Home /News /real-estate /

घर खरेदी करताना त्यावरील Stamp Duty आणि Registration charges किती हे कसं समजेल?

घर खरेदी करताना त्यावरील Stamp Duty आणि Registration charges किती हे कसं समजेल?

स्टॅम्प ड्युटी (Stamp Duty on home) आणि रजिस्ट्रेशन (Registration charges on home) या महत्त्वाच्या बाबींची पूर्तता केल्याशिवाय कायदेशीरदृष्ट्या घराचा मालकी हक्क प्राप्त होत नाही.

मुंबई, 01 डिसेंबर : घरांच्या (Home) किमती बघता आता घरखरेदी ही सर्वांत मोठी आणि महत्त्वाची आर्थिक उपलब्धी (Financial Achievement) मानली जाते (Buying home). घरखरेदी करताना काही प्रक्रिया (Home buying Process) पूर्ण कराव्यात लागतात. सध्याच्या काळात घरखरेदीसाठी गृहकर्ज (Home Loan) हा प्रमुख आणि सुरक्षित पर्याय मानला जात असल्यानं कर्जप्रक्रिया सर्वांत महत्त्वाची ठरते. या प्रक्रियेनंतर पुढील टप्प्यात स्टॅम्प ड्युटी (Stamp Duty on home) आणि रजिस्ट्रेशन (Registration charges on home) या महत्त्वाच्या बाबींची पूर्तता करावी लागते. या बाबी पूर्ण केल्याशिवाय कायदेशीरदृष्ट्या घराचा मालकी हक्क प्राप्त होत नाही. 1899 साली भारतीय मुद्रांक शुल्क कायदा पास झाल्यानंतर स्टॅम्प ड्युटी आकारणं सुरू झालं. स्टॅम्प ड्युटी हा कोणत्याही प्रकारच्या व्यवहारावर आकारला जाणारा कर (Tax) असतो. स्टॅम्प ड्युटीत कन्व्हेयन्स डीड, सेल डीड, पॉवर ऑफ अटर्नी आदींचा समावेश असू शकतो. स्टॅम्प ड्युटी रिफंडेबल (Refundable) नसते. स्टॅम्प ड्युटी भरल्यानंतर घराचे दस्तऐवज आणि साधनं कायदेशीरदृष्ट्या वैध ठरतात आणि न्यायालयात त्यास महत्त्वाचा पुरावा म्हणून मूल्य प्राप्त होते. कायद्यात कुठेही उल्लेख नसला तरी घरखरेदीच्या संपूर्ण व्यवहारात खरेदीदारास स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेस भरावे लागतात. अशा अनेक अर्थांनी महत्त्वाचे असणारे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेस हे राज्यानुसार वेगवेगळे असतात. स्टॅम्प ड्युटी ठरवताना त्यासाठी काही महत्त्वाचे घटक विचारात घेतले जातात. या घटकांच्या माहितीनुसार स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेट (Calculate) केली जाते. त्यासाठीच्या घटकांची माहिती असेल, तर तुम्ही घरखरेदीपूर्वी आर्थिक नियोजन करताना स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेट करून किती रक्कम भरावी लागेल याचा अंदाज घेऊ शकता. स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेट करण्यासाठी ऑनलाइन कॅल्क्युलेटर्सदेखील उपलब्ध आहेत. त्याचं नेमकं गणित कसं असतं हे सविस्तर जाणून घेऊया. हे वाचा - प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गृहकर्जावर सबसिडी मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया स्टॅम्प ड्युटी शुल्क निश्चित करण्यासाठी अनेक घटक विचारात घेतले जातात. या घटकांच्या आधारे स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेट केली जाते. स्टॅम्प ड्युटीचं कॅल्क्युलेशन मालमत्ता किंवा घराच्या मूल्यावर अवलंबून असतं. स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेशनसाठी राज्यनिहाय निकष निश्चित करण्यात आले आहेत. स्टॅम्प ड्युटी शुल्क मालमत्तेच्या प्रकारानुसार बदलतं. संबंधित मालमत्ता निवासी आहे की व्यावसायिक, ती ग्रामीण भागात आहे की शहरी भागात, यानुसार तिची स्टॅम्प ड्युटी ठरते. स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेट करताना विचारात घेतले जाणारे घटक - घराचं एकूण बाजारमूल्य (Market Value) सर्वप्रथम विचारात घेतलं जातं. घराचं बाजारमूल्य उच्च असेल तर तुमचं स्टॅम्प ड्युटी शुल्कदेखील वाढतं. तुमच्याकडे घराचं बाजारमूल्य आणि करारमूल्य, दोन्ही असेल तर त्यापैकी जे जास्त आहे, ते गृहीत धरलं जातं. - घर किंवा मालमत्तेच्या किमतीव्यतिरिक्त, खरेदी केलं जाणारं घर नवं आहे की जुनं, त्याचा प्रकार, लोकेशन (Location) म्हणजेच संबंधित घर शहरी, निमशहरी भागात आहे की ग्रामीण भागात, मालकाचं लिंग आणि वय, वापराचा उद्देश, संबंधित बिल्डिंगच्या मजल्यांची संख्या, संबंधित गृहप्रकल्पात दिल्या जाणाऱ्या विशेष अॅमेनिटीज (Amenities) आदी गोष्टींवर रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटी शुल्क अवलंबून असतं. सरकारकडे 20हून अधिक अॅमेनिटीजची यादी असते. या अॅमेनिटीज तुमच्या गृहप्रकल्पात समाविष्ट असतील तर तुम्हाला त्यासाठी अधिक शुल्क द्यावं लागतं. या अॅमेनिटीजमध्ये लिफ्ट, स्विमिंग पूल, लायब्ररी, क्लब, जिम, कम्युनिटी हॉल आदींचा समावेश असतो. - महिलांनी स्वमालकीचं घर खरेदी करण्यासाठी पुढाकार घ्यावा म्हणून आणि नव्या घराचा मालकी हक्क महिलेच्या नावावर असेल तर यासाठी काही राज्यं (States) स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत देतात. - सर्वसाधारणपणे मुद्रांक शुल्क अधिकारी घराचं किंवा मालमत्तेचं शुल्क निश्चित करण्यासाठी स्टॅम्प ड्युटी रेडी रेकनरचा (Stamp Duty Ready Reckoner) वापर करतात. दर वर्षी 1 जानेवारीला राज्य सरकारं स्टॅम्प ड्युटी रेडी रेकनरचे दर प्रसिद्ध करत असतात. या बाबींचा विचार करून स्टॅम्प ड्युटी शुल्क निश्चित केलं जातं. स्टॅम्प ड्युटी कशी कॅल्युलेट करावी? या घटकांची पूर्वकल्पना आल्यानंतर स्टॅम्प ड्युटी शुल्क नेमकं किती असेल याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. यासाठी तुम्ही ऑनलाइन कॅल्क्युलेटरचा (Online Calculator) वापर करू शकता. - स्टॅम्प ड्युटी शुल्काचा अंदाज घेण्यासाठी ती कॅल्क्युलेट करताना, घराची मूलभूत माहिती, म्हणजे ते कोणत्या राज्यात आहे, घराची किंमत किती आहे, आदी भरावी. त्यानंतर कॅल्क्युलेट या बटणावर क्लिक करावं. तुम्हाला क्षणार्धात शुल्काचा आकडा दिसेल. - त्याचप्रमाणे रजिस्ट्रेशन शुल्क जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही ऑनलाइन मालमत्ता नोंदणी शुल्क कॅल्क्युलेटरदेखील वापरू शकता. - रजिस्ट्रेशन शुल्क जाणून घेताना एकूण शुल्क समजण्यासाठी त्यात उपकर आणि अधिभारदेखील अॅड करा. - तुम्हाला ऑनलाइन कॅल्क्युलेटर वापरण्यात अडचणी येत असतील किंवा काही बाबी स्पष्टपणे समजत नसतील तर तुम्ही नोंदणी कार्यालयात जाऊनही माहिती घेऊ शकता. हे वाचा - तुम्हाला Home loan किती मिळेल? गृहकर्ज मिळण्यासाठीचे पात्रता निकष जाणून घ्या एकूणच स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेसचा आर्थिक नियोजनाच्या टप्प्यातच तुम्ही अंदाज घेतला, तर तुम्हाला आर्थिक नियोजनात मदत होऊ शकते.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Money, Real estate

पुढील बातम्या