मराठी बातम्या /बातम्या /मनी /

'फायदा मिळवून मुलीचं लग्न धुमधडाक्यात करायचं होतं पण...' दुकानदाराने फटाक्यांमध्ये गुंतवले लग्नाचे पैसे

'फायदा मिळवून मुलीचं लग्न धुमधडाक्यात करायचं होतं पण...' दुकानदाराने फटाक्यांमध्ये गुंतवले लग्नाचे पैसे

दिवाळी म्हटलं की फटाके हे समीकरण यंदा सर्वांना मोडीत काढण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. देशातील विविध भागात फटाक्यांवर अंशत: किंवा पूर्णपणे बंदी आणली आहे

दिवाळी म्हटलं की फटाके हे समीकरण यंदा सर्वांना मोडीत काढण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. देशातील विविध भागात फटाक्यांवर अंशत: किंवा पूर्णपणे बंदी आणली आहे

दिवाळी म्हटलं की फटाके हे समीकरण यंदा सर्वांना मोडीत काढण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. देशातील विविध भागात फटाक्यांवर अंशत: किंवा पूर्णपणे बंदी आणली आहे

    दिपक रावत, नवी दिल्ली, 07 नोव्हेंबर: दिवाळी म्हटलं की फटाके हे समीकरण यंदा सर्वांना मोडीत काढण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. देशातील विविध भागात फटाक्यांवर अंशत: किंवा पूर्णपणे बंदी आणली आहे. दिल्ली सरकारने (Delhi Government) ने दिल्लीमध्ये वाढते वायू प्रदूषण (Air Pollution) आणि कोरोनाचे संक्रमण लक्षात घेता फटाक्यांवर बंदी आणली आहे. 7 ते 27 नोव्हेंबर दरम्यान फटाके खरेदी आणि विक्रीवर बॅन असणार आहे. या नियमाचे उल्लंघन कल्यास एक लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. मात्र सरकारच्या या निर्णयामुळे फटाक्यांचा बाजार थंड पडला आहे. कोट्यवधींचे फटाके गोदामात किंवा दुकानात सडत आहेत. फटाके बनवणाऱ्या कारखान्यांनी फटाके विकले असल्यामुळे ते किरकोळ किंवा घाऊक व्यापाऱ्याकडे पडले आहेत. यां दुकानदारांची मोठी रक्कम या फटाक्यात अडकली आहे. जामा मशिद परिसरात फटाके विकणाऱ्या एका दुकानदाने अशी माहिती दिली की त्यांनी मुलीच्या लग्नासाठी ठेवलेल्या पैशातून ग्रीन फटाके (Green Firecrackers) खरेदी केले आहेत. (हे वाचा-IRCTC ने रेल्वे तिकिट बुकिंगसाठी नवा नियम, खोळंबा टाळण्यासाठी वाचा सविस्तर) फायदा मिळेल असा विचार करून गुंतवले पैसे दिल्लीमध्ये ग्रीन फटाक्यांच्या व्यवसाय करणाऱ्या दीपक जैन यांच्यासमोर आता मुलीचं लग्न कसं करायचं हा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. न्यूज18 शी केलेल्या संभाषणात ते म्हणाले की, 'सुरुवातीला सरकारने असे सांगितले होते की ग्रीन फटाके विकता येतील. त्यामुळे 4 ते 5 लाखाचे फटाके खरेदी केले. यापैकी आता 20 ते 25 हजारांची देखील विक्री झाली नाही आहे. उर्वरित माल विकण्याआधीच दिल्ली सरकारने फटाक्यांवर पूर्णपणे बंदी आणली. या महिन्यात मुलीचं लग्न आहे. मुलीच्या लग्नासाठी जे पैसे जमा केले होते त्यातील काही पैसे फटाक्यांमध्य लावले होते.' मुलीचं लग्न धुमधडाक्यात करण्याचं  होतं स्वप्न दीपक जैन पुढे म्हणाले की, 'विचार केला होता की, जर विक्री चांगली झाली असती तर मुलीचं लग्न आणखी चांगल्या पद्धतीने करता आलं असतं. मात्र आता सरकारने फटाक्यांवर बॅन आणल्यामुळे तो सर्व माल दुकानातच पडून आहे. आता काय करणार? सर्व पैसे फटाक्यांवर खर्च झाले आणि विक्री देखील बंद आहे. अशावेळी मुलीचं लग्न करणं खूप कठीण आहे.' (हे वाचा-Work From Home बाबत सरकारची मोठी घोषणा, शिथिल केले हे महत्त्वाचे नियम) जैन यांनी दिल्ली सरकारकडून मदतीची अपेक्षा केली आहे. त्यांनी सरकारकडे भरपाईची देखील मागणी केली आहे. ते म्हणाले की, 'सरकारने आम्हाला भरपाई द्यावी, आम्ही याच्या  विरोधात नाही आहोत. पण जर सरकारला ग्रीन फटाके देखील बॅन करायचे होते तर त्यांनी ते आधीच करायला हवं होतं. कारखान्यांनी त्यांचा माल विकला आणि आता आम्ही छोटे दुकानदार फसलो आहोत. खूप नुकसान झाले आहे.'
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Air pollution, Delhi, Diwali 2020

    पुढील बातम्या