मुंबई : शेअर मार्केटमध्ये दोन प्रकारचे लोक ट्रेडिंग करत असतात. एक रोज ट्रेडिंग करणारे आणि दुसरे लाँग टर्मचा विचार करून ट्रेडिंग करणारे आहेत. गेल्या काही दिवसांत शेअर बाजारात मोठी उलथापालथ सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मंदी चं सावट आहे. त्यामुळे आशियातील बाजारपेठेवर त्याचा मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. दिवाळीआधी शेअर मार्केटमधील स्थिती थोडी स्थिरावली आहे. मात्र त्याचवेळी एक मोठी बातमी येत आहे. शेअर मार्केटमध्ये 24 ऑक्टोबर रोजी शेअर विकता येणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला जर शेअर्स विकायचे असतील तर तुम्हाला त्याचं नियोजन करावं लागणार आहे. ज्या दिवशी तुम्ही शेअर बाजारात व्यवहार करता दुसऱ्या ट्रेडिंग डेला (ज्या दिवशी शेअर बाजार खुला असतो) त्याला T+1 Day म्हणतात. इथे टी म्हणजे ट्रेडिंग डे. त्याचप्रमाणे T+2 चा व्यापार आणि त्याचा दुसरा दिवस घडला. साधारणतः शेअर बाजारात व्यवहार करताना खरेदी केलेले शेअर्स दोन ट्रेडिंग दिवसांत तुमच्या खात्यात येतात. दुसरीकडे, विक्री झालेले शेअर्स दोन दिवसांनंतर खात्याबाहेर जातात.
अमेरिकेतून एक गुड न्यूज अन् या कंपनीचे शेअर्स सुसाट; एकाच महिन्यात गुंतवणुकदारांचे पैसे डबलया शुक्रवारी 21 ऑक्टोबरला खरेदी केलेले शेअर्स 24 ऑक्टोबरला विकले जाणार नाहीत. त्याचबरोबर 21 ऑक्टोबरला व्यवहार झालेले शेअर्स 27 ऑक्टोबर रोजी स्थिरावणार आहेत. त्याचप्रमाणे 24 ऑक्टोबरला व्यवहार झालेले शेअर्स 27 ऑक्टोबर रोजी खात्यात येतील किंवा जातील. शेयर बाजार ट्रेडिंग कॅलेंडर 21 ऑक्टोबर- शुक्रवार- नॉर्मल ट्रेडिंग 24 ऑक्टोबर- सोमवार- मुहूर्त ट्रेडिंग (6:15 PM-7:15 PM) 25ऑक्टोबर- मंगळवार- नॉर्मल ट्रेडिंग 26 ऑक्टोबर- बुधवार- सुट्टी 27 ऑक्टोबर - गुरुवार - नॉर्मल ट्रेडिंग (सेटेलमेंट) मुहूर्त ट्रेडिंग काय? 100 वर्षांहून अधिक जुन्या परंपरेनुसार, धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मी देवीच्या सन्मानार्थ दरवर्षी दिवाळीनिमित्त मुहूर्त व्यवसाय केला जातो. या दिवाळीपासून संवत वर्ष 2079 हे हिंदूंचं नवं वर्ष सुरू होणार आहे.
असं काय घडलं की ‘या’ कंपनीच्या शेअर्सनं गुंतवणूकदारांना बनवलं कोट्यधीश!देशातील हिंदूंचा प्रसिद्ध सण असलेली दिवाळी ही संपत्तीची देवी लक्ष्मीशी निगडित आहे. या दिवशी पैसे खर्च करणे आणि कमाई करणे दोघांसाठी शुभ मानले जाते.
हे महत्त्व लक्षात घेता या दिवशी शेअर बाजारात विशेष ट्रेडिंग होते, त्याला मुहूर्त ट्रेडिंग म्हणतात. पारंपरिक नववर्ष (संवत २०७९) आणि दिवाळीनंतर केवळ एक दिवस सुरू होणारे नवे गुजराती नववर्ष या दोन्ही संकल्पना आल्या आहेत त्यामुळे याचं महत्त्व जातं आहे.