मराठी बातम्या /बातम्या /मनी /

बँकेच्या फेऱ्या घालण्याची गरज नाही! झटपट कसं घ्यायचं गोल्ड ओव्हरड्राफ्ट लोन?

बँकेच्या फेऱ्या घालण्याची गरज नाही! झटपट कसं घ्यायचं गोल्ड ओव्हरड्राफ्ट लोन?

ना ढिगानं कागदपत्राची कटकट ना बँकेच्या फेऱ्या मारायचं टेन्शन नाही, गोल्ड ओव्हड्राफ्टवर मिळणार चुटकीसरशी लोन

ना ढिगानं कागदपत्राची कटकट ना बँकेच्या फेऱ्या मारायचं टेन्शन नाही, गोल्ड ओव्हड्राफ्टवर मिळणार चुटकीसरशी लोन

ना ढिगानं कागदपत्राची कटकट ना बँकेच्या फेऱ्या मारायचं टेन्शन नाही, गोल्ड ओव्हड्राफ्टवर मिळणार चुटकीसरशी लोन

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : अडचणीच्या काळात जेव्हा खूप जास्त पैशांची गरज लागते तेव्हा लोनसाठी बँकेकडे नागरिक जातात. मात्र लोनची प्रक्रिया एवढी किचकट आणि त्रासदायक असते की त्यामुळे प्रक्रिया आवर पण लोन नको अशी तऱ्हा होते. अशा वेळी मग सावकार किंवा श्रीमंत लोकांकडून व्याजावर पैसे घेतले जातात. अशा घटनांमध्ये पिळवणूक आणि फसवणूक होण्याचा धोका असतो. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आज एक चांगली युक्ती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तुम्हाला कर्जाच्या प्रक्रियेची कटकट नको असेल तुमच्याकडे जर सोनं असेल तर तुम्ही बँकेतून गोल्डवर ओव्हरड्राफ्ट घेऊ शकता. आता गोल्डवर ओव्हरड्राफ्ट कसं मिळतं? नक्की हे काय आहे यासाठी नेमकी प्रक्रिया कशी असते याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

तुमचा क्रेडिट स्कोअर खराब असेल किंवा तुम्ही कधीही आयटीआर फाईल केला नसेल तर लोन घेण्यात अनेक अडचणी येतात. काही वस्तू तारण म्हणून बँकेला दिल्यास कर्जप्रक्रिया अतिशय सोपी होऊ शकते. अशा परिस्थितीत तुमच्या घरात ठेवलेलं सोनं तुम्हाला खूप उपयोगी पडू शकतं. तुम्ही तुमच्या गरजेनुसार बँकेकडे ते तारण ठेवू त्या बदल्यात पैसे घेऊ शकता. बँका 2 प्रकारचे गोल्ड लोन देतात.

कार खरेदीसाठी कर्ज घेताय? बँक ऑफ महाराष्ट्र देतंय स्वस्त लोन

बँक तुम्हाला गोल्ड ओव्हरड्राफ्ट सुविधा आणि गोल्ड लोन ईएमआयचा पर्याय देते. या दोन्ही पर्यायांपैकी कोणत्याही एका पर्यायाचा वापर करून तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करू शकता. आपण कोणता पर्याय निवडावा हे आपल्या आर्थिक गरजांवर अवलंबून असते.

गोल्ड ओव्हरड्राफ्ट नक्की काय?

गोल्ड ओव्हरड्राफ्ट सुविधा हा एक चांगला पर्याय असू शकतो कारण ते क्रेडिट कार्डसारखे काम करतं. गोल्ड ओव्हरड्राफ्ट लोनमध्ये आपल्याला मिळणारी रक्कम आपल्या गोल्ड लोनच्या रकमेएवढीच असते. जेव्हा तुम्ही सावकाराकडे सोनं जमा करता, तेव्हा ते ओव्हरड्राफ्ट अकाऊंट तयार करतात.

यामध्ये सोन्याच्या किमतीएवढी कर्जाची रक्कम जमा केली जाते. याचा वापर तुम्ही क्रेडिट कार्ड म्हणून करू शकता. साधारण कर्जापेक्षा व्याजदर कमी असतं. यासाठी EMI न देता तुम्ही एकरकमी रक्कम भरून तुमचं सोनं परत घेऊ शकता.

ज्याची भीती तेच घडलं, 3900 रुपयांनी महाग झालं सोनं; दागिने करण्याआधी चेक करा दर

याचा कसा होऊ शकतो फायदा?

कागदपत्रांचा त्रास कमी असतो. इतर कर्जांपेक्षा हे कर्ज अगदी सहज उपलब्ध होतं. गोल्ड ओव्हरड्राफ्ट सुविधेसोबत तुम्हाला हवा तेवढा खर्च तुम्ही करू शकता. मात्र तुम्हाला व्याज भरावं लागतं. तुम्हाला हे लोन पटकन मिळत त्यामुळे डोक्याला जास्त त्रास नसतो.

महागाईचा परिणाम जागतिक स्तरावर सोन्याच्या किमतीवर होतो, सरकारची सोन्याची खरेदी आणि मागणी-पुरवठ्यातील असमतोल, सोन्याच्या किमती यांचा परिणाम तुमच्या गोल्ड लोनच्या व्याजावर होतो.

कर्जाची परतफेड वेळेवर झाली नाही तर गहाण ठेवलेले सोने ऑक्शनमध्ये काढलं जातं. गोल्ड लोन घेण्यापूर्वी तुम्ही परतफेडीशी संबंधित सर्व तपशील समजून घ्यावेत, अन्यथा आणखी त्रास होऊ शकतो. कर्ज घेण्यापूर्वी विविध बँकांचे व्याजदर नक्की तपासून पाहा.

First published:

Tags: Gold, Gold bond, Instant loans, Loan, Mumbai, Pay the loan