खूशखबर! या दोन बँका 31 मार्चपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना FD वर देणार भरपूर रिटर्न

खूशखबर! या दोन बँका 31 मार्चपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना FD वर देणार भरपूर रिटर्न

Covid 19 च्या साथीच्या कठीण काळात व्याजदर सातत्यानं कमी होत आहेत. त्यामुळे व्याजावर उपजीविका अवलंबून असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) दिलासा देणारी बातमी आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 4 जानेवारी : बहुतेक बँका ज्येष्ठ नागरिकांना एफडी (FD-Fixed Deposit)अर्थात मुदत ठेवींवर नेहमीच्या दरापेक्षा अर्धा ते एक टक्का जास्त व्याजदर देतात. Covid 19 च्या साथीच्या कठीण काळात व्याजदर सातत्यानं कमी होत आहेत. त्यामुळे व्याजावर उपजीविका अवलंबून असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) दिलासा देण्यासाठी बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक व्याजदराच्या विशेष मुदतठेव योजना सुरू केल्या. आता खासगी क्षेत्रातील दोन मोठ्या बँकांनी आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या या विशेष मुदतठेव योजनांची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवून त्यांना दिलासा दिला आहे. या बँका आहेत एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि आयसीआयसीआय बँक (ICICI Bank).

ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या या विशेष FD योजनेचा लाभ घेण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 होती, परंतु आता या दोन्ही बँकांनी 31 मार्च 2021 पर्यंत ही मुदत वाढविली आहे.

HDFC बँक देणार 75 बेसिस पॉईंट अधिक

HDFC बँक ज्येष्ठ नागरिकांना एचडीएफसी सीनियर सिटीझन केअर अंतर्गत एफडीवर 75 बेसिस पॉईंट अधिक व्याज देते. कोणत्याही ज्येष्ठ नागरिकानं या योजनेंतर्गत एफडी केल्यास त्यांना 6.25 टक्के व्याजदर मिळेल. 13 नोव्हेंबरपासून ही योजना सुरू करण्यात आली आहे.

LIC ची खास पॉलिसी; एकदा गुंतवणूक करा आणि आयुष्यभरासाठी पेन्शनची गॅरेंटी घ्या

एचडीएफसी बँक 7 ते 14 दिवस आणि 15 ते 29 दिवस मुदतीसाठी ठेवलेल्या एफडीवर सर्वसामान्य ग्राहकांना 2.5 टक्के व्याजदर देते, तर 30 ते 45 दिवस, 46 ते 60 दिवस आणि 61 ते 90 दिवसांच्या एफडीवर 3 टक्के व्याजदर देते. 91 दिवस ते 6 महिन्यांच्या एफडीवर 3.5 टक्के, 6 ते 9 महिने आणि 9 ते एक वर्षाच्या कालावधीतील एफडीसाठी 4.4 टक्के व्याजदर देते. एक वर्ष आणि दोन वर्षाच्या एफडीला 4.9 टक्के, दोन ते तीन वर्ष मुदतीच्या एफडीवर 5.15 टक्के, 3 वर्ष ते 5 वर्षाच्या एफडीवर 5.30 टक्के आणि 5 वर्ष ते 10 वर्ष कालावधीच्या एफडीवर 5.50 टक्के दरानं व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना या एफडीवर 75 बेसिस पॉईंट अधिक व्याजदर मिळेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याज दर 13 नोव्हेंबरपासून लागू असून, एचडीएफसी बँकेने 18 मे 2020 रोजी ही योजना सुरू केली असून ती आता 31 मार्च 2021 पर्यंत सुरू राहणार आहे.

Bank of Barodaची नवीन सेवा, अवघ्या 30 मिनिटांत मंजूर होणार कर्ज

ICICI बँक किती व्याज देत आहे?

आयसीआयसीआय बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी आयसीआयसीआय बँक गोल्डन इयर्स (ICICI Bank Golden Years) योजना चालवते. त्याअंतर्गत एफडी करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सामान्य ग्राहकांपेक्षा 80 बेसिस पॉईंट अधिक व्याजदर दिला जातो. या योजनेअंतर्गत सध्या ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 6.30 टक्के दरानं व्याज मिळत आहे. सर्वसामान्य ठेवीदारांना आयसीआयसीआय बँकेच्या 7 ते 29 दिवस मुदतीच्या एफडीवर 2.5 टक्के दर मिळेल. 30 ते 90 दिवसांच्या एफडीवर 3 टक्के, 91 ते 184 दिवसात मुदत संपणाऱ्या एफडीवर 3.5 टक्के आणि 185 दिवस ते एक वर्ष मुदतीच्या एफडीवर 4.4 टक्के व्याजदर आहे, तर 1 वर्षापासून ते 18 महिन्यांपर्यंतच्या मुदतीच्या एफडींना 4.9 टक्के व्याज मिळेल. 18 महिने ते 2 वर्षांच्या कालावधीच्या एफडीवर 5 टक्के व्याज मिळेल. आता बँक 2 ते 3 वर्षाच्या मुदतीवर एफडीवर 5.15 टक्के व्याज देते. त्याचबरोबर 3 ते 5 वर्षाच्या एफडीवर 5.35 टक्के आणि 3 ते 10 वर्षांच्या एफडीवर 5.50 टक्के व्याज देते. या सर्व एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना 80 बेसिस पॉईंट अधिक दरानं व्याज मिळते. ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडीचा हा व्याज दर 21 ऑक्टोबरपासून लागू आहे. आयसीआयसीआय बँकेने 20 मे 2020 रोजी ही योजना सुरू केली होती, ती आता 31 मार्च 2021 पर्यंत सुरू राहणार आहे.

First published: January 4, 2021, 9:44 PM IST

ताज्या बातम्या