जाहिरात
मराठी बातम्या / देश / Coronavirus Restrictions: महाराष्ट्रातून बेंगळुरूत जाणाऱ्यांसाठी 1 एप्रिलपासून नवा नियम

Coronavirus Restrictions: महाराष्ट्रातून बेंगळुरूत जाणाऱ्यांसाठी 1 एप्रिलपासून नवा नियम

Coronavirus Restrictions: महाराष्ट्रातून बेंगळुरूत जाणाऱ्यांसाठी 1 एप्रिलपासून नवा नियम

देशातील इतर राज्यात वाढत असलेले कोरोना रुग्ण (coronavirus latest updates) पाहता कर्नाटक सरकारने धास्ती घेतली आहे. विशेषतः महाराष्ट्रातून जाणाऱ्यांसाठी नवा नियम लागू करण्यात आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 25 मार्च: देशात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या (coronavirus latest updates)  वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे आता रुग्ण संख्या वाढत असलेल्या राज्यातून येणाऱ्या नागरिकांवर कर्नाटक (karnataka coronavirus cases) सरकारची नजर असणार आहे. त्यातच कर्नाटक सरकारने गुरुवारी बेंगळुरुत येणाऱ्या नागरिकांना आरटी-पीसीआर टेस्टची निगेटीव्ह रिपोर्ट (Maharashtra citizens need negative rtpcr corona test to go to Bangalore) देणं बंधनकारक केले आहे. सध्या पंजाब, चंदीगड, महाराष्ट्र आणि केरळमधून येणाऱ्या नागरिकांना आरटी-पीसीआर टेस्ट निगेटीव्ह रिपोर्ट देणं अनिवार्य आहे. मात्र आता सरकारचा हा निर्णय 1 एप्रिलपासून सर्व राज्यातून येणाऱ्या नागरिकांना लागू होणार आहे. कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. के सुधाकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. बेंगळुरू महानगरपालिका (Bengaluru news) अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘गेल्या काही दिवसात 20 ते 40 वयोगटातील नागरिकांमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. त्यांच्या माध्यमातून कोरोना पसरत असल्याचं निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिका परिक्षेत्रात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यानंतर त्यांच्या हातावर क्वारंटाईन शिक्का मारण्यात येणार आहे. जेणेकरून कोरोनाचा फैलाव रोखण्यास मदत होईल. बेंगळुरुतील एकूण रुग्णांपैकी 60 टक्के रुग्ण हे दुसऱ्या राज्यातून आलेले आहेत. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणं बंधनकारक असणार आहे.’ असं आरोग्यमंत्री डॉ. के सुधाकर यांनी सांगितलं. पुण्यात लॉकडाऊनची टांगती तलवार; व्यापाऱ्यांवर भीतीचं सावट मागील दोन दिवसात कर्नाटकमध्ये 2 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण बेंगळुरु शहरातील आहेत. कर्नाटक सरकारने मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगची नियमावली न पाळण्याऱ्या नागरिकांना 250 रुपयांच्या दंडाची तरतूद केली आहे. तर मोकळ्या जागेत होणाऱ्या लग्न, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमात 500 जणांना उपस्थित राहण्याची मंजुरी देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात