जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Investment Tips: पैसे डबल करायचे आहेत? या स्किममध्ये करा गुंतवणूक, 5 वर्षात मिळेल बंपर रिटर्न

Investment Tips: पैसे डबल करायचे आहेत? या स्किममध्ये करा गुंतवणूक, 5 वर्षात मिळेल बंपर रिटर्न

म्यूच्युअल फंड

म्यूच्युअल फंड

Investment Tips: म्युच्युअल फंड मार्केटमध्ये योग्य योजनेत पैसे गुंतवले तर भरघोस रिटर्न मिळण्याची शक्यता वाढते. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीची जोखीम कमी करण्यासाठी गुंतवणूकदारांनी फंड निवडताना सावधगिरी बाळगली पाहिजे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली,18 जून : बदलत्या काळानुसार लोकांना गुंतवणूक करण्याचं महत्त्व कळतंय. अशा वेळी गुंतवणुकीसाठी आता विविध पर्यायही उपलब्ध आहे. अशा वेळी भरघोस रिटर्न देणाऱ्या ठिकाणी गुंतवणूक करणं फायदेशीर ठरतं. तुम्ही म्युच्युअल फंड मार्केटमध्ये योग्य योजनेत पैसे गुंतवले तर बंपर रिटर्न मिळण्याची शक्यता वाढते. तुम्ही वेगवेगळ्या सेगमेंटवर नजर टाकली तर स्मॉल कॅप शेअरर्सचं प्रदर्शन मिड आणि लार्ज कॅपपेक्षा चांगलं राहील. मे महिन्यात इक्विटी आवक 50 टक्क्यांनी कमी झाली असली तरी, दुसरीकडे गुंतवणूकदार स्मॉल कॅप शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत. मासिक आधारावर, स्मॉलकॅप फंडातील गुंतवणूक 50 टक्क्यांनी वाढून 3282 कोटी रुपये झाली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

सध्या, स्मॉलकॅप्समध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली आहे. यामुळे या योजनांचे शॉर्ट टर्म आणि लॉन्ग टर्म रिटर्न देखील सुधारले आहे. गेल्या 5 वर्षांत काही योजनांनी गुंतवणूकदारांचे पैसे डबल किंवा डबलपेक्षाही जास्त केले आहेत. क्वांट, निप्पॉन इंडिया आणि आयसीआयसीआय प्रू स्मॉल कॅप फंड हे असेच एक स्मॉल कॅप म्युच्युअल फंड प्लान आहे. हे स्मॉल कॅप म्युच्युअल फंड त्यांच्या स्थापनेपासून त्यांच्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट रिटर्न देत आहेत. PPF: तुम्हीही पीपीएफ अकाउंट ओपन केलंय? मग Form D विषयी माहिती असायलाच हवी चांगले रिटर्न देणारे स्मॉल कॅप फंड्स कोणते? क्वांट स्मॉल कॅप फंडने गेल्या 3 वर्षांत 65.26 टक्के रिटर्न दिलं आहे. तर 5 वर्षात SIP रिटर्न 38.62 टक्के राहिला आहे. जो या कॅटेगिरीमध्ये सर्वाधिक आहे. निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड 49.90 टक्के रिटर्न देऊन दुसऱ्या नंबरवर आहे. 5 वर्षांमध्ये SIP रिटर्न 38.62 टक्के प्रतिवर्ष होता. ICICI प्रुडेन्शियल स्मॉल कॅप फंड तिसऱ्या नंबरवर होता, ज्याने 47.56 टक्के रिटर्न जेनरेट केला आहे. 5 वर्षांमध्ये SIP रिटर्न 31.26% प्रतिवर्ष राहिलाय. ITR Filling 2023: टॅक्स वाचवण्यात अडचणी येताय? या 10 पद्धतींनी वाचतील लाखो रुपये गुंतवणूक करताना घ्या काळजी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीची जोखीम कमी करण्यासाठी गुंतवणूकदारांनी फंड निवडताना सावध राहायला हवं. महत्त्वाचं म्हणजे, चांगल्या प्रकारे विविध इक्विटी फंडमध्ये गुंतवणूक करणं चांगलं आहे. जे कमी-जोखीम असलेल्या म्युच्युअल फंड उत्पादनांच्या कॅटेगिरीमध्ये येतात. जोखीम कमी करण्यासाठी, गुंतवणूकदार इक्विटी फंडातून हायब्रिड आणि बॅलन्स्ड फंडांकडे ट्रान्सफर करु शकतात. ज्यात कमी जोखीम मार्जिन असू शकते. स्टॉक, डेट आणि गोल्ड यासह विविध एसेट क्लासमध्ये गुंतवणूक करणाऱ्या फंडांमध्ये गुंतवणूक करून जोखीम काही प्रमाणात कमी केली जाऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात