मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Business Idea : Amul सोबत व्यवसाय सुरु करा आणि कमवा लाखो रुपये

Business Idea : Amul सोबत व्यवसाय सुरु करा आणि कमवा लाखो रुपये

अमूल दोन प्रकारच्या फ्रेंचायझी देत ​​आहे. प्रथम अमूल आउटलेट, अमूल रेल्वे पार्लर किंवा अमूल किओस्कची फ्रँचायझी आणि दुसरी अमूल आइस्क्रीम स्कूपिंग पार्लरची फ्रँचायझी. जर तुम्हाला पहिली गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला 2 लाख रुपये गुंतवावे लागतील.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 29 नोव्हेंबर : एखादा व्यवसाय (Business Idea) करायचं डोक्यात असेल मात्र चांगली आयडिया सूचत नसेल तर आज एका व्यवसायाच्या संधीबद्दल तुम्हाल सांगणार आहोत. या व्यवसायाची सुरुवात करून तुम्ही पहिल्या दिवसापासून पैसे कमवू शकता. अमूल या डेअरी प्रोडक्ट (Amul Dairy Products) बनवणाऱ्या कंपनीसोबत व्यवसाय करण्याची यावेळी मोठी संधी आहे. अमूल कंपनी वेळोवेळी फ्रँचायझी (Amul Franchisee) देत ​​असते. यामध्ये छोट्या गुंतवणुकीतून दर महिन्याला नियमित कमाई करता येते. अमूलची फ्रेंचायझी घेणे हा एक फायदेशीर करार आहे. यामध्ये नुकसान नगण्य होण्याची शक्यता आहे.

किती भांडवलाने तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता?

अमूल कोणतीही रॉयल्टी किंवा नफा वाटणीशिवाय फ्रेंचायझी देत ​​आहे. इतकेच नाही तर अमूलची फ्रँचायझी घेण्याचा खर्चही फारसा जास्त नाही. तुम्ही 2 लाख ते 6 लाख रुपये खर्च करून तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. व्यवसायाच्या सुरुवातीलाच चांगला नफा मिळू शकतो. फ्रँचायझीच्या माध्यमातून दरमहा सुमारे 5 ते 10 लाख रुपयांची विक्री होऊ शकते. मात्र हे तुम्ही कुठे तुमचा व्यवसाय सुरु करता यावर देखील अवलंबून असते.

सिगरेटमुळे वाचले प्राण, डोळ्यांदेखल कोसळलं भलंमोठं झाड; पाहा, थरारक VIDEO

अमूल फ्रँचायझी कशी मिळवायची? (How to get Amul franchise?)

अमूल दोन प्रकारच्या फ्रेंचायझी देत ​​आहे. प्रथम अमूल आउटलेट, अमूल रेल्वे पार्लर किंवा अमूल किओस्कची फ्रँचायझी आणि दुसरी अमूल आइस्क्रीम स्कूपिंग पार्लरची फ्रँचायझी. जर तुम्हाला पहिली गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला 2 लाख रुपये गुंतवावे लागतील. त्याच वेळी, जर तुम्ही दुसरी फ्रेंचायझी घेण्याचा विचार करत असाल तर 5 लाख रुपये गुंतवावे लागतील. यामध्ये 25 ते 50 हजार रुपये नॉन रिफंडेबल ब्रँड सिक्युरिटी म्हणून भरावे लागतील.

तुम्हाला किती कमिशन मिळते?

अमूल आउटलेट घेतल्यावर, कंपनी अमूल उत्पादनांच्या किमान विक्री किंमतीवर (MRP) कमिशन देते. यामध्ये एका दुधाच्या पाऊचवर 2.5 टक्के, डेअर प्रोडक्टवर 10 टक्के आणि आईस्क्रीमवर 20 टक्के कमिशन मिळते. अमूल आइस्क्रीम स्कूपिंग पार्लरची फ्रँचायझी घेतल्यावर रेसिपीवर आधारित आइस्क्रीम, शेक, पिझ्झा, सँडविच, हॉट चॉकलेट ड्रिंकवर 50 टक्के कमिशन मिळते. त्याच वेळी, कंपनी प्री-पॅक केलेल्या आईस्क्रीमवर 20 टक्के आणि अमूल प्रोड्क्ट्सवर 10 टक्के कमिशन देते.

किती जागा लागेल?

तुम्ही अमूल आउटलेट घेतल्यास, तुमच्याकडे 150 चौरस फूट जागा असावी. तसेच अमूल आईस्क्रीम पार्लरच्या फ्रँचायझीसाठी, किमान 300 चौरस फूट जागा असावी.

'ओमिक्रॉन'चा दबाव, शेअर बाजारात पडझड सुरुच; फार्मा सेक्टरव्यतिरिक्त सर्व सेक्टर लाल निशाण्यावर

अर्ज कसा करायचा?

जर तुम्हाला फ्रँचायझीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला retail@amul.coop वर मेल करावा लागेल. याशिवाय http://amul.com/m/amul-scooping-parlors या लिंकवर जाऊनही माहिती घेता येईल.

First published:

Tags: Business, Money