SBI, ICICI, HDFC बँकेत खातं असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 'ही' सेवा लवकरच होणार बंद!

SBI, ICICI, HDFC बँकेत खातं असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 'ही' सेवा लवकरच होणार बंद!

आपल्या बँक खात्यातील व्यवहारांबाबत बँकेकडून आपल्या मोबाइलवर एसएमएस (SMS)येतो. पण आता ही सेवा (SMS Service) बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 27 मार्च : आपल्या बँक खात्यातील व्यवहारांबाबत बँकेकडून आपल्या मोबाइलवर एसएमएस (SMS)येतो. आपल्या खात्यातील शिल्लक, जमा झालेली रक्कम, ओटीपी अशा अनेक सेवा एसएमएसच्या माध्यामातून दिल्या जातात. पण आता ही सेवा (SMS Service) बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायनं(TRAI)वारंवार सूचना देऊनही एसएमएसच्या बाबतीतल्या नियमांची पूर्तता न करणाऱ्या 40 कंपन्यांची यादी जाहीर केली असून त्यांनी 31 मार्चपर्यंत ही नियमपूर्तता न केल्यास एसएमएस सेवा बंद करण्याचा इशारा दिला आहे.

या 40 कंपन्यांमध्ये देशातील सर्वांत मोठी सरकारी बँक असणारी भारतीय स्टेट बँक(SBI),खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय (ICICI), एचडीएफसी (HDFC), कोटक महिंद्रा बँक(KOTAK MAHINDRA BANK) यासह एलआयसीचाही(LIC)समावेश आहे.

31 मार्च अंतिम मुदत :

ट्रायनं या कंपन्यांना 31मार्चपर्यंत एसएमएसच्या बाबतीतील नियमांची पूर्तता करण्याचा आदेश दिला असून तसे न केल्यास एक एप्रिलपासून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या एसएमएस सेवेवर परिणाम होण्याचा इशाराही देण्यात आला आहे. सर्व महत्त्वाच्या संस्था, कंपन्या, टेली मार्केटिंग कंपन्या यांना एसएमएस सेवेबाबत लागू करण्यात आलेल्या नव्या नियमांची पूर्तता करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला आहे. कंपन्यांच्या हलगर्जीपणामुळे याचा फटका ग्राहकांना बसणं अयोग्य आहे. त्यामुळं वारंवार सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसंच आता 31मार्चपर्यंत अंतिम मुदतही देण्यात आली आहे. तरीही सूचना दिलेल्या बँका, कंपन्या यांनी मुदतीपूर्वी नियमपूर्तता न केल्यास एक एप्रिलपासून त्याची ही सेवा बंद केली जाईल.

काय आहेत नियम?

ज्या बँका किंवा कंपन्या आपल्या ग्राहकांना एसएमएसद्वारे व्यावसायिक संदेश पाठवतात त्यांनी मेसेज हेडर आणि टेम्प्लेट दूरसंचार कंपन्यांकडून मंजूर करून घेणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, बँका, बिगर बँकिंग वित्तीय संस्था आदींच्याकडे एसएमएस किंवा ओटीपी आल्यावर त्याची पडताळणी ब्लॉकचेन प्लॅटफॉर्मवर (Block chain Platform) मंजूर करण्यात आलेल्या टेम्प्लेटद्वारे केली जाईल. याला एसएमएस स्क्रबिंग म्हणतात.

बनावट एसएमएस रोखण्यासाठीची उपाययोजना :

फसवणूक करणारे एसएमएस(False SMS)रोखण्यासाठी ट्रायनं ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारीत आधुनिक यंत्रणेचा वापर करण्याची उपाययोजना राबवली आहे. यासाठी ट्रायनं दूरसंचार कंपन्यांनी जमा केलेला एसएमएस स्क्रबिंग डेटा आणि त्याचा अहवाल याचं विश्लेषण केलं आहे. याबाबत टेली मार्केटिंग कंपन्यांबरोबर 25 मार्च 2021 रोजी ट्रायची एक बैठकही झाली आहे.

Published by: Kiran Pharate
First published: March 27, 2021, 4:34 PM IST

ताज्या बातम्या