नवी दिल्ली, 21 जून : सेव्हिंगचं महत्व लोकांना कळतंय. मग अशा वेळी पैशांची बचत करण्यासाठी लोक विविध मार्ग शोधतात. यात एसआयपीचा पर्याय अनेक लोक निवडतात. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हा गुंतवणुकी साठी उत्तम पर्याय मानला जातो. गुंतवणुकीच्या या पद्धतीमुळे नियमित बचतीची सवयही लागते आणि गुंतवणुकीवर चांगले रिटर्नही मिळता. पण अनेक वेळा अकाउंटमध्ये पुरेसं बॅलेन्स नसतं आणि हप्ता चुकतो. मग अशा वेळी काय होईल? SIP बंद होते का आणि SIP बंद झाल्यास काय करावे? याविषयी सविस्तर आपण जाणून घेणार आहोत.
SIP चं इंस्टॉलमेंट दरमहा तुमच्या अकाउंटमधून ऑटो डेबिट केला जातो. म्हणूनच SIP च्या डेटला, SIP मध्ये जाण्यासाठी आवश्यक तेवढे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये असणे आवश्यक आहे. स्टॉक ब्रोकर ड्यू डेटला पेमेंटची रिक्वेस्ट पाठवतो. पैसे उपलब्ध नसल्यामुळे पेमेंट केले जात नाही. बँक ते डीफॉल्ट म्हणून पाहते कारण तुम्ही आधीच निश्चित रक्कम कट करण्यास मंजुरी दिली आहे. अशा परिस्थितीत, बँक तुमच्याकडून पेमेंट डिफॉल्टची पेनाल्टी घेऊ शकते. एसआयपी पुन्हा पुन्हा मिस झाल्यास काय होईल? तुमच्या SIP चा हप्ता सलग 4 महिने मिस झाल्यास, तुमची SIP कँसल केली जाऊ शकते. पूर्वी हा नियम 3 महिन्यांसाठी होता मात्र आता हा नियम 4 महिन्यांसाठी सुधारण्यात आला आहे. एसआयपी रद्द करणे म्हणजे तुम्ही त्या एसआयपीमध्ये यापुढे पैसे गुंतवू शकणार नाही. तर, तुम्ही जमा केलेल्या रकमेच्या मॅच्योरिटीनंतर तुम्ही ती काढू शकाल. सुरुवातीच्या प्लानच्या तुलनेत तुम्हाला कमी रिटर्न मिळण्याची शक्यता आहे. Investment Tips: पैसे डबल करायचे आहेत? या स्किममध्ये करा गुंतवणूक, 5 वर्षात मिळेल बंपर रिटर्न SIP चुकू नये यासाठी काय करायचं? SIP च्या ड्यूट डेटला तुमच्या अकाउंटमध्ये एक निश्चित रक्कम असल्याची तुम्हाला खात्री करावी लागेल. जेणेकरून पेमेंट डिफॉल्ट होणार नाही. यासोबतच तुम्ही तुमचं बँक अकाउंट रेग्युलरली मॉनिटर करत राहा. अनेकदा लोकांना अकाउंट बॅलेन्स मेनटेन करु शकत नाही. उत्पन्नाचे स्त्रोत कमी झाल्यामुळे किंवा इतर गरजांसाठी पैसा खर्च केल्यामुळे असे होऊ शकते. त्यामुळे जेव्हा तुम्ही आर्थिक संकटातून जात असाल तेव्हा तुम्ही तुमची SIP कॅन्सल किंवा पॉज करू शकता. बहुतेक फंड हाऊसेस SIP पॉज करण्याचा किंवा तात्पुरता थांबवण्याचा ऑप्शन देतात. तुमच्याकडे पैसे असतील, तेव्हा तुम्ही तुमची SIP पुन्हा सुरू करू शकता. Education Loan: हायर एज्युकेशनसाठी लोन घ्यायचं आहे? मग अवश्य जाणून घ्या या गोष्टी काही म्युच्युअल फंड SIP मध्ये मोडिफाय करण्याचा ऑप्शनही देतात. यामध्ये तुम्ही SIP ची अमाउंट बदलू शकता. फ्रीक्वेन्सी बदलू शकता आणि पेमेंटची तारीख देखील बदलू शकता. या गोष्टी लक्षात ठेवून, तुम्ही SIP मिस होण्यापासून रोखू शकता. यासोबतच तुम्ही तुमच्या आर्थिक चक्रानुसार तुमच्या SIP ची तारीख प्लान करणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून सॅलरी किंवा अकाउंटमध्ये पैसे येताच तुमचा एसआयपी कापला जाईल. यासह, तुमची रेग्युलर बचत देखील सुरू राहील आणि SIP रद्द होण्याची रिस्कही राहणार नाही.