मराठी बातम्या /बातम्या /मनी /Multibagger Stock : 'या' स्टॉकमध्ये वर्षभरात 110 टक्के रिटर्न; शेअर आणखी वर जाण्याचा तज्ज्ञांचा अंदाज

Multibagger Stock : 'या' स्टॉकमध्ये वर्षभरात 110 टक्के रिटर्न; शेअर आणखी वर जाण्याचा तज्ज्ञांचा अंदाज

2021 च्या सुरुवातीला Southern Petrochemical शेअरची किंमत 24.40 रुपये प्रति शेअर होती, ती आता 51.60 रुपये प्रति शेअर झाली आहे. अशा प्रकारे या SPIC च्या शेअर्सनी 2021 मध्ये आतापर्यंत सुमारे 110 टक्के परतावा दिला आहे.

2021 च्या सुरुवातीला Southern Petrochemical शेअरची किंमत 24.40 रुपये प्रति शेअर होती, ती आता 51.60 रुपये प्रति शेअर झाली आहे. अशा प्रकारे या SPIC च्या शेअर्सनी 2021 मध्ये आतापर्यंत सुमारे 110 टक्के परतावा दिला आहे.

2021 च्या सुरुवातीला Southern Petrochemical शेअरची किंमत 24.40 रुपये प्रति शेअर होती, ती आता 51.60 रुपये प्रति शेअर झाली आहे. अशा प्रकारे या SPIC च्या शेअर्सनी 2021 मध्ये आतापर्यंत सुमारे 110 टक्के परतावा दिला आहे.

मुंबई, 12 डिसेंबर : साऊथर्न पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन (Southern Petrochemical Industries CorpLd- SPIC) हा अशा शेअर्सपैकी एक आहे ज्याने 2021 मध्ये मल्टीबॅगर परतावा (Multibagger Return) दिला आहे. वर्ष 2021 च्या सुरुवातीला या शेअरची किंमत 24.40 रुपये प्रति शेअर होती, ती आता 51.60 रुपये प्रति शेअर झाली आहे. अशा प्रकारे या SPIC च्या शेअर्सनी 2021 मध्ये आतापर्यंत सुमारे 110 टक्के परतावा दिला आहे. Choice Broking चे कार्यकारी संचालक सुमीत बगडिया यांना पुढील तीन महिन्यांत स्टॉक त्याच्या गुंतवणूकदारांना (Investors) आणखी 36 टक्के नफा देईल अशी अपेक्षा आहे.

लाइव्हमिंटच्या अहवालानुसार, सुमीत बगाडिया यांनी स्टॉकसाठी BUY रेटिंग दिले आहे आणि पुढील तीन महिन्यांच्या कालावधीसाठी 68 रुपयांची टार्गेट प्राईज दिली आहे. वीकली चार्टने या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये पेनंट पॅटर्नचे ब्रेकआउट दिले आहे. हा स्टॉकसाठी तेजीचा कल आहे. स्टॉकचा डेली चार्ट देखील अपसाईड दर्शवत आहे.

सुमित बगाडिया पुढे म्हणाले की, चार्ट सूचित करतो की SPIC स्टॉक नजीकच्या भविष्यात तेजीत राहील. स्टॉक त्याच्या 21 दिवस आणि 50 दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेजच्या (Moving Average) वर ट्रेड करत आहे. हे देखील सकारात्मक आहे.

विराट-अनुष्काच्या बॉडीगार्डची सॅलरी ऐकून थक्क व्हाल! अनेक कंपन्याच्या CEO पेक्षा अधिक कमाई

गुंतवणूकदारांना सल्ला देताना सुमीत बगडिया म्हणाले, SPIC स्टॉककडे 50 रुपयांच्या आसपास खरेदीची संधी म्हणून पाहिले पाहिजे आणि त्यासाठी 60-68 रुपयांची टार्गेट प्राईज ठेवली पाहिजे. सध्याच्या किमतीपेक्षा हे 36 टक्के जास्त आहे. या मल्टीबॅगर स्टॉकला 45 ते 42 रुपयांपर्यंत सपोर्ट दिसत आहे. अशा स्थितीत 42 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवून या स्टॉकमध्ये एक पोझिशन घेता येईल.

तुमच्या Adhaar card वर दुसरं कुणी सिम वापरतंय का? दोन मिनिटात करा चेक

गेल्या 1 वर्षातील स्टॉकची कामगिरी

SPIC शेअरच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, या शेअरने गेल्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 5.74 टक्के परतावा दिला आहे. त्याच वेळी गेल्या 6 महिन्यांत या स्टॉकच्या किमतीत सुमारे 15.82 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी 2021 मध्ये, या स्टॉकने 11.48 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे, तर गेल्या एका वर्षात त्याच्या गुंतवणूकदारांना 123.86 टक्के परतावा मिळाला आहे. शुक्रवारी, 11 डिसेंबर रोजी, SPIC शेअर्स NSE वर 0.09 टक्के वाढून, 51.60 रुपये प्रति शेअर वर बंद झाले.

First published:
top videos

    Tags: Investment, Money, Share market