नवी दिल्ली, 19 एप्रिल : सरकारी क्षेत्रातील विमान कंपनी एअर इंडिया (Air India)ने शनिवारी घोषणा केली होती की, त्यांनी काही निवडक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सचे बुकिंग अनुक्रमे 4 मे आणि 1 जूनपासून सुरु करण्यात येईल. यावर नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले आहे की, सरकारने अद्याप फ्लाइट्स पुन्हा सुरु करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सर्व एअरलाइन्सना असा आदेश देण्यात आला आहे की, जोपर्यंत सरकार फ्लाइट्स सुरु करण्याबाबत कोणताही निर्णय घेत नाही, तोपर्यंत एअरलाइन्सनी कोणत्याही फ्लाइट्सचे बुकिंग सुरु करू नये. (हे वाचा- लॉकडाऊनमध्ये 2000 रुपयांहून अधिक किंमतीने महागलं सोनं,वाचा भविष्यात काय असणार दर ) एअर इंडियाने त्यांच्या वेबसाइटवरून जारी केलेल्या नोटीफिकेशनमध्ये सांगितले आहे की, सध्या जगभरातील परिस्थिती पाहता त्यांनी देशांतर्गत फ्लाइट्स 3 मे 2020 तर आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स 31 मे 2020 पर्यंत रद्द केली आहेत. त्यानंतर काही निवडक ठिकाणी देशांतर्गत फ्लाइट्स 4 मे पासून तर आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स 1 जूनपासून सुरू होतील. त्यावर नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
The Ministry of Civil Aviation clarifies that so far no decision has been taken to open domestic or international operations.
— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) April 18, 2020
Airlines are advised to open their bookings only after a decision in this regard has been taken by the Government.@MoCA_GoI @DGCAIndia @AAI_Official
देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान 20 एप्रिलपासून काही सेवा सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. मात्र विमानसेवा अनिश्चित काळासाठी रद्द असणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात विमान व्यवसायाचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही विमान कंपन्यांकडे रिझर्व्ह कॅश देखील शिल्लक राहिली नसल्याने लॉकडाऊन नंतरच्या काळात सुद्धा या कंपन्यांना त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी झगडावे लागणार आहे. संपादन - जान्हवी भाटकर