नवी दिल्ली, 4 जानेवारी : LIC ने नवी जीवन शांती योजना (lic jeevan shanti pension plan) सुरू केली आहे. या पॉलिसीमध्ये मिळणारं पेन्शन (LIC Pension Policy) ही या पॉलिसीची विशेष बाब आहे. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करुन व्यक्ती आयुष्यभर मासिक पेन्शनची व्यवस्था करू शकतो. यातून व्यक्ती आपल्या रिटायर्डमेंटनंतरचे खर्च सहजपणे पूर्ण करू शकतो. हा एक सिंगल प्रीमियम प्लॅन आहे.
काय आहे स्किम -
जीवन शांती पॉलिसीमध्ये ग्राहक दोन पर्याय निवडू शकतात. पहिला इमीडिएट एन्यूटी आणि दुसरा डेफ्फर्ड एन्यूटी. इमीडिएट एन्यूटी या पर्यायात पॉलिसी घेतल्यानंतर लगेचच पेन्शनची सुविधा मिळते. तर, डेफ्फर्ड एन्यूटी पर्यायात पॉलिसी घेतल्यानंतर 5,10,15 किंवा 20 वर्षांनंतर पेन्शनची सुविधा दिली जाते. ग्राहक आपल्या गरजेनुसार, त्वरित पेन्शन सुरू करू शकतो किंवा नंतरही सुरू करता येते.
किती मिळेल पेन्शन -
या योजनेंतर्गत पेन्शनची रक्कम निश्चित नाही. पेन्शनची रक्कम वय, गुंतवणूक आणि डिफरमेंट पीरियडवर (गुंतवणूक आणि पेन्शन सुरू होण्याचा मधला काळ) अवलंबून असते. डिफरमेंट पीरियड जितका जास्त असेल किंवा वय जास्त असेल तरीही, पेन्शन तितकंच मिळणार आहे. एलआयसी यासाठी ग्राहकांच्या गुंतवणूकीवर टक्क्यांच्या हिशोबाने पेन्शन देते. जर ग्राहकाने 10 लाखांच्या गुंतवणूकीवर 5 वर्षांनंतर पेन्शन सुरू केलं तर, त्यावर 9.18 टक्क्यांच्या हिशोबाने वार्षिक 91800 रुपये पेन्शन मिळेल.
या वयोगटातील लोक घेऊ शकतात योजनेचा फायदा -
LIC च्या या योजनेचा कमीत कमी 30 वर्ष आणि अधिकाधिक 85 वर्ष वयोगटातील व्यक्ती फायदा घेऊ शकतात.
इमीडिएट एन्यूटी आणि डेफ्फर्ड एन्यूटी या दोन्ही पर्यायांसाठी पॉलिसी घेताना, वार्षिक दरांची हमी दिली जाते. एकदा निवडलेला पर्याय बदलता येऊ शकणार नाही. ही योजना ऑफलाईन आणि ऑनलाईनही खरेदी करता येऊ शकते. ही योजना LIC च्या जुन्या जीनन अक्षय योजनेप्रमाणे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.