मुंबई, 11 मार्च : भारतीय शेअर बाजार (Indian Share Market ) वॅल्युएशनच्या बाबतीत जगातील 5 वे सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज बनले आहे. भारतीय शेअर बाजाराने इंग्लंड, कॅनडा आणि सौदी अरेबियाच्या स्टॉक एक्सचेंजला मागे टाकले आहे. यूएस हे सध्या जगातील सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज आहे. दुसऱ्या क्रमांकावर चीनचे स्टॉक एक्सचेंज आहे. जपान तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या क्रमांकावर हाँगकाँग आहे. जगातील टॉप शेअर बाजारांचे वॅल्युएशन वॅल्युएशनच्या बाबतीत भारत जगातील 5 वे सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज बनले आहे. त्याने इंग्लंड, कॅनडा आणि सौदी अरेबियाच्या स्टॉक एक्सचेंजला मागे टाकले आहे. युक्रेनवर रशियाचा (Russia-Ukraine War) हल्ला सुरू झाल्यापासून सौदी अरेबिया वगळता जगातील इतर सर्व शेअर बाजार घसरले आहेत. डिसेंबरपासून यूएस स्टॉक मार्केटचे वॅल्युएशन 66 ट्रिलियन डॉलरने कमी झाले आहे. चीनच्या शेअर बाजाराचे मूल्यांकन 1.48 ट्रिलियन डॉलरने घसरले आहे. जपानच्या शेअर बाजाराचे मूल्यांकन 622 अब्ज डॉलरनी घसरले आहे. हाँगकाँगच्या शेअर बाजाराचे मूल्यांकन 524 अब्ज डॉलरनी घसरले आहे. गृहकर्जासाठी Cibil Score महत्त्वाचा; सिबिल स्कोअर चांगला ठेवण्यासाठी ‘हे’ करा भारतीय बाजार मूल्य 257 अब्ज डॉलरने घसरले 2022 च्या सुरुवातीपासून भारतीय शेअर बाजारांने 257.35 अब्ज डॉलर गमावले आहेत. ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने म्हटले आहे की कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असतानाही भारतीय बाजारांनी चांगली कामगिरी केली. शेअर बाजारातील देशांतर्गत गुंतवणुकीचा यात मोठा हात आहे. दुसरीकडे, जीडीपीमध्ये तेलाचा वाटाही कमी झाला आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीचा भारतीय बाजारांवर परिणाम कोटक महिंद्रा अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश शाह यांनी 10 मार्च रोजी CNBC-TV18 शी एका खास संभाषणात सांगितले की, गेल्या दोन दिवसांत मार्केटमध्ये झालेली रिकव्हरी ही निवडणुकीच्या निकालांमुळे बदललेल्या भावनांमुळे आहे. दुसरीकडे, युक्रेन आणि रशियासोबतचे युद्ध संपवण्यासाठी वाटाघाटी करण्याचे प्रयत्न सुरू असून, दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री पुन्हा चर्चा करणार आहेत. Pension Scheme: अटल पेन्शन योजना आणि NPS कडे लोकांचा कल वाढला, सबस्क्रायबर्स संख्येत 22 टक्के वाढ रशिया आणि युक्रेनमधील लढतीचा भारतीय शेअर बाजारांवर मोठा परिणाम झाला आहे. विदेशी संस्थागत गुंतवणूकदार (FII) शेअर बाजारात सातत्याने विक्री करत आहेत. भारतीय शेअर बाजारांची खरी लढाई ही विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची विक्री आहे. गेल्या काही दिवसांपासून ते दररोज सुमारे 1 अब्ज डॉलरची विक्री करत आहेत, असं मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे सह संस्थापक आणि सह व्यवस्थापकीय संचालक रामदेव अग्रवाल म्हणाले. ते पुढे म्हणाले की FII आता भारतीय बाजारातून बाहेर पडत आहेत. पण जेव्हा त्यांना पुन्हा भारतीय बाजारपेठेत प्रवेश करायचा असेल, तेव्हा त्यांना ते खूप कठीण जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.