मुंबई: सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे सोनं खरेदीला उधाण आलं आहे. सराफ बाजारात मोठी गर्दी असते. यावेळी आपण होलमार्किंग पाहून दागिने घेतो. सध्या होलमार्किंगमध्येही फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याचं समोर आलं आहे. बनावट होलमार्किंग करून दागिने विकले जात आहेत. त्यामुळे तुम्ही जर दागिने घेतले असतील किंवा घेणार असाल तर तुम्ही सतर्क राहाणं महत्त्वाचं आहे. काही लोक सोन्याच्या दागिन्यांवर बनावट सोन्याचे हॉलमार्किंग करून ग्राहकांची फसवणूक करत असल्याची कबुलीही हॉलमार्किंग फेडरेशन ऑफ इंडियाने (एचएफआय) दिली आहे. बनावट हॉलमार्किंग बंद करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी फेडरेशनने सरकारला पत्र लिहून केली आहे. होलमार्किंग काय आहे? हॉलमार्किंगमुळे सोन्याच्या शुद्धतेची हमी मिळते. प्रत्येक दागिन्यावर होलमार्किंगची खूण असते. त्यात ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सचा (बीआयएस) लोगो, त्याची शुद्धता त्यावरून ओळखली जाते. यासोबतच हॉलमार्किंगमध्ये टेस्टिंग सेंटर आदींची माहितीही मिळते. अनेक वेळा ज्वेलर्स कमी कॅरेटच्या दागिन्यांवर जास्त कॅरेटचे दर आकारतात. हे दूर करण्यासाठी हॉलमार्किंग बंधनकारक करण्यात आले आहे.
सोनं-चांदी गुंतवणूक करावी का? येत्या 15 दिवसात दर किती वाढेल; तज्ज्ञ काय म्हणतातकसं ओळखायचं होलमार्किंग बनावट आहे की नाही? सरकारने गेल्या वर्षी १ जुलैपासून सोन्याच्या दागिन्यांच्या हॉलमार्किंगमध्ये फक्त तिन्ह चिन्हं अधिकृत धरली जाणार आहेत. पहिलं चिन्ह बीआयएस हॉलमार्क आहे. ही एक त्रिकोणी खूण आहे. दुसरे चिन्ह शुद्धता आहे किंवा नाही, हे दर्शविते की हे दागिने किती कॅरेट सोन्याचे बनलेले आहेत.
लग्नसराईत सोन्याची खरेदी करायची, पाहा तुमच्या जिल्ह्यातील आजचे सोन्याचे दरतिसरे चिन्ह सहा-अंकी अल्फान्यूमेरिक कोड आहे ज्याला HUD क्रमांक म्हणतात. HUD म्हणजे हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर. या सहा अंकी कोडमध्ये अक्षरे आणि अंकांचा समावेश आहे. हॉलमार्किंगच्या वेळी, प्रत्येक दागिन्यांना एचयूआयडी क्रमांक दिला जातो. ही संख्या अनोखी असते याचा अर्थ असा की एकाच एचयूआयडी नंबरचे दोन दागिने असू शकत नाहीत.