मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Spicejet ची मोठी घोषणा! कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला तर प्रवाशांचे पूर्ण पैसे परत करणार

Spicejet ची मोठी घोषणा! कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला तर प्रवाशांचे पूर्ण पैसे परत करणार

Spicejetच्या निर्णयामुळे प्रवासापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मात्र यासाठी एक अटक आहे. काय आहे ही अट पाहुयात

Spicejetच्या निर्णयामुळे प्रवासापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मात्र यासाठी एक अटक आहे. काय आहे ही अट पाहुयात

Spicejetच्या निर्णयामुळे प्रवासापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मात्र यासाठी एक अटक आहे. काय आहे ही अट पाहुयात

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 26 मार्च: जगभरात कोरोना व्हायरसनं (Coronavirus India Updates) हाहाकार माजवला आहे. प्रत्येक नागरिक कोरोनाची लागण होऊ नये यासाठी काळजी घेत आहे. मात्र कोरोनाची लागण कशी आणि कधी होईल हे कुणीही सांगू शकत नाही. त्यामुळे अनेकांच्या योजना कोलमडून जातात. प्रवासाचं नियोजन करताना अनेकांना पुढे काय मांडून ठेवले हे माहिती नसतं. त्यामुळे तिकिट बुक केल्यानंतर ऐनवेळी कोरोना झाल्याचं कळतं आणि पुढचं सर्व नियोजन विस्कटून जातं. प्रवासाआधी (Air travel during covid-19) कोरोना चाचणी अनेक राज्यांनी बंधनकारक केली आहे. पण प्रवासाचं नियोजन झालं, तिकिटं बुक झाली आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर? हा भुर्दंंड स्पाइस जेटने (Spice jet offer for corona positive report passanger) माफ करायचा ठरवलं आहे.

आयत्या वेळी विमानाचं तिकिट कॅन्सल करावं लागलं, तर तिकिटासाठी मोजलेले आगाऊ पैसे परत मिळत नाहीत. मात्र अशा प्रवाशांसाठी स्पाईसजेट (Spicejet) या विमान कंपनीनं दिलासा देणारी बातमी दिली आहे. प्रवासापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला तर कंपनी त्यांच्या तिकीटाचे पूर्ण पैसे परत करणार आहे. एवढंच नाही तर प्रवाशांची कोरोना चाचणीसुद्धा माफक दरात स्पाइस जेटतर्फेच केली जाणार आहे. मात्र प्रवाशांना तिकीट आरटी-पीसीआर (RT-PCR) टेस्ट SpiceHealth.com सोबत बुक करावं लागणार आहे. ही सुविधा सध्या दिल्ली, गुरुगाव आणि मुंबईत देण्यात आली आहे.

हे वाचा - सावधान! येत्या दिवसांत कोरोना रुग्ण झपाट्याने वाढणार; टास्क फोर्सचा इशारा

प्रवाशांना कोरोना चाचणीसाठीचे सँपल घरी बोलवूनही देता येतील अशी सुविधा देण्यात आली आहे.

299 रुपयात कोरोना टेस्टची सुविधा

देशात स्पाईसहेल्थच्या (spicehealth.com) माध्यमातून होणारी कोरोना चाचणी सर्वात स्वस्त आहे. आरटी-पीसीआर टेस्टसाठी फक्त 299 रुपये द्यावे लागतात. इतर या टेस्टसाठी 800 ते 850 रुपये मोजावे लागतात. या सुविधेचा स्पाइस जेट प्रवाशांसह इतरांनाही लाभ मिळू शकतो. मात्र त्यांना यासाठी 499 रुपये मोजावे लागतील.

नोव्हेंबर 2020 पासून स्पाईसजेटची सुविधा

स्पाईसजेटचे प्रमोटर अजय सिंह आणि अवनी सिंह यांनी स्पाईसहेल्थ कंपनीची स्थापना केली आहे.

हे वाचा - महाराष्ट्रातून बेंगळुरूत जाणाऱ्यांसाठी 1 एप्रिलपासून नवा नियम

नोव्हेंबर 2020 पासून ही कंपनी आरटी-पीसीआर टेस्टची सुविधा देत आहे. स्पाईसहेल्थने 25 मार्चला केरळमध्ये मोबाईल COVID-19 टेस्टिंग सुविधा सुरु केली आहे. आता ही सेवा महाराष्ट्र, हरयाणा, उत्तराखंडसह पाच राज्यात उपलब्ध आहे.

First published:

Tags: Corona, Coronavirus, Spicejet