मुंबई, 02 जानेवारी: विमानप्रवास (Air Travel) करणं हे अनेकांसाठी स्वप्न असतं. पण बजेटमुळे अनेकदा हे स्वप्न सत्यात उतरत नाही. मात्र तुम्ही नवीन वर्षात कुटुंबासोबत कुठेतरी प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर स्पाइसजेट या खाजगी क्षेत्रातील विमान कंपनीने तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर आणली आहे. स्पाईसजेट फक्त 1122 रुपयांच्या स्टार्टिंग प्राइसमध्ये हवाई तिकीट बुक करण्याची संधी देत आहे. ही ऑफर फक्त 5 जानेवारीपर्यंत वैध आहे. SpiceJet ने Wow विंटर सेल ऑफरची (Spicejet Wow Winter Sale) तारीख 5 जानेवारीपर्यंत वाढवली आहे. या हिवाळी सेल ऑफर अंतर्गत, तुम्ही फक्त 1122 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत विमान तिकीट बुक करू शकता. 15 एप्रिलपर्यंत प्रवास करता येईल SpiceJet च्या Wow Winter Sale ऑफरअंतर्गत, तुम्ही 15 जानेवारी ते 15 एप्रिल 2022 या दरम्यानच्या प्रवासासाठी तिकिटे बुक करू शकता. जर तुम्ही ट्रॅव्हल प्लॅनमध्ये बदल केले तर त्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. तुम्ही हा बदल पहिल्यांदा विनामूल्य करू शकता. या ऑफरमध्ये तिकीट बुक केल्यावर, तुम्हाला पुढील प्रवासासाठी 500 रुपयांचे मोफत फ्लाइट व्हाउचर देखील मिळेल. हे व्हाउचर 30 सप्टेंबर 2022 पर्यंत वापरु शकता. या व्हाउचरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रवासाच्या तारखेच्या किमान 15 दिवस आधी तिकीट बुक करावे लागेल.
Wow Winter Sale extended! What a way to start your year #2022. Jump in joy, wear your travel hat, but don't forget to book tickets on https://t.co/PykmFjYcix. pic.twitter.com/MdVJaoB28P
— SpiceJet (@flyspicejet) January 1, 2022
500 रुपयांचे व्हाउचर स्पाइसजेटच्या मते, Wow Winter Sale ऑफरमध्ये जर तुम्ही तिकिट बुक केले तर तुम्हाला प्रति बुकिंग एक फ्री फ्लाइट ई व्हाउचर मिळेल, ज्याचा वापर तुम्ही पुढील प्रवासासाठी करू शकता. हे ई व्हाउचर तुम्हाला बुकिंगवेळी तुम्ही दिलेल्या ईमेल आयडीवर पाठवले जाईल. त्यामुळे बुकिंग करताना योग्य इमेल आयडी प्रविष्ट करा. जर एका पीएनआरवर अनेक प्रवासी आहेत तर व्हाउचर केवळ पहिलं नाव असणाऱ्या प्रवाशाच्या नावे जारी केले जाईल. हे वाचा- केवळ 25000 रुपयांमध्ये सुरू करा हा व्यवसाय, दरमहा होईल 50000 रुपयांपर्यंत कमाई 500 रुपयांच्या या व्हाउचरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला किमान 4500 रुपयांचे तिकीट बुक करावे लागेल. हे व्हाउचर ज्या प्रवाशाच्या नावाने जारी केले आहे त्याच प्रवाशाकडून रिडीम केले जाऊ शकते. व्हाउचर रिडेम्पशनसाठी बुकिंग कालावधी 15 जानेवारी 2022 ते 31 जानेवारी 2022 पर्यंत आहे.