावं लागेल. ॲडमिशनसाठी येणारा खर्च, स्कॉलरशिप, फ्री शिप या सगळ्याची पूर्ण माहिती तुम्हाला बँकेला द्यावी लागेल. जर तुमच्या शिक्षणात मध्ये गॅप असेल, तर गॅप सर्टिफिकेटही तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. यासोबतच, पासपोर्ट साईजचे काही फोटो, विद्यार्थ्याचं आणि पालकांचं पॅन कार्ड, आधार कार्डची झेरॉक्स तसेच विद्यार्थ्याच्या पालकांचे मागील सहा महिन्यांचे बँक अकाउंट स्टेटमेंट अशा कागदपत्रांची आवश्यकता आहे.

    कर्ज घेतल्यानंतर सहा महिन्यांनी तुम्ही रिपेमेंट (SBI Education Loan repayment) करू शकता. कर्जाची पूर्ण रक्कम परत करण्यासाठी 15 वर्षांची मुदत मिळते. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही परदेशात शिक्षण घेण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण करू शकाल.

    First published:
    top videos

      Tags: Instant loans, Money, SBI