मुंबई, 02 जानेवारी : बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda ) आपल्या ग्राहकांसाठी नवीन सुविधा सुरु केली आहे. यामध्ये ग्राहक ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही प्रकारचे कर्ज (Loan) घेऊ शकतात. यासाठी ग्राहकांना बँकेत येण्याची गरज नसून घरबसल्या किंवा कोणत्याही ठिकाणाहून ग्राहक होम लोन, (Home Loan) कार लोन(Car Loan) आणि पर्सनल लोन(Personal Loan) घेऊ शकतात. महत्त्वाचं म्हणजे हे लोन अवघ्या अर्ध्या तासात पास होणार असून ग्राहकांना केवळ ऑनलाईन अर्ज करायचा आहे. यासाठी बँकेने खास ऑनलाईन लेन्डिग प्लॅटफॉर्म (Online Lending platform) सुरु केल्याची माहिती बँकेचे एक्झिक्युटिव डायरेक्टर विक्रमादित्य सिंह खिनी यांनी सांगितले. त्यामुळं आता कोणत्याही प्रकारच्या कर्जाचा लाभ घेण्यासाठी केवळ ऑनलाईन अर्ज करायचा आहे. देशभरातील विविध बँका आपल्या ग्राहकांसाठी विविध सुविधा आणत असतात.
रिटेल खरेदीवर मिळणार तात्काळ कर्ज
बँक आपल्या ग्राहकांना यासाठी नवीन सुविधा देत आहे. तुम्ही रिटेल खरेदीवर देखील कर्ज घेऊ शकता.एम-कनेक्ट (M Connect) या बँकेच्या अॅपवर तुम्ही अर्ज केल्यास 60 सेकंदामध्ये तुमचं कर्ज मंजूर होईल. महत्त्वाचे म्हणजे बँक हे कर्ज फेडण्यासाठी 3 ते 18 महिन्यांची मुदत देत आहे. तुम्हाला हवे तितक्या रकमेचे हफ्ते (EMI) करून हे कर्ज फेडू शकता. प्री-अप्रूव्ड माइक्रो पर्सनल लोन असे याचं नाव असून तुम्ही तुमच्या बचत खात्यात देखील ही रक्कम घेऊ शकता. त्यामुळं बँकेच्या ग्राहकांना मोठा फायदा होणार असून तात्काळ कर्ज मंजूर होत असल्याने वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होणार आहे.
अर्ध्या तासात कर्ज मंजूर
या नवीन डिजिटल लेंडिंग प्लेटफॉर्मवरून अर्ज करून तुम्ही अर्ध्या तासात कर्ज मिळवू शकता. यासाठी बँक तुमच्या कमाईच्या विविध स्रोतांची पडताळणी करून हे कर्ज मंजूर करणार आहे. याचबरोबर तुम्ही बँकेतील तुमच्या फिक्स्ड डिपॉडिट्स (FD) वर देखील कर्ज घेऊ शकता. यासाठी तुम्ही वेबसाइट, मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंगद्वारे याचा लाभ घेऊ शकणार आहात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.