सोन्याच्या दराची रेकॉर्ड ब्रेकिंग घौडदौड सुरूच; किंमती 50 हजारांचा टप्पा लवकरच पार करण्याची शक्यता

सोन्याच्या दराची रेकॉर्ड ब्रेकिंग घौडदौड सुरूच; किंमती 50 हजारांचा टप्पा लवकरच पार करण्याची शक्यता

कोरोना व्हायरसच्या संकटकाळात देखील सोन्याच्या किंमतीचा ग्राफ चढताच आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती 50 हजारांच्या जवळ पोहोचल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 जुलै : कोरोना व्हायरसच्या संकटकाळात देखील सोन्याच्या किंमतीचा ग्राफ चढताच आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती 50 हजारांच्या जवळ पोहोचल्या आहेत. 2019 या वर्षात 25 टक्के रिटर्न दिल्यानंतर यावर्षी देखील सोन्यामधून त्यापेक्षा जास्त रिटर्न मिळण्याचे मत एक्सपर्ट्स व्यक्त करत आहेत. सोन्याच्या वाढणाऱ्या किंमतीना आजही ब्रेक मिळत नाही आहे. कोरोनाचे प्रमाण वाढू लागल्याने त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होत आहे आणि दर दिवसागणिक वाढत आहेत. चांदीचे दर देखील गेल्या 7 वर्षात उच्चस्तरावर आहेत. मौल्यवान धातूंच्या किंमतीमध्ये आलेल्या या तेजीनंतर ETFमध्ये देखील गुंतवणूक वाढू लागली आहे. डॉलरमध्ये झालेल्या घसरणीमुळे देखील सोन्याला सपोर्ट मिळत आहे.

इंडियन बुलियन अँड ज्लेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार गुरूवारी बाजार उघडताना सोन्याच्या किंमती वाढल्याचे पाहायला मिळाले. बुधवारी बाजार बंद होत असताना सराफा बाजारात 999 शुद्धतेच्या सोन्याची किंमत प्रति तोळा 49,122 रुपये इतकी होती. दरम्यान यामध्ये आज प्रति तोळा 396 रुपयांची वाढ झाली आहे.

काय आहेत सोन्याचे नवे भाव?

या 24 कॅरेट सोन्याचे भाव आज 49,318 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. त्याचप्रमाणे इतर शुद्धतेच्या सोन्यामध्ये देखील किंमती वाढल्या आहेत. 23 कॅरेट सोन्याचे भाव सकाळी 196 रुपये प्रति तोळाने वाढून 49,120 रुपयांवर पोहोचले आहेत. बुधवारी बाजार बंद होताना हे दर 48,925 रुपये प्रति तोळा होते.त्याचप्रमाणे 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे भाव देखील वाढले आहेत. या शुद्धतेच्या सोन्याचे दर अनुक्रमे 45,175 रुपये प्रति तोळा आणि 36,989 रुपये प्रति तोळा झाले आहेत.

सोन्यापाठोपाठ चांदीही महागली

चांदीने गेल्या 7 वर्षामध्ये 2020 साली सर्वात उच्च स्तरावर आहे. बुधवारी चांदीचे भाव 50,140 रुपये प्रति किलो होते. यामध्ये प्रति किलो 1092 रुपयांची वाढ झाली आहे. परिणामी चांदीचे आजचे सकाळच्या सत्रातील दर 50 हजारांवर गेले आहेत. आजचे चांदीचे भाव 51,2532 रुपये प्रति किलो झाले आहे. बाजार बंद होताना सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये बदल झालेला पाहायला मिळतो.

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 9, 2020, 12:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading