मुंबई, 21 नोव्हेंबर : गुंतवणूक (Investment) करायचं ठरवलं तरी ती कुठे करावी असा अनेकांना प्रश्न पडतो. सध्या गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे कमी जोखमीसह पोस्ट ऑफिस, बँक (Post Office, Bank Investment) हे पर्याय आहेत. तर कमी वेळेत जास्त रिटर्न्स हवे असतील तर म्युच्युअल फंड, शेअर बाजार (Mutual Fund, SHare Market) असे पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही देखील गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.
तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. म्युच्युअल फंड बाजार ही जोखमींनी युक्त गुंतवणूक आहे. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी, जास्तीत जास्त परतावा मिळवण्यासाठी अनेक नियम आहेत. म्युच्युअल फंडाचा 15 x 15 x 15 नियम (15 x 15 x 15 rule) हा त्यापैकी एक आहे.
Dolly Khanna पोर्टफोलिओच्या या शेअरने दिला 4100% रिटर्न! तुमच्याकडे आहे का?
15X15X15 नियम काय सांगतो?
म्युच्युअल फंड SIP (Systematic Investment Plan) गुंतवणुकीत, एक गुंतवणूकदार 15 वर्षांसाठी दरमहा 15,000 गुंतवून लक्षाधीश होऊ शकतो. हा नियम सांगतो की जर एखाद्या गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंडात दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केली तर परतावा 15 टक्के असेल. म्हणजेच अवघ्या 15 वर्षात कोणीही करोडपती होऊ शकतो. म्युच्युअल फंड कॅल्क्युलेटर असे सुचवतात की एखादी व्यक्ती त्याची मॅच्युरिटी रक्कम दुप्पट करू शकते आणि वार्षिक 15 टक्के वाढ राखल्यास 15 वर्षांत 1 कोटींपेक्षा जास्त मिळवू शकते.
SBI Fraud Alert: बँक खात्यासंदर्भातली 'ही' माहिती कुणालाही सांगू नका; अन्यथा...
उदाहरणाने समजून घेऊया
जर कोणी 15 वर्षांसाठी 15 हजार रुपयांची मासिक SIP करत असेल, तर तुमची गुंतवणूक केलेली रक्कम 27 लाख रुपये होईल. अशा परिस्थितीत, जर आम्ही 15 टक्के वार्षिक परतावा गृहीत धरला, तर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर 74,52,946 रुपयांपर्यंतचा एकूण अंदाजे परतावा मिळू शकतो. म्हणजेच तुमचे 27 लाख रुपये 15 वर्षांनंतर 1,01,52,946 रुपये होतील. अशा प्रकारे 15 वर्षात दरमहा 15 हजार रुपये जमा करून तुम्ही करोडपती होऊ शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Mutual Funds