मराठी बातम्या /बातम्या /मनी /GST Rules : नवीन व्‍यवसाय सुरू करताय? जीएसटीचे नियम माहिती करून घ्या

GST Rules : नवीन व्‍यवसाय सुरू करताय? जीएसटीचे नियम माहिती करून घ्या

जीएसटीच्या नियमांचं पालन करणं प्रत्येक व्यापारी, व्यावसायिकाला अनिवार्य असून, नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर शिक्षेची आणि दंडाची तरतूद आहे. या करप्रणालीमुळे देशातली व्यावसायिक कररचना अधिक सुटसुटीत झाली आहे.

जीएसटीच्या नियमांचं पालन करणं प्रत्येक व्यापारी, व्यावसायिकाला अनिवार्य असून, नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर शिक्षेची आणि दंडाची तरतूद आहे. या करप्रणालीमुळे देशातली व्यावसायिक कररचना अधिक सुटसुटीत झाली आहे.

जीएसटीच्या नियमांचं पालन करणं प्रत्येक व्यापारी, व्यावसायिकाला अनिवार्य असून, नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर शिक्षेची आणि दंडाची तरतूद आहे. या करप्रणालीमुळे देशातली व्यावसायिक कररचना अधिक सुटसुटीत झाली आहे.

  मुंबई, 29 नोव्हेंबर : कोणत्याही वस्तूची खरेदी (Buy) किंवा विक्री (Sale) केली तर त्यावर कर (Tax) द्यावा लागतो. हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. एवढंच नव्हे, तर वस्तू एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवतानाही कर भरावा लागतो. प्रत्येक राज्याचे (State) यासाठीचे नियम वेगळे आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना, व्यावसायिकांना वेगवेगळ्या करप्रणालीनुसार कर भरावे लागत असत. त्यामुळे व्यावसायिक उत्पन्नावर करआकारणी सरकारलाही अडचणीची ठरत असे. या सगळ्या बाबींचा विचार करून देशात सर्वत्र एकसारखी करप्रणाली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि 'एक देश एक कर' या संकल्पनेवर आधारित वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी (GST) करप्रणाली लागू करण्यात आली. जीएसटी अंतर्गत सर्व उत्पादनं आणि सेवांसाठी कर देणं अपरिहार्य आहे. सरकारने पेट्रोल-डिझेलसारख्या काही गोष्टी अद्याप या कराच्या कक्षेबाहेर ठेवल्या आहेत. जीएसटीच्या नियमांचं पालन करणं प्रत्येक व्यापारी, व्यावसायिकाला अनिवार्य असून, नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर शिक्षेची आणि दंडाची तरतूद आहे. या करप्रणालीमुळे देशातली व्यावसायिक कररचना अधिक सुटसुटीत झाली आहे. समजा, तुम्हाला एखादा लहान -मोठा व्यवसाय (Business) करायचा आहे; पण तुम्ही त्यासाठी आवश्यक असलेला जीएसटी नंबर (GST Number) घेतलेला नसेल, तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. 'टीव्ही 9 हिंदी'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

  जीएसटी दोन प्रकारचा असतो. एक केंद्र सरकारचा (Central GST) आणि एक राज्य सरकारचा (State GST). कोणतीही सेवा किंवा उत्पादन खरेदी केल्यास किंवा विकल्यास त्यावर हे दोन्ही कर लागू होतात. त्यामुळे ग्राहकांकडून मालाची किंमत घेताना या कराचा विचार करून किंमत निश्चित करणं महत्त्वाचं असतं.

  Business Idea : Amul सोबत व्यवसाय सुरु करा आणि कमवा लाखो रुपये

  जीएसटी करप्रणाली अंतर्गत प्रत्येक व्यापाऱ्याला एक नंबर दिला जातो. त्या क्रमांकाच्या आधारे करवसुली केली जाते; मात्र तुमच्याकडे जीएसटी नंबर नसेल आणि तुम्ही एखाद्या जीएसटी नंबर असलेल्या व्यापाऱ्याकडून माल खरेदी केलात तर तुम्हाला जीएसटी भरावा लागेल. तुम्ही तो माल दुसऱ्या कोणाला विकला तर तुम्ही त्यावर जीएसटी लावू शकत नाही. तुम्हाला कर न लावता त्या वस्तूची विक्री करावी लागेल. यामुळे तुमच्या नफ्यावर परिणाम होईल किंवा तुम्हाला तोटाही सहन करावा लागू शकतो. तुम्ही ज्याच्याकडून माल घेतला आहे, त्याच्याकडून जीएसटी मागू शकत नाही किंवा विक्री करताना आकारणी करू शकत नाही. त्यामुळे माल विक्री करताना तुम्हाला जीएसटी लावायचा असेल तर जीएसटी नंबर घेणं अनिवार्य आहे.

  'ओमिक्रॉन'चा दबाव, शेअर बाजारात पडझड सुरुच; फार्मा सेक्टरव्यतिरिक्त सर्व सेक्टर लाल निशाण्यावर

  तुमच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 20 लाखांपेक्षा अधिक असेल तर तुम्हाला जीएसटी नंबर घेणं अत्यावश्यक आहे. तसंच व्यवसाय सुरू करतानाच जीएसटी प्रणालीअंतर्गत नोंदणी करून जीएसटी नंबर घेणं महत्त्वाचं आहे. अन्यथा करआकारणी करता येणार नाही आणि मोठा फटका सोसावा लागेल.

  First published:
  top videos

   Tags: Business, GST, Money