• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • CNG पंप सुरू करुन करा बक्कळ कमाई; ही सरकारी कंपनी देतेय संधी, असा करा अर्ज

CNG पंप सुरू करुन करा बक्कळ कमाई; ही सरकारी कंपनी देतेय संधी, असा करा अर्ज

देशातील नवरत्न कंपन्यामध्ये समावेश असलेल्या गेल (GAIL) कंपनीनं ही संधी देऊ केली असून, कंपनीनं सध्या बंगळूरू(Bengaluru) इथं सीएनजी पंप उघडण्यासाठी इच्छुक लोकांकडून अर्ज मागवले आहेत.

  • Share this:
नवी दिल्ली, 27 मार्च : तुम्हाला सीएनजी पंपच्या (CNG Pump) व्यवसायात उतरायचं असेल, तर सध्या एक नामांकित सरकारी कंपनी ही संधी देत आहे. देशातील नवरत्न कंपन्यामध्ये समावेश असलेल्या गेल (GAIL) कंपनीनं ही संधी देऊ केली असून, कंपनीनं सध्या बंगळूरू(Bengaluru) इथं सीएनजी पंप उघडण्यासाठी इच्छुक लोकांकडून अर्ज मागवले आहेत. आगामी काळात बंगळूरू इथं 100 सीएनजी पंप सुरू करण्याची कंपनीची योजना आहे. यासाठी लवकरच निविदा मागवण्यात येणार असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. गेल आणि सीपीआयएल यांच्यात करार - बंगळूरूमध्ये 100 सीएनजी पंप सुरू करण्याबाबत गेल (GAIL) आणि सीपीआयएल (CPIL) यांच्यात करार झाला असून, सीपीआयएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापक नितीन खरा यांनी या करारावर स्वाक्षरी केली. गेल गॅस कंपनी (GAIL Gas Company) ही गेल इंडिया लिमिटेडची (GAIL) शहरांतर्गत गॅस पुरवठा (Gas Supply) करणारी कंपनी आहे. या करारानुसार सीपीआयएल बंगळूरूमध्ये 100 सीएनजी पंप उभारणार आहे आणि गेल गॅस कंपनी या पंपांना सीएनजी पुरवठा करणार आहे. येत्या तीन वर्षात 100 पंप उभारण्याचे उद्दिष्ट गाठण्याचं नियोजन आहे. नवीन सीएनजी पंप शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी किंवा सीपीआयएलच्या एलपीजी केंद्रांजवळ उभारण्यात येणार आहेत. सध्या गेल गॅस कंपनीनं शहरात 55 सीएनजी पंप उभारले आहेत. इथं सीएनजी 51.50 रुपये प्रती किलो दरानं उपलब्ध आहे.

(वाचा - फोन पाण्यात पडल्यानंतर या गोष्टी करू नका; वॉटर डॅमेजपासून वाचण्यासाठी Magic Tips)

गेल गॅस कंपनी देशातील 52 शहरांमध्ये गॅस वितरण सेवा पुरवत आहे. कंपनीनं 6 लाखांहून अधिक घरांमध्ये पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा केला आहे. 190 सीएनजी पंपांचं व्यवस्थापन कंपनी करते. सीपीआयएल (CPIL) एक खासगी गॅस वितरण कंपनी असून, तिचे 22 राज्यांमध्ये 209 ऑटो एलपीजी पंप आहेत. अर्ज कसा कराल? या कंपन्यांच्या वेबसाइटवर (Website) जाऊन सीएनजी पंपासाठी अर्ज करण्याची सर्व माहिती घेता येईल. कंपनीच्या कार्यालयात जाऊनही याबाबत माहिती घेता येईल. सीएनजी पंप सुरू करण्याकरता अर्ज करायचा असेल, तर तुम्ही भारताचे नागरिक असणं आवश्यक आहे. याकरता शैक्षणिक पात्रता किमान दहावी उत्तीर्ण अशी असून, पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र आदी कागदपत्रे असणं आवश्यक आहे.

(वाचा - VIDEO: सलून चालवणाऱ्या या व्यक्तीकडे आहेत 378 लग्जरी कार्स; पाहा त्यांची स्टोरी)

तसंच एक अनामत रक्कम (Security Amount) कंपनीकडे ठेवावी लागते. प्रत्येक कंपनीनुसार ही रक्कम वेगळी असते. पंप कुठं उभारायचा आहे ,त्या जागेवर ही रक्कम ठरते. जिथं पंप उभारायचा आहे तिथं तुमच्या मालकीची जागा नसेल, तर त्या जागेच्या मालकाकडून ना हरकत प्रमाणपत्र (NOC) घेऊनही काम करता येईल.
First published: