Home /News /money /

Star Health ची नवी सेवा, आता Whatsapp वरून क्लेम करा पॉलिसी; चेक करा डिटेल्स

Star Health ची नवी सेवा, आता Whatsapp वरून क्लेम करा पॉलिसी; चेक करा डिटेल्स

Star Health and Allied Insurance ने आपल्या ग्राहकांसाठी उत्तम सेवा सुरू केली आहे. ग्राहकांना ही सेवा मोफत आणि घरी बसून वापरता यावी यासाठी व्हॉट्सअॅप सेवा सुरू करण्यात आली आहे.

    मुंबई, 14 जानेवारी : आरोग्य विमा कंपनी स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्सने (Star Health and Allied Insurance) आपल्या ग्राहकांसाठी उत्तम सेवा सुरू केली आहे. ग्राहकांना कंपनीच्या सेवा मोफत आणि घरी बसून वापरता याव्या यासाठी व्हॉट्सअॅप सेवा सुरू करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून स्टार हेल्थचे ग्राहक एंड-टू-एंड (End to End) सेवेचा लाभ घेऊ शकतात. कॅशलेस क्लेम दाखल करण्यापासून, ग्राहक मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर अनेक काम करु शकतात. 'झी बिजनेस'ने याबाबतचं वृत्त प्रसारित केलं आहे. स्टार हेल्थने कोरोनाच्या काळात ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन ही सेवा सुरू केली आहे. स्टार हेल्थ आपल्या ग्राहकांना रिटेल हेल्थ, ग्रुप हेल्थ, पर्सनल अॅक्सिडेंट आणि ओव्हरसीज ट्रॅव्हल यासारखे विविध विमा कवच देते. भारतीय आरोग्य विमा बाजारपेठेत 15.8 टक्के बाजारहिस्सा असलेली ही एक आघाडीची विमा कंपनी आहे. कोरोना रुग्णांना 5000 रुपये देण्याची कोणतीही सरकारी योजना नाही; व्हायरल मेसेज खोटा कंपनीने सांगितलेल्या नियमांनुसार, व्हॉट्सअॅप सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एकच मेसेज पाठवायचा आहे. >> सर्वप्रथम तुमच्या व्हॉट्सअॅप नंबरवरून +91 95976 52225 या नंबरवर 'Hi' पाठवा. >> कंपनीच्या या सेवेद्वारे तुम्ही नवीन पॉलिसी सहज खरेदी करू शकता. >> याशिवाय तुम्ही कॅशलेस क्लेम दाखल करू शकता. >> तसेच तुम्ही तुमच्या सोयीनुसार पॉलिसी दस्तऐवज डाउनलोड करू शकता. Paytm Share: 1,000 रुपयांच्या खाली घसरल्यानंतर पेटीएमचे शेअर्स 2.9 टक्क्यांनी वाढले तुमचे व्हॉट्सअॅपवरील तपशील नेहमीच सुरक्षित असतील व्हॉट्सअॅपवरील ही सेवा ग्राहकांसाठी नेहमीच सुरक्षित राहील. व्हॉट्सअॅप मेसेजिंग प्लॅटफॉर्मचे एन्क्रिप्शन हे सुनिश्चित करते की ग्राहकांसोबत शेअर केलेले तपशील सुरक्षित आणि लपलेले राहतील. याशिवाय, स्टार हेल्थचे ग्राहक कंपनीच्या चॅट असिस्टंट – ट्विंकल, कस्टमर केअर नंबर, एजंट, अधिकृत वेबसाइट, शाखा कार्यालय आणि स्टार पॉवर अॅपद्वारे विमा कंपनीपर्यंत पोहोचू शकतात.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Health, Insurance, Whatsapp

    पुढील बातम्या