मराठी बातम्या /बातम्या /मनी /उद्यापासून पाच दिवस स्वस्तात मिळेल सोनं; पाहा कशी आणि कुठे कराल खरेदी

उद्यापासून पाच दिवस स्वस्तात मिळेल सोनं; पाहा कशी आणि कुठे कराल खरेदी

तुमच्याकडे उद्यापासून पाच दिवस बाजारभावाहून कमी दरात सोनं खरेदीची संधी आहे.

तुमच्याकडे उद्यापासून पाच दिवस बाजारभावाहून कमी दरात सोनं खरेदीची संधी आहे.

तुमच्याकडे उद्यापासून पाच दिवस बाजारभावाहून कमी दरात सोनं खरेदीची संधी आहे.

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट : तुम्ही गोल्डमध्ये (Gold Price Today) गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. 9 ऑगस्टपासून सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम 2021-22 ची पाचव्या सीरिजची विक्री (Sovereign Gold Bond Scheme 2021-22 – Series V) सुरू होणार आहे. ही विक्री पाच दिवस सुरू राहणार आहे. तुमच्याकडे उद्यापासून पाच दिवस बाजारभावाहून कमी दरात सोनं खरेदीची संधी आहे.

ही विक्री 9 ऑगस्टपासून 13 ऑगस्टपर्यंत करता येईल. बॉन्डची इश्यू किंमत 4,790 रुपये प्रति ग्रॅम आहे. सॉवरेन गोल्ड बॉन्ड 2021-22 ची पाचवी सीरिज सोमवारपासून पाच दिवसांसाठी सब्सक्रिप्शनसाठी ओपन होईल. RBI नुसार, बॉन्डसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करत असाल, तर तुम्हाला प्रति ग्रॅम 50 रुपये सूट मिळेल. म्हणजेच अशा गुंतवणुकदारांसाठी 1 ग्रॅम गोल्ड बॉन्डची किंमत 4,740 रुपये होईल.

सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड म्हणजे काय?

सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड एक सरकारी बॉन्ड असतो. ज्याला डिमॅट स्वरुपात परिवर्तित करता येतं. याचं मुल्य रुपये किंवा डॉलरमध्ये नसतं, तर सोन्याच्या वजनात असतं. जर बॉन्ड पाच ग्रॅम सोन्याचा आहे, तर पाच ग्रॅम सोन्याची जितकी किंमत असेल तेवढी किंमत या बॉन्डची असेल. सरकारकडून आरबीआयच्या माध्यमातून हे सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड जारी केले जातात. सरकारने सॉव्हरेन गोल्ड बॉन्डची सुरुवात नोव्हेंबर 2015 मध्ये केली होती.

कुठे खरेदी करता येईल बॉन्ड?

गोल्ड बाँडची विक्री बँक, स्टॉक होल्डिंग कॉरर्पोरेशन ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस आणि मान्यता प्राप्त शेअर बाजार NSE आणि BSE द्वारे केली जाईल. Sovereign Gold Bond साठी अर्ज करताना पॅन कार्ड आवश्यक आहे. स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँकमध्ये याची विक्री होत नाही. या योजनेंतर्गत वैयक्तिक गुंतवणूकदार आणि हिंदू अविभाजित कुटुंब एका आर्थिक वर्षात कमीत कमी एक ग्रॅम आणि अधिकाधिक चार किलोग्रॅम गोल्डसाठी गुंतवणूक करू शकतात. ट्रस्टसारख्या इतर संस्था वर्षाला 20 किलोग्रॅम सोन्यात गुंतवणूक करू शकतात.

PF खात्यामध्ये तात्काळ करा 'हा' बदल; अन्यथा होईल 7 लाखांचं नुकसान

बॉन्डची किंमती कशी ठरते -

अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गोल्ड बॉन्डच्या किंमती इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेडकडून जारी झालेल्या किंमतीच्या, सामान्य सरासरी किंमतीवर असेल. ही किंमत गुंतवणुकीच्या आधीच्या आठवड्यातील शेवटच्या तीन व्यावसायिक दिवसांमध्ये 99.9 शुद्धतेच्या सोन्याची सरासरी किंमत असेल.

First published:

Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold bond