नवी दिल्ली, 01 जुलै: कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या नीरव मोदीच्या (Nirav Modi) बहिणीने भारत सरकारला 17 कोटी पाठवले आहेत. नीरव मोदीची बहिण पूर्वी मोदी (Purvi Modi) हिने यूकेच्या बँक खात्यातून भारत सरकारच्या बँक खात्यामधये 17 कोटी पाठवले असल्याची माहिती सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने (Directorate of Enforcement) दिली आहे. भारत सरकारने पूर्वी मोदींना असं म्हटलं होतं की जर त्यांनी PNB स्कॅमच्या (PNB Scam) चौकशीमध्ये सहकार्य केलं तर त्यांच्याविरोधात क्रिमिनल कारवाई होणार नाही.
Purvi Modi, sister of Nirav Modi remitted an amount of USD 2316889.03 from the UK bank account to the bank account of the Government of India, Directorate of Enforcement. ED was able to recover approximately Rs 17.25 cr (USD 2316889.03) from the proceeds of crime: ED pic.twitter.com/By0bJt5nzQ
— ANI (@ANI) July 1, 2021
24 जून रोजी पूर्वी मोदी यांनी ईडीला (ED) अशी माहिती दिली होती की लंडनमध्ये त्यांच्या नावे एका बँक अकाउंट संदर्भातील माहिती त्यांच्या समोर आली आहे. हे खातं त्यांचा भाऊ नीरव मोदीने सुरू केलं होतं. मात्र त्यातील पैसे त्यांचे नसल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यावेळी कबुल केल्याप्रमाणे पूर्वी मोदी यांनी त्या खात्यातील 23 लाख 16 हजार 889 डॉलर अर्थात जवळपास 17.25 कोटी भारत सरकारच्या खात्यात पाठवले केले आहेत. हे वाचा- Bank Privatisation: मोठी बातमी! या बँका होणार खाजगी, पावसाळी अधिवेशनात निर्णय मुंबईतील ब्रॅडी हाऊस पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) शाखेत 2 अब्ज डॉलर्सच्या कर्जाच्या घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदी सध्या युकेच्या तुरूंगात आहे आणि त्याने भारताकडे प्रत्यर्पणाची याचिका दाखल केली आहे.