मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Business Idea: कमी खर्चात सुरू करा ‘हा’ व्यवसाय, सणासुदीत होईल बंपर कमाई

Business Idea: कमी खर्चात सुरू करा ‘हा’ व्यवसाय, सणासुदीत होईल बंपर कमाई

कमी खर्चात सुरू करा ‘हा’ व्यवसाय, सणासुदीत होईल बंपर कमाई

कमी खर्चात सुरू करा ‘हा’ व्यवसाय, सणासुदीत होईल बंपर कमाई

मशिन्सची किंमत 6 हजार रुपयांपासून सुरू होते. पंचिंग मशिनचा दर 800 रुपये, हीट सिंक बल्ब बनवणाऱ्या मशीनची किंमत 3 हजार रुपये, टिक्की फिटिंग मशीनची किंमत 12 हजार रुपयांपर्यंत आहे. 12 हजार रुपये खर्चून एलईडी बल्बचा व्यवसाय सुरू करता येतो.

पुढे वाचा ...
 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Mumbai, India
 • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 4 ऑक्टोबर: कमी भांडवल गुंतवून अधिक कमाई करणं हे प्रत्येक व्यावसायिकाचं ध्येय असतं. व्यापारी लहान असो वा मोठा, कमी पैसे गुंतवून जास्तीत जास्त पैसे कसे कमवता येतील यासाठीच प्रयत्नशील असतो. त्यानुसार आपली रणनीती बनवतात आणि व्यवसाय सुरु करतात. तुम्हीही नवीन व्यवसाय सुरू करणार असाल किंवा सुरू करण्याचा मूड बनवला असेल, तर एलईडी बल्बचा व्यवसाय हा एक उज्ज्वल व्यवसाय ठरू शकतो. पिवळ्या बल्बचा जमाना आता राहिलेला नाही. कारण त्यामुळं वीज बिल भरमसाठ येत होतं. आता सर्वत्र एलईडी बल्ब उपलब्ध आहेत. त्यामुळे लोकांची मागणी आहे. कमी वॅटमध्ये जास्त प्रकाश हवा असेल तर एलईडी बल्बला तोड नाही. त्याचप्रमाणे त्याच्या व्यवसायासाठी कोणतीही स्पर्धा नाही. एलईडी बल्ब सामान्य दिवसात विकले जातील. दिवाळी, दसरा किंवा ख्रिसमससारख्या सणांनाही त्याची मागणी वाढेल. अशा परिस्थितीत एलईडी बल्ब बनवण्यास सुरुवात कशी करावी आणि नफा कसा मिळवावा हे जाणून घेऊया.

व्यवसाय कसा सुरू करायचा-

यासाठी तुम्हाला फार कष्ट करावे लागणार नाहीत कारण बल्बचे सर्व घटक बाजारात सहज उपलब्ध आहेत. त्यासाठी कच्चा माल लागत नाही जो घरी आणून तयार करावा लागतो. तुम्हाला फक्त बाजारातून एलईडी बल्ब, ट्यूब, औद्योगिक दिवे यांचे घटक खरेदी करावे लागतील. ते एकत्र करण्यासाठी लहान मशीन आणता येतात. अशा प्रकारे तुमचं संपूर्ण उत्पादन कमी वेळेत तयार होईल. मग ते उत्पादन विकण्यासाठी धोरण आखावं लागतं. त्यासाठी कॉलेज, विद्यापीठ, शाळा, खासगी संस्था, सरकारी किंवा खासगी कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल. ऑर्डर मिळाल्यावर बल्ब इत्यादींची विक्री तुमच्या रिटेल काउंटरवरून सहज सुरू करू शकता.

 कच्चा माल काय आवश्यक आहे?

 1. एलईडी बोर्ड आणि चिप
 2. मेटैलिक बल्ब होल्डर
 3. हीट सिंक
 4. फायबर सर्किटसह रेक्टिफायर
 5. प्लॅस्टिक बॉडी आणि रिफ्लेक्टर ग्लास
 6. कनेक्टिंग वायर आणि सोल्डरिंग फ्लक्स
 7. पॅकेजिंग साहित्य
 8. एलईडी मॅन्युफॅक्चरिंग इक्विपमेंट
 9. सोल्डरिंग मशीन
 10. एलसीआर मीटर
 11. सीलिंग मशीन
 12. ड्रिलिंग मशीन
 13. डिजिटल मल्टीमीटर
 14. कंटिन्यूटी टेस्टर
 15. ऑसिलोस्कोप
 16. लक्स मीटर

हेही वाचा:  Amazonसोबत फक्त 4 तास काम करा, दरमहा होईल 60,000 रुपयांपर्यंत कमाई

सरकारकडून मदत-

एलईडी बनविण्याचे काम सुरू करण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत मिळते. या आर्थिक मदतीमुळे तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता. एमएसएमई मंत्रालय अर्जदारांना एलईडी बल्ब बनवण्यासाठी सरकारी मदत देते. सरकारकडून प्रोत्साहन मिळवून तुम्ही एलईडी बल्ब बनवण्यास सुरुवात करू शकता. हे काम तुम्ही अवघ्या काहीशे रुपयांमध्ये सुरू करू शकता. ती मोठ्या प्रमाणावर करायची असेल, तर अनेक प्रकारची सरकारी मदत दिली जाते. जर तुम्हाला कमी पैशात व्यवसाय सुरू करायचा असेल तर प्रथम बाजारातून बल्बच्या वस्तू छोट्या प्रमाणात आणा आणि एलईडी बल्ब किंवा ट्यूब असेंबल करून विकायला सुरुवात करा.

किती खर्च येईल-

एलईडी बल्ब बनवण्यासाठी तुम्हाला टिक्की फिटिंग मशीन घ्यावी लागेल. एलईडी बल्बचे सुरुवातीचं काम या मशीनद्वारे केलं जातं. हे मशीन अगदी कमी किमतीत खरेदी करता येते. यासह तुम्हाला एक पंचिंग मशीन घ्यावं लागेल जे बल्बसह होल्डरला पंच करते. यानंतर स्क्रू फिटिंग मशीनची आवश्यकता असेल ज्याद्वारे बल्बच्या आत स्क्रू स्थापित केले जातात. त्याचप्रमाणे हिटिंग मशीन देखील आवश्यक आहे, जे बल्ब तयार करण्यासाठी आवश्यक आहे. ही सर्व यंत्रे स्वस्त दरात ऑनलाइन ऑर्डर करता येतात.

मशिन्सची किंमत 6 हजार रुपयांपासून सुरू होते. पंचिंग मशिनचा दर 800 रुपये, हीट सिंक बल्ब बनवणाऱ्या मशीनची किंमत 3 हजार रुपये, टिक्की फिटिंग मशीनची किंमत 12 हजार रुपयांपर्यंत आहे. अशा प्रकारे 12 हजार रुपये ऑनलाइन खर्च करून एलईडी बल्बचा व्यवसाय सुरू करता येईल.

First published:

Tags: Business, Business News, Start business