जाहिरात
मराठी बातम्या / मनी / बिनधास्त ठेवा 'इतके' Savings Accounts येणार नाही इनकम टॅक्सची नोटीस; जाणून घ्या Details

बिनधास्त ठेवा 'इतके' Savings Accounts येणार नाही इनकम टॅक्सची नोटीस; जाणून घ्या Details

बिनधास्त ठेवा 'इतके' Savings Accounts येणार नाही इनकम टॅक्सची नोटीस; जाणून घ्या Details

नोटीस केव्हा बजावली जाते, याचीही काही मर्यादा आणि नियम असतात.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    जवळपास प्रत्येक नागरिकाचं बँकेत खातं असतं. बहुतांश नागरिकांचं बचत खातं (Savings Account) असतं, तर व्यापारी किंवा व्यावसायिकांचं चालू खातं (Current Account) असतं. या खात्यांमधल्या व्यवहारांचे काही नियम असतात. ते बँक आपल्याला वेळोवेळी कळवत असते. अमुक व्यक्तीला किंवा अमुक व्यावसायिकाला इन्कम टॅक्स विभागाकडून (Income Tax Department) नोटीस वगैरे बातम्या आपण वाचत असतो. अशी नोटीस केव्हा बजावली जाते, याचीही काही मर्यादा आणि नियम असतात. त्याबद्दलची माहिती ‘टीव्ही नाइन हिंदी’ ने प्रसिद्ध केली आहे. सेव्हिंग्ज अकाउंट अर्थात बचत खात्यासाठी असलेल्या नियमानुसार एका वर्षाला त्या खात्यातून होणारे व्यवहार (Transaction) 10 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावेत. वर्षभरात 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम बचत खात्यात जमा केली जाऊ शकत नाही किंवा काढलीही जाऊ शकत नाही. हे बंधन केवळ एकरकमी 10 लाख रुपये भरण्यावर किंवा काढण्यावर आहे असं नव्हे. वर्षभरात टप्प्याटप्प्याने एकूण 10 लाख रुपये खात्यातून काढले किंवा खात्यात भरले जाता कामा नयेत. या नियमाचं उल्लंघन झालं, तर इन्कम टॅक्स विभागाची नोटीस येऊ शकते. तसंच एकरकमी व्यवहाराची मर्यादा दोन लाख रुपये असून, त्यापेक्षा जास्त रक्कम बचत खात्यात एकाच वेळी भरली गेली किंवा काढली गेली, तर नोटीस येऊ शकते. ग्राहकाच्या बँक खात्याला त्याचं पॅन कार्ड (PAN Card) जोडलेलं असतं. त्यामुळे अशा व्यवहारांची माहिती पॅन कार्डद्वारे इन्कम टॅक्स विभागाला मिळते. बँक खात्याला पॅन कार्ड जोडलेलं नसेल, तर बँकेकडून ही माहिती इन्कम टॅक्स विभागाला दिली जाते. तसंच, सहकारी बँक आणि पोस्टाच्या खात्यात असे व्यवहार करण्यात आले, तरी त्यांच्याकडूनही ही माहिती इन्कम टॅक्स विभागाला दिली जाते. रिझर्व्ह बँकेने ज्या प्रॉडक्टला प्रीपेड इन्स्ट्रुमेंटचा (Prepaid Instrument) दर्जा दिला आहे, ते खरेदी करण्यासाठी एका आर्थिक वर्षात 10 लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च केल्यासही कारवाई होऊ शकते. करंट अकाउंट अर्थात चालू खात्यासाठी एकंदर वार्षिक व्यवहाराची मर्यादा 50 लाख रुपयांची आहे. करंट अकाउंटमध्ये एका वर्षात 50 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम ठेवता येत नाही किंवा काढताही येत नाही. हे काम चेकनेही (Cheque) करता येत नाही. या नियमाचं उल्लंघन झालं, तर कारवाई होऊ शकते. दरम्यान, एका व्यक्तीची किती सेव्हिंग अकाउंट्स असणं कायदेशीर आहे, असा प्रश्नही अनेकांना पडतो. या प्रश्नाचं उत्तर असं आहे, की एका व्यक्तीच्या नावावर कितीही सेव्हिंग अकाउंट्स असू शकतात. त्यासाठी कोणतीही मर्यादा घातलेली नाही. तसंच खात्यात जास्तीत जास्त किती रक्कम ठेवता येऊ शकते, यासाठीही काही मर्यादा नाही; मात्र इन्कम टॅक्सचा नियम खात्यातून होणाऱ्या व्यवहारांवर लागू होतो. सेव्हिंग खात्यातून तुम्ही वेळोवेळी किती पैसे काढता, ते कुठे आणि कसे खर्च करता, रोखीने काढता की क्रेडिट-डेबिट कार्डचा वापर करता, अशा व्यवहारांवर आणि व्यवहारांच्या रकमांवर इन्कम टॅक्स विभागाचं लक्ष असतं. त्या व्यवहारांना वर दिलेले नियम लागू असतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात