नवी दिल्ली, 1 डिसेंबर : आपल्या देशात सोनं खरेदी (Gold) ही अगदी प्राचीन परंपरा आहे. सोन्यात गुंतवणूक (Investment) करणं हा अत्यंत सुरक्षित पर्याय मानला जातो. त्यामुळे आपल्या देशात सोन्याला प्रचंड मागणी असते. सोनं आयात करण्यात जगात भारताचा (India) दुसरा क्रमांक लागतो. सोनं खरेदीसाठी प्रचंड प्रमाणात परकीय चलन खर्च करावं लागतं. यावर उपाय म्हणून सरकारने 2015 मध्ये सॉव्हरीन गोल्ड बाँड अर्थात सार्वभौम सुवर्णरोखे (Sovereign Gold Bond) योजना दाखल केली. भौतिक सोन्याची मागणी कमी करणं आणि सोनं खरेदी करण्यासाठी वापरल्या जाणार्या घरगुती बचतीचा भाग आर्थिक बचतीमध्ये बदलणं हा याचा मुख्य उद्देश होता. आता या योजनेची आठवी मालिका 29 नोव्हेंबरपासून गुंतवणुकीसाठी खुली झाली असून, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) यासाठी प्रति ग्रॅम 4,791 रुपये किंमत निश्चित केली आहे. या योजनेत ऑनलाइन अर्ज करणार्या आणि डिजिटल पेमेंट करणार्या गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपये सूट दिली जाणार आहे. अशा गुंतवणूकदारांसाठी सोन्याची किंमत 4,741 रुपये प्रति ग्रॅम असेल, असं भारतीय रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. हे Sovereign Gold Bond खरेदी करताना एखादी व्यक्ती जास्तीत जास्त 20 हजार रुपये रोख पेमेंटद्वारे देऊ शकते. डिमांड ड्राफ्ट किंवा चेक किंवा इलेक्ट्रॉनिक बँकिंगद्वारेही पैसे देता येतात. 3 डिसेंबरपर्यंत यात गुंतवणूक करता येणार आहे.
RD Interest rate : रिकरिंग डिपॉझिटवरील व्याज दर मोजण्यासाठी वापरा `हे` सूत्र
या योजनेत गुंतवणूक करण्याचे काय फायदे आहेत, हे गुंतवणूकदाराना कळावं, यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) एक ट्विट केलं आहे. त्यातून स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांना या योजनेच्या फायद्यांबद्दल माहिती दिली आहे. ‘सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात? गोल्ड बाँड्समध्ये गुंतवणूक करण्याची ही 6 सोनेरी कारणं (Gold Reasons) आहेत. बँकेचे ग्राहक http://onlinesbi.com वर ई-सेवा विभागांतर्गत या बाँडमध्ये गुंतवणूक करू शकतात,’ असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
घर खरेदी करताना त्यावरील Stamp Duty आणि Registration charges किती हे कसं समजेल?
या योजनेत गुंतवणूक करण्याचे काय आहेत फायदे - - खात्रीशीर परतावा (Return) गोल्ड बाँडच्या गुंतवणूकदारांना दर वर्षी 2.5 टक्के दराने व्याज मिळतं. हे व्याज सहामाही आधारावर उपलब्ध असतं. - कॅपिटल गेन टॅक्समधून (Capital Gain Tax) सूट मुदतीनंतर गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्यावर कोणताही कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे भांडवली कर लागत नाही. - कर्ज सुविधा (Loan) कर्जासाठी तारण म्हणून या Sovereign Gold Bond चा वापर करता येतो. - साठवण्याची सुविधा (Security) भौतिक स्वरूपातलं सोनं सुरक्षित ठेवण्याचं मोठं आव्हान असतं. सुरक्षिततेसाठी सोनं बँकेत ठेवावं लागतं. त्याकरिता लॉकरचं (Locker) शुल्क भरावं लागतं. या स्वरूपातलं सोनं सुरक्षित ठेवण्याचा प्रश्न नसतो. - तरलता या Sovereign Gold Bond च्या एक्सचेंजेसवर (stock Exchange) व्यवहार करता येतो. - जीएसटी, मेकिंग चार्जेसमधून सूट भौतिक सोन्याप्रमाणे यावर जीएसटी (GST) आणि मेकिंग चार्जेस (Making Charges) लागत नाहीत. या Sovereign Gold Bond चा कालावधी आठ वर्षांचा असतो. मात्र मुदतीपूर्वी यातून बाहेर पडायचं असेल, तर पाचव्या वर्षानंतर बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध आहे.