मुंबई : सॉवेरियन गोल्ड बॉन्डची नवी सीरिज सरकार घेऊन येत आहे. आजपासून 24 डिसेंबरपर्यंत तुम्हला यासाठी पैसे गुंतवता येणार आहेत. नेमकं हा गोल्ड बॉन्ड काय आहे. त्यामध्ये गुंतवणूक कशी करायची? त्यातून किती फायदा मिळतो आणि टॅक्स बेनिफिट काय आहे याबाबत माहिती जाणून घेऊया.
आर्थिक वर्ष २०२३ ची पहिली सॉवेरियन गोल्ड बॉन्ड सीरिजने होणार आहे. यासाठी इश्यूची किंमत 5091 रुपये/ ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे. ऑनलाइन शॉपिंगवर 50 रुपयांची सूट दिली जात आहे.
सॉवेरियन गोल्ड बॉन्ड ही सरकारी स्कीम आहे. डिजिटल गोल्डमध्ये पैसे गुंतवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. 2015 मध्ये सरकारने सॉवेरियन गोल्ड बॉन्ड सुरू केले होते. तुम्ही बँकेथ्रू ऑनलाईन किंवा ऑफलाईन पैसे गुंतवू शकता. ऑनलाईन खरेदी केल्यास 50 ग्रॅम सूट मिळणार आहे.
तुमच्याकडे असलेले दागिने बनावट होलमार्कचे तर नाहीत?
काय आहेत फायदे?
सॉवेरियन गोल्ड बॉन्डमध्ये एकदा तुम्ही पैसे अडकवले की त्याचा लॉकिंग कालावधी 8 वर्षांचा असतो. तुमचं बँकेत खातं असणं आवश्यक आहे. तुम्ही पोस्ट ऑफिसद्वारे देखील हे खरेदी करू शकता.
Don't miss out on this golden opportunity! SOVEREIGN GOLD BONDS SCHEME 2022-23 Tranche-III opens from 19th Dec - 23rd Dec, 2022 Know more: https://t.co/toePwiynMR#SovereignGoldBond #AzadiKaAmritMahotsavWithSBI #SBI pic.twitter.com/W4rLKCSI2W
— State Bank of India (@TheOfficialSBI) December 18, 2022
तुम्ही बॉन्डच्या बदल्यात सोनं घेऊ शकता. मॅच्युरिटीनंतर कोणताही कर लागणार नाही. घरात सोनं ठेवण्याचं टेन्शन नाही. GST स्लॅबमध्ये येत नाही. त्यामुळे तुम्हाला फिजिकल गोल्डपेक्षा हे खरेदी करणं फायद्याचं ठरतं.
बँकेच्या फेऱ्या घालण्याची गरज नाही! झटपट कसं घ्यायचं गोल्ड ओव्हरड्राफ्ट लोन?
काय सांगतो टॅक्सचा नियम?
८ वर्षांनंतर पैसे काढण्यावर भांडवली नफा कर नाही. गोल्ड बॉन्डवरील व्याजाची रक्कम करपात्र . मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढण्यावर कॅपिटल गेन टॅक्स. बॉन्ड ट्रान्सफरवरील दीर्घकालीन भांडवली नफ्यावर इंडेक्सेशन बेनिफिट .
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold bond, Gold prices today