नवी दिल्ली, 11 मार्च: ऑनलाइन पेमेंट यंत्रणा (Online Payment) अजून भारतात सर्वदूर पोहोचली नसली, तरी या यंत्रणेचा वापर वाढला आहे, हे निश्चित. त्यासाठीच्या पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाची उपलब्धता जसजशी होत आहे, तसतसा हा वापर वाढत चालला आहे. कोरोनाच्या काळात तर डिजिटल पेमेंट (Digital Payment) सुविधा वापरणाऱ्यांची संख्या वेगाने वाढली. आता तर कार्ड किंवा मोबाइलही सोबत नसला तरीही पेमेंट करणं शक्य होऊ शकणार आहे.
आतापर्यंत लोक टच अँड पे किंवा यूपीआय किंवा डेबिट अथवा क्रेडिट कार्डद्वारे पेमेंटचा पर्याय वापरत होते. वेअरेबल डिव्हाइसच्या (Wearable Device) माध्यमातूनही तुम्हाला पेमेंट (Wearable Device Payment) करता येणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अॅक्सिस बँकेने भारतात काँटॅक्टलेस पेमेंट्ससाठी (Contactless Payments) ही विशेष सेवा द्यायला सुरुवात केली आहे. झी-न्यूजने त्याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
दोन्ही बँकांकडून या पेमेंटसाठी खास घड्याळे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ही घड्याळे पेमेंट मशीनच्या जवळ आणताच त्या माध्यमातून लगेच पेमेंट होतं.
हे वाचा - भारतीय युट्यूबर्सच्या कमाईत होणार घट; काय आहे कारण?
अलिकडेच रिझर्व्ह बँकेने काँटॅक्टलेस व्यवहारांची (Contactless Transactions) मर्यादा दोन हजारांवरून वाढवून 5000 रुपयांपर्यंत नेली आहे. याचाच अर्थ असा, की पाच हजार रुपयांपर्यंतच्या पेमेंटसाठी पिन नंबर टाकण्याची गरज नाही. वाय-फाय कार्ड किंवा वेअरेबल डिव्हाइसच्या सह्याने पेमेंट करता येतं.
हे तंत्रज्ञान भारतात नव्याने आलं असलं, तरी ते तंत्रज्ञान नवं नाही. अमेरिका आणि युरोपसह अनेक देशांमध्ये स्मार्टवॉचच्या सह्याने पेमेंट्स केली जातात. अॅपल, सॅमसंग आणि फिटबिटच्या स्मार्टवॉचमध्ये (Smartwatch) पेमेंट ऑप्शन आधीपासूनच उपलब्ध आहे.
हे वाचा - Paytm Sale: पेटीएम मॉलकडून बंपर डिस्काउंटसह महाशॉपिंग फेस्टिवलची घोषणा
कोरोना महासाथीच्या काळात रोखीने पैसे देण्यास किंवा कार्डने पेमेंट करण्यास लोक कचरत होते. त्यामुळे काँटॅक्टलेस अर्थात स्पर्शही होणार नाही अशा पद्धतीने पेमेंटच्या या पद्धतीसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अॅक्सिस बँकेने पुढाकार घेतला.ॉ
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.