जाहिरात
मराठी बातम्या / मनी / या योजनेत करा 4500 रुपयांची गुंतवणूक, मिळवता येईल 1 कोटींचा फंड; वाचा सविस्तर

या योजनेत करा 4500 रुपयांची गुंतवणूक, मिळवता येईल 1 कोटींचा फंड; वाचा सविस्तर

या योजनेत करा 4500 रुपयांची गुंतवणूक, मिळवता येईल 1 कोटींचा फंड; वाचा सविस्तर

सिस्टमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लान (SIP- Systematic Investment Plan) च्या माध्यमातून तुम्ही थोडी थोडी गुंतवणूक करून कोट्यवधींचे मालक बनू शकता. सध्याच्या काळात एक चांगला रिटर्न मिळवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 18 जून: देशभरात कोरोनामुळे (Coronavirus Pandemic) आर्थिक स्थिती बिकट होत आहे. अशावेळी गुंतवणूक (Investment Options) करण्याच्या विविध पर्यायांचा विचार लोकं करत आहेत. तुम्ही देखील योग्य रिटर्न (Get Good Return) मिळवण्याचा विचार करत असाल तर SIP या पर्यायाचा विचार करू शकता. यातून तुम्ही तुमचं कोट्यवधी कमावण्याचं स्वप्न देखील पूर्ण करू शकता. त्याकरता तुम्हाला नियोजनबद्ध गुंतवणूक करणं आवश्यक आहे. सिस्टमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लान (SIP- Systematic Investment Plan) च्या माध्यमातून तुम्ही थोडी थोडी गुंतवणूक करून कोट्यवधींचे मालक बनू शकता. सध्याच्या काळात एक चांगला रिटर्न मिळवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. दरम्यान हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे की शेअर बाजारातील तेजी आणि घसरणीमुळे रिटर्नमध्ये देखील चढउतार पाहायला मिळेल. हे वाचा- सामान्यांना मोठा दिलासा! खाद्यतेलांच्या किंमती उतरण्यास सुरुवात न्यूज18 हिंदीने तज्ज्ञांच्या हवाल्याने असं म्हटलं आहे की,  एखाद्या गुंतवणुकदाराला SIP च्या माध्यमातून चांगला रिटर्न हवा असेल तर त्याने लाँग टर्मसाठी गुंतवणूक करणं आवश्यक आहे. SIP मध्ये कम्पाउंडिंग लाभ देखील मिळतो. ज्याकरता एक्सपर्ट्स 15 ते 20 वर्षांसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. मिळेल 15 ते 20 टक्क्यांपर्यंत रिटर्न मार्केट एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार जर 20 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर ग्राहकांना त्यावर 15 ते 20 टक्के परतावा मिळू शकेल. शिवाय गुंतवणूकदाराने निवडलेल्या एसआयपी पॉलिसीच्या प्रकारावर अवलंबून आहे. योग्य वेळी योग्य एसआयपी निवडल्यास 15 ते 20 टक्के परतावा सहज मिळू शकेल. कशाप्रकारे करावी लागेल गुंतवणूक? उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्या एसआयपीमध्ये 4500 रुपयांची गुंतवणूक केली आणि यामध्ये तुम्ही 15 टक्के परतावा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करत आहात. तुम्ही ही गुंतवणूक 20 वर्षांसाठी केली आहे. SIP कॅलक्यूलेटरच्या साहाय्याने या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या एकूण रिटर्नबद्दल बोलायचे झाले तर, 20 वर्षांनी तुम्ही 68,21,797.387 रुपयांचे मालक बनू शकता. याठिकाणी एक ट्रीक वापरून तुम्ही 1 कोटींचा देखील फंड उभा करू शकता. हे वाचा- कामाची वेळ, PF आणि तुमच्या पगारासंबंधी महत्त्वाची बातमी, मोदी सरकार बदलणार नियम? कसा मिळवाल 1 कोटींचा फंड तुम्ही या गुंतवणुकीतून 1 कोटी रुपये कमावू इच्छित असाल तर तुम्हाला दरमहा 500 रुपयांचा टॉपअप वाढवावा लागेल. तुम्ही सोप्या पद्धतीने कोट्यवधी बनू शकता. जर तुम्ही अशी ट्रीक वापराल तर सुरुवातीच्या 4500 रुपयांच्या गुंतवणुकीचे 20 वर्षांनंतर मॅच्युरिटीवेळी 1,07,26,921.405 रुपये मिळू शकतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात