नवी दिल्ली, 19 एप्रिल : देशामध्ये 3 मे पर्यंत लॉकडाऊनची (Coronavirus Lockdown 2.0) घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान 20 एप्रिलपासून काही सेवा पुन्हा करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र रविवारी गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार Flipkart, Amazon सारख्या ई-कॉमर्स वेबसाइटवरून अत्यावश्यक नसणाऱ्या वस्तूंचा पुरवठा बंदच राहील. ‘कोव्हिड-19 चा सामना करण्यासाठी अत्यावश्यक नसणाऱ्या वस्तूंचा ई-कॉमर्स वेबसाइटमार्फत पुरवठा करण्यास Lockdown2 दरम्यान मनाई आहे’, असं ट्वीट गृहखात्याच्या प्रवक्त्यांकडून करण्यात आले आहे.
सरकारने याआधी ई-कॉमर्स वेबसाइटवरील निर्बंध हटवले होते. लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपण्याआधीच या वेबसाइट्सना त्यांचं काम पुन्हा सुरू करण्याची परवानगी यामुळे मिळाली होती. काही वेबसाइट्सनी त्यांच्या स्मार्टफोन्सची देखील विक्री सुरू केली होती. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात ई-कॉमर्स वेबसाइट्सनी त्यांच्या सेवा फक्त अत्यावश्यक सेवांसाठी मर्यादित ठेवल्या होत्या. केवळ अत्यावश्यक वस्तूंची होणार डिलिव्हरी सरकारने लॉकडाऊनमध्ये ई-कॉमर्स कंपन्यांना काम करण्याची परवानगी दिली आहे. मात्र या काळात ते अत्यावश्यक नसणाऱ्या वस्तूंचा पुरवठा नाही करू शकणार. गेल्या आठवणड्यात सरकारने 20 एप्रिलपासून काही सेवा सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर Flipkart, Amazon सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांनी काही वस्तूंची ऑर्डर घेण्यास सुरूवात केली होती. मात्र गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार आता या कंपन्यांना केवळ अत्यावश्यक वस्तूंचाच पुरवठा करता येणार आहे. (हे वाचा- 4 मेनंतर विमानाचे तिकिट बुक करण्याचा विचार करताय?त्याआधी जाणून घ्या सरकारचे आदेश ) संपादन - जान्हवी भाटकर